Thomson Tv - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 09 Sep 2022 09:30:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/#respond Fri, 09 Sep 2022 09:30:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12981 Thomson 3 QLED TV Launched: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे घरात नवीन वस्तू घेण्याची योजना देखील अनेकजण बनवत आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी देखील या काळात सेलचं आयोजन केलं आहे तर ब्रँड्स देखील आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात सादर करत आहेत. Festive Seasons पाहून Thomson नं देखील आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये एकाच वेळी तीन नवीन Smart TV […]

The post इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Thomson 3 QLED TV Launched: सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत, त्यामुळे घरात नवीन वस्तू घेण्याची योजना देखील अनेकजण बनवत आहेत. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी देखील या काळात सेलचं आयोजन केलं आहे तर ब्रँड्स देखील आपले नवीन प्रॉडक्ट्स बाजारात सादर करत आहेत. Festive Seasons पाहून Thomson नं देखील आपल्या स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियोमध्ये एकाच वेळी तीन नवीन Smart TV जोडले आहेत.

Thomson नं भारतात TV 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे टीव्ही सादर केले आहेत. तसेच या सर्व टीव्हीमध्ये क्यूएलईडी पॅनल (QLED Panel) देण्यात आलं आहे आणि या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही सपोर्ट (Google TV Support) देखील मिळतो. पुढे आम्ही तुम्हाला या सर्व टीव्हीची डिजाईन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: महिनाभर नव्हे तर 45 दिवसांची वैधता असलेला Recharge Plan; रोज 2GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग

Thomson QLED TV ची किंमत आणि सेल डिटेल

थॉमसन स्मार्ट टीव्हीची किंमत पाहता Thomson QLED TV 50 inch साइजची प्राइस 33,999 रुपये हा या सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल. तर 55 inch मॉडेलची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या सीरिजमधील सर्वात मोठा 65 inch चा मॉडेल कंपनी 59,999 रुपयांमध्ये विकेल. विशेष म्हणजे या स्मार्ट टीव्हीचा सेल (Smart TV Sale) Flipkart वर होणाऱ्या Big Billion Days Sale च्या माध्यमातून केला जाईल.

Thomson 4K QLED Smart TV Price Chart

Thomson QLED TV चे शानदार फीचर्स

Thomson QLED TV बेजल लेस डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. कंपनीनं यात एचडीआर10+, डॉल्बी अ‍ॅटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस आणि डीटीएस ट्रशियाराउंड सारखे फीचर्स दिले आहेत, जे घरच्या घरी सिनेमा थिएटरचा अनुभव देतात. यांचा आकार वेगवेगळा असला तरी तिन्ही मॉडेल्समधील फीचर्स सारखेच आहेत. हे देखील वाचा: जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स

Thomson QLED TV चे स्पेसिफिकेशन्स

सर्व साइजच्या टीव्हीमध्ये 40वॉटचे डॉल्बी ऑडियो स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे दमदार साऊंड क्वॉलिटी मिळते. या इन टीव्हीमध्ये 2 GB RAM आणि 16 GB Storage देण्यात आली आहे, जेणेकरून स्मूद प्रोसेसिंग मिळते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी हे टीव्ही ड्युअल बँड (2.4 + 5) गीगाहर्ट्ज वाय-फायला सपोर्ट करतात.

इतकेच नव्हे तर थॉमसनचे सर्व टीव्ही 4K रिजॉल्यूशनसह येतात, ज्यामुळे टीव्हीवर चित्रपट बघण्याची मजा आणखी वाढते. सर्व टीव्हीमध्ये Netflix, Prime Video, Hotstar, Apple TV, Voot, Sony Live सारखे 10000 पेक्षाही जास्त अ‍ॅप्स आणि गेम्स वापरता येतात कारण हे टीव्ही गुगल प्ले-स्टोरला सपोर्ट करतात. तसेच या टीव्हीच्या मदतीनं तुम्ही Smart Home Devices कंट्रोल करू शकाल.

The post इतक्या स्वस्तात 55 इंचाचा Smart TV; घराला थिएटर बनवण्यासाठी आले Thomson चे QLED 4K TV first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/thomson-qled-smart-tv-4k-launch-india-price-sale-specification/feed/ 0
Flipkart वर सुरू झाला Electronic Sale, मोठी स्क्रीन असलेले 16 महाग स्मार्ट TV मिळतील स्वस्तात https://www.91mobiles.com/marathi/flipkart-electronics-day-sale-thomson-smart-tv-discount/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-electronics-day-sale-thomson-smart-tv-discount/#respond Tue, 16 Mar 2021 10:23:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10333 कंपनीच्या दाव्यानुसार 2020 मध्ये कोरोना महामारी असूनही त्यांना 100 टक्के रेवन्यू मिळत आहे.

The post Flipkart वर सुरू झाला Electronic Sale, मोठी स्क्रीन असलेले 16 महाग स्मार्ट TV मिळतील स्वस्तात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. कारण ई-कॉमर्स साइट Flipkart वर आज पासून Flipkart Electronics Day Sale सुरू झाला आहे, ज्यात यूरोप मधील फेमस टीव्ही ब्रँड Thomson आपल्या अनेक स्मार्टटीव्हीवर शानदार सुट देत आहे. या सेलमध्ये Thomson चे LED आणि Smart TV फक्त 7,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येतील. Flipkart चा हा इलेक्ट्रॉनिक्स डे सेल आज म्हणजे 16 मार्च पासून सुरू झाला आहे आणि 20 मार्च पर्यंत सुरू राहील.

या टिव्हीवर मिळत आहे डिस्काउंट
कंपनी आपल्या एकूण 16 मॉडेलवर शानदार डिस्काउंट देत आहे. या मॉडल मध्ये Thomson 24TM2490, Thomson 32TM3290, Thomson 32PATH0011
Thomson 32PATH0011BL, Thomson 40PATH7777, Thomson 42PATH1212, Thomson 43PATH0009, Thomson 43PATH0009BL Thomson 43PATH4545, Thomson 43OATHPRO 2000, Thomson 50PATH1010, Thomson 50 OATHPRO 1212, Thomson 55PATH5050, Thomson 55 OATHPRO 0101, Thomson 65 OATHPRO 2020 आणि Thomson 75 OATHPRO2121 यांचा समावेश आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार 2020 मध्ये कोरोना महामारी असूनही त्यांना 100 टक्के रेवन्यू मिळत आहे. फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक डेज सेल मध्ये थॉमसनचा 55 इंचाचा 4के टीव्ही फक्त 35,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

डिस्काउंट नंतर या किंमतीत विकले जातील टीव्ही

कंपनीने जानेवारीत Thomson ने दोन नवीन Android स्मार्ट टीव्ही भारतात सादर केला होता, ज्यांची साइज क्रमशः 42 इंच आणि 43 इंच होती. या टिव्हीची खासियत पाहता यांत वॉयस कंट्रोलसह गूगल असिस्टेंट देण्यात आला आहे. तसेच रिमोट मध्ये OTT प्लॅटफॉर्म जसे की अमेजॉन प्राइम वीडियो, नेटफ्लिक्स, सोनी लिव आणि यूट्यूब साठी बटन देण्यात आले आहेत. गूगल असिस्टेंटसाठी पण टिव्ही मध्ये एक बटन आहे.

The post Flipkart वर सुरू झाला Electronic Sale, मोठी स्क्रीन असलेले 16 महाग स्मार्ट TV मिळतील स्वस्तात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-electronics-day-sale-thomson-smart-tv-discount/feed/ 0
Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी आला Thomson चा मेड इन इंडिया TV, किंमत पण आहे खूप कमी https://www.91mobiles.com/marathi/thomson-oath-pro-4k-android-tv-series-launched-in-india-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/thomson-oath-pro-4k-android-tv-series-launched-in-india-know-price/#respond Fri, 03 Jul 2020 09:26:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7591 कंपनी द्वारे भारतात सादर करण्यात आलेली नवीन रेंज Oath Pro नावाने सादर करण्यात आली आहे.

The post Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी आला Thomson चा मेड इन इंडिया TV, किंमत पण आहे खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्रांसची टीव्ही निर्माता कंपनी Thomson ने पुन्हा एकदा भारतीय बाजारात नवीन स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. कंपनी द्वारे भारतात सादर करण्यात आलेली नवीन रेंज Oath Pro नावाने सादर करण्यात आली आहे. या सीरीज मध्ये 43 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे टीव्ही लॉन्च केले गेले आहेत. तसेच या टीव्ही ची खास बाब अशी हे सर्व टीव्ही डॉल्बी विजन फॉरमॅट पर्यंतच्या HDR सपॉर्ट सह येतात. तसेच टीव्हीची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते. चला या टीव्ही च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत सर्व माहिती घेऊया. विशेष म्हणजे थॉमसन एक फ्रेंच ब्रँड आहे, पण भारतात याचे ब्रँड लायसन्स नोएडाच्या प्लास्ट्रॉनिक प्राइवेट लिमिटेडकडे आहे त्यामुळे हि एक मेड इन इंडिया टीव्ही आहे.

किंमत आणि उपलब्धता

सर्वात आधी बोलूया भारतात लॉन्च झालेल्या या टीव्हीच्या किंमत आणि उप्लब्धतेबाबत, ओथ सीरीजच्या 43-इंच 4K टीव्हीची किंमत 24,999 रुपये, 55-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 32,999 रुपये आणि 65 इंचाच्या वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. या तिन्ही टीव्ही 5 जुलै पासून एक्सक्लुसिव्हली ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्ट वर विकले जातील.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

थॉमसन ओथ प्रो सीरीजच्या टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स पाहता तिन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. तसेच या टीव्ही मध्ये लोकप्रिय वीडियो स्ट्रीमिंग ऍप्स आधीपासूनच इंस्टॉल्ड आहेत. हे ऍप्स वापरण्यासाठी रिमोट मध्ये डेडिकेटेड बटण देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर टीव्ही गूगल असिस्टंट वॉइस कमांडला पण सपॉर्ट करतो.

टीव्ही भागातील सर्वोत्तम टीव्ही फीचर जसे कि MEMC, डॉल्बी डिजिटल प्लस, डॉल्बी विजन, HDR10, ब्लूटूथ 5.0 सह येतो, ज्यात नेटफ्लिक्स, प्राइम वीडियो, यूट्यूब आणि प्ले स्टोर चे शॉर्टकट बटन्स आहेत. टीव्ही मध्ये एचडीआर टेक्नॉलॉजी सह 3840X2160 डिस्प्ले रिजोल्यूशन देण्यात आला आहे.

The post Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी आला Thomson चा मेड इन इंडिया TV, किंमत पण आहे खूप कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/thomson-oath-pro-4k-android-tv-series-launched-in-india-know-price/feed/ 0
7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/#respond Fri, 27 Sep 2019 14:08:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5440 कंपनीच्या 4K टीव्ही रेंज मध्ये असलेली 43-इंचाची टीव्ही 26,999 रुपये व 65-इंचाची टीव्ही 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

The post 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेस्टिव सीजन पाहता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपले ‘बिग बिलियन डेज’ (The Big Billion Days) 29 सप्टेंबर पासून सुरु करणार आहे. हा सेल 4 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सेल मध्ये भरपूर सूट आणि आकर्षक किंमतींसह Thomson TV वर पण भरपूर डिस्काउंट दिला जाईल.

आम्ही तुम्हाला पुढे Thomson टीव्ही वर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देत आहोत. ‘बिग बिलियन डेज’ च्या माध्यमातून ग्राहकांना फ्री डिलिवरी, बाय नाउ पे लेटर प्लान, लिमिटिड एडीशन न्यू लॉन्च आणि 90 टक्क्यांपर्यंतची डिस्काउंट ऑफर देण्याचा वादा केला आहे.

त्याचबरोबर Thomson 32-inch TV या सेल मध्ये Rs 6,999 मध्ये उपलब्ध होईल. Thomson 32TM3290 TV सेल नसताना फ्लिपकार्ट वर 8,999 रुपयांमध्ये विकली जाते. कंपनीचा दावा आहे की डिवाइस झिरो डॉट A+ ग्रेड एचडी रेडी पॅनल सह येतो. टीव्ही मध्ये 178 डिग्री वाइड व्यूइंग अँगल आणि 20W स्पीकर्स आहेत.

पाच दिवस चालणाऱ्या या सेल मध्ये कंपनी 5999 रुपयांमध्ये 24-इंचाची एचडी एलईडी टीव्ही देईल. कंपनीच्या 4K टीव्ही रेंज मध्ये असलेली 43-इंचाची टीव्ही 26,999 रुपये व 65-इंचाची टीव्ही 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे या सेल मध्ये स्मार्टफोन्स वर पण चांगला डिस्काउंट दिला जात आहे. या सेल मध्ये 5,000एमएएच बॅटरी असलेल्या स्मार्टफोन Vivo Z1 Pro वर सूट दिली जाईल. वीवो झेड1 प्रो जुलै मध्ये भारतीय बाजारात 14,990 रुपयांच्या बेस किंमतीसह लॉन्च केला गेला होता. जो या सेल मध्ये 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हि किंमत फोनच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे.

The post 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/feed/ 0