Xiaomi-Realme ला टक्कर देण्यासाठी आला Thomson चा मेड इन इंडिया TV, किंमत पण आहे खूप कमी

फ्रांसची टीव्ही निर्माता कंपनी Thomson ने पुन्हा एकदा भारतीय बाजारात नवीन स्मार्ट टीव्ही सादर केला आहे. कंपनी द्वारे भारतात सादर करण्यात आलेली नवीन रेंज Oath Pro नावाने सादर करण्यात आली आहे. या सीरीज मध्ये 43 इंच, 55 इंच आणि 65 इंचाचे टीव्ही लॉन्च केले गेले आहेत. तसेच या टीव्ही ची खास बाब अशी हे सर्व टीव्ही डॉल्बी विजन फॉरमॅट पर्यंतच्या HDR सपॉर्ट सह येतात. तसेच टीव्हीची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते. चला या टीव्ही च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत सर्व माहिती घेऊया. विशेष म्हणजे थॉमसन एक फ्रेंच ब्रँड आहे, पण भारतात याचे ब्रँड लायसन्स नोएडाच्या प्लास्ट्रॉनिक प्राइवेट लिमिटेडकडे आहे त्यामुळे हि एक मेड इन इंडिया टीव्ही आहे.

किंमत आणि उपलब्धता

सर्वात आधी बोलूया भारतात लॉन्च झालेल्या या टीव्हीच्या किंमत आणि उप्लब्धतेबाबत, ओथ सीरीजच्या 43-इंच 4K टीव्हीची किंमत 24,999 रुपये, 55-इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 32,999 रुपये आणि 65 इंचाच्या वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आहे. या तिन्ही टीव्ही 5 जुलै पासून एक्सक्लुसिव्हली ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्ट वर विकले जातील.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

थॉमसन ओथ प्रो सीरीजच्या टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स पाहता तिन्ही मॉडेल एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. तसेच या टीव्ही मध्ये लोकप्रिय वीडियो स्ट्रीमिंग ऍप्स आधीपासूनच इंस्टॉल्ड आहेत. हे ऍप्स वापरण्यासाठी रिमोट मध्ये डेडिकेटेड बटण देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर टीव्ही गूगल असिस्टंट वॉइस कमांडला पण सपॉर्ट करतो.

टीव्ही भागातील सर्वोत्तम टीव्ही फीचर जसे कि MEMC, डॉल्बी डिजिटल प्लस, डॉल्बी विजन, HDR10, ब्लूटूथ 5.0 सह येतो, ज्यात नेटफ्लिक्स, प्राइम वीडियो, यूट्यूब आणि प्ले स्टोर चे शॉर्टकट बटन्स आहेत. टीव्ही मध्ये एचडीआर टेक्नॉलॉजी सह 3840X2160 डिस्प्ले रिजोल्यूशन देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here