BSNL 45 Days Recharge Plan: खाजगी कंपन्या ग्राहकांकडून पैसे काढण्याची एक देखील संधी सोडत नाहीत तर दुसरीकडे सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल स्वस्तात शानदार प्लॅन्स सादर करत आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे मोठी वैधता असलेले अनेक प्रीपेड प्लॅन (BSNL Recharge Plan) आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन्स फक्त जास्त व्हॅलिडिटी देत नाहीत तर कंपनी इन प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) मध्ये भरपूर डेटा बेनिफिट्स देखील देत आहे. जर तुम्हाला इंटरनेट डेटासह एका महिन्यापेक्षा जास्त वैधता हवी असेल तर तुम्ही BSNL च्या 45 दिवसांची वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता. या प्लॅनची किंमत खूप कमी आहे आणि हा Reliance Jio व Airtel च्या रिचार्जपेक्षा जास्त बेनिफिट्स देतो.
BSNL चा 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन
BSNL च्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा दिला जातो. फक्त डेटा नव्हे तर कंपनीनं कॉलिंग हव्या असणाऱ्या ग्राहकांसाठी देखील या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स दिले आहेत. एसएमएस बेनिफिट्स पाहता या प्लॅनमध्ये डेली 100 SMS दिले जातात. हे देखील वाचा: एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड
2GB डेली डेटा लिमिट संपल्यावर देखील युजर्स इंटरनेट वापरू शकतील फक्त इंटरनेट स्पीड 40 Kbps पर्यंत कमी होईल. इतके सर्व लाभ असून देखील बीएसएनएलच्या या प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजे या प्लॅनची वैधता 45 दिवस आहे. इतर कंपन्या एवढ्या किंमतीत 28 ते 31 दिवसांची वैधता देतात. परंतु बीएसएनलच्या या प्लॅनच्या बाबतीत महत्वाची बाब म्हणजे हा एक फर्स्ट रिचार्ज कुपन (FRC) आहे जो फक्त नवीन युजर्स वापरू शकतात.
BSNL च्या 249 रुपयांच्या प्लॅन बाबत बोलायचं झालं तर हा रिचार्ज तुम्हाला संपूर्ण 45 दिवसांपर्यंत पुरेल आणि एवढ्या कालावधीत तुम्हाला नवीन रिचार्ज करण्याची गरज नाही. नवीन ग्राहक आणि तसेच MNP पोर्ट-इन ग्राहक ही योजना निवडू शकतात. हे देखील वाचा: जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स
उशिरा लाँच होणार BSNL 4G
अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार बीएसएनएल पुढील वर्षी आपली 4जी सेवा सुरु करेल. बीएसएनएलच्या 4जी नेटवर्कची वाट बघत असेलेल्या सर्व लोकांसाठी ही एक मोठी बातमी असू शकते. रिपोर्टनुसार, दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की 4G सर्व्हिससाठी आवश्यक असलेली उपकरणे खरेदी करण्यास उशीर झाला आहे, त्यामुळे बीएसएनएल यंदा 4जी लाँच करू शकणार नाही.