Vivo NEX - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 4400एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल फोन Vivo NEX 3s 5G https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-3s-5g-launched-12gb-ram-qualcomm-snapdragon-865-specs/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-3s-5g-launched-12gb-ram-qualcomm-snapdragon-865-specs/#respond Wed, 11 Mar 2020 12:48:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6758 NEX 3s वीवो द्वारे गेल्या वर्षी लॉन्च केलाय गेलेल्या NEX 3 स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन आहे

The post 12 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 4400एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल फोन Vivo NEX 3s 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काल म्हणजे 10 मार्चला अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या ‘नेक्स सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन Vivo NEX 3s 5G लॉन्च केला आहे. नावावरून समजले असले कि नेक्स 3एस एक 5जी फोन आहे जो शानदार लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. कंपनीने नेक्स 3एस 5जी सध्या चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांत येऊ शकतो. NEX 3s वीवो द्वारे गेल्या वर्षी लॉन्च केलाय गेलेल्या NEX 3 स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन आहे जो ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च झाला आहे. चला एक नजर टाकूया वीवो नेक्स 3एस 5जी च्या पावर वर.

Vivo NEX 3s 5G फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला गेला आहे ज्याची स्क्रीन दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे. कंपनीने या डिस्प्लेला वॉटरफॉल डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बटण, सेंसर किंवा नॉच नाही. डिस्प्लेचा वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा भाग पण बेजल लेस आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर सेल्फीसाठी पॉप-अप कॅमेरा सेटअप आहे. हा मॉड्यूल थोडा रुंद आहे ज्यात कॅमेरा सेंसर सोबतच फ्लॅश लाइट पण आहे. Vivo NEX 3s 5G चा बॅक पॅनल शाईनी आणि ग्लॉसी आहे जो ग्लास पॅनल वर बनला आहे. Vivo NEX 3s 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो राउंड शेप मध्ये आहे. बॅक पॅनल वर मधोमध एक रिंग देण्यात आली आहे आणि या रिंग मध्ये तीन सेंसर्स आहेत. कॅमेरा सेटअप रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

Vivo NEX 3s 5G

वीवो नेक्स 3एस 5जी कंपनीने 6.89 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन एचडीआर10+ ला सपोर्ट करते तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देते. Vivo NEX 3s ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येते. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस वर चालतो.

Vivo NEX 3s मध्ये प्रोसेसिंगसाठी ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे जो डुअल मोड 5जी टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. कंपनीने नेक्स 3एस दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo NEX 3s LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Vivo NEX 3s 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर राउंड शेप मध्ये देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा ISOCELL Bright GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच नेक्स 3एस मध्ये 13 मेगापिक्सलची सेकेंडरी टेलीफोटो लेंस आणि 120डिग्री व्यू असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी Vivo NEX 3s 5G 16 मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी Vivo NEX 3s 5G मध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo NEX 3s 5G ची किंमत पाहता चीनी बाजारात फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 4998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार 53,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 5298 युआन मध्ये सादर करण्यात आला आहे जो भारतीय करंसीनुसार जवळपास 56,000 रुपयांचा आहे. चीन मध्ये हा फोन 14 मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोन इतर बाजारांमध्ये लॉन्च होईल की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.

The post 12 जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट आणि 4400एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल फोन Vivo NEX 3s 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-3s-5g-launched-12gb-ram-qualcomm-snapdragon-865-specs/feed/ 0
वीवो घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, 20 फेब्रुवारीला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-launch-new-pop-up-selfie-camera-phone-in-20-february-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-launch-new-pop-up-selfie-camera-phone-in-20-february-in-marathi/#respond Tue, 29 Jan 2019 12:10:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3489 वीवो आपला हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून लॉन्च करेल

The post वीवो घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, 20 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात एक एक्सक्लूसिव बातमीत सांगितले होते कि वीवो आपल्या हिट स्मार्टफोन वी11 प्रो च्या अपग्रेडेड वर्जन वर काम करत आहे. एक बातमी आली आहे कि कंपनी आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आत ऑफिशियली वीवो ने नवीन सेल्फी पॉप-अप कॅमेरा असलेल्या फोन लॉन्च साठी मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.

आशा आहे कि हा डिवाइस वीवो आपल्या हिट स्मार्टफोन वी11 प्रो चा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर करेल. इनवाइट मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याची डिजाइन दाखवण्यात आली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी स्मार्टफोन फुल-डिजाइन सह सादर करेल.

विशेष म्हणजे वीवो ने गेल्यावर्षी वीवो नेक्स स्मार्टफोनच्या माध्यमातून पॉप-अप कॅमेऱ्याची सुरवात केली होती. हा कॅमेरा सेटअप फोनच्या डिस्प्ले वर नसून फोन बॉडीच्या आत असतो जो बाहेरून दिसत नाही. सेल्फी कमांड देताच हा कॅमेरा सेटअप फोन बॉडीच्या बेहरे येतो आणि फोटो क्लिक करतो. वीवो आपला हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून लॉन्च करेल तसेच याची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. आशा आहे कि वीवोचा हा फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लेटफॉर्म वर सेलसाठी उपलब्ध होईल.

वीवो इंडिया ने गेल्यावर्षी भारतीय बाजारात ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच असलेला स्मार्टफोन वी11 प्रो लॉन्च केला होता. वी11 प्रो मधील नॉचला कंपनीने ‘हेलो नॉच’ नाव दिले होते. वीवो वी11 प्रो मध्ये सिंगल फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. तसेच या फोनच्या नवीन वर्जन मधील पॉप-अप कॅमेरा असल्याचे समोर आल्यामुळे वाटत आहे कि वीवोचा आागामी स्मार्टफोन पण एकाच सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल.

The post वीवो घेऊन येत आहे पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन, 20 फेब्रुवारीला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-launch-new-pop-up-selfie-camera-phone-in-20-february-in-marathi/feed/ 0
वीवोच्या या फोन मध्ये असतील 2 डिस्प्ले, 3 रियर कॅमेरा आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, बघा हा शानदार वीडियो https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-s2-video-leak-dual-displays-three-rear-cameras-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-s2-video-leak-dual-displays-three-rear-cameras-in-marathi/#respond Thu, 29 Nov 2018 13:09:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3027 वीडियो मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा सेंसर दिले जातील.

The post वीवोच्या या फोन मध्ये असतील 2 डिस्प्ले, 3 रियर कॅमेरा आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, बघा हा शानदार वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वीच वीवो च्या एका अशा स्मार्टफोनचा फोटो समोर आला होता ज्यात डुअल डिस्प्ले दाखवण्यात आला होता. या फोनच्या फ्रंट तसेच बॅक दोन्ही पॅनल पर स्क्रीन देण्यात आली होती. वीवोच्या या आगामी स्मार्टफोनचा फोटो वायरल झाल्यानंतर आता या डुअल डिस्प्ले वाल्या फोनचा अनबॉक्सिंग वीडियो पण समोर आला आहे जो यूट्यूब वर शेयर करण्यात आला आहे. या वीडियो मध्ये फोनचा ब्रँड यूट्यूबर ने लपवला आहे, पण बोलले जात आहे कि हा फोन वीवो च्या नेक्स सीरीजचा आगामी डिवाईस नेक्स एस2 च आहे.

वीवो नेक्स एस2 च्या या वीडियो मध्ये फोन मध्ये दोन डिस्प्ले असल्याचे समोर आले आहे. वीडियो मध्ये दाखवण्यात आलेल्या फोनच्या फ्रंट पॅनल वर वीवो नेक्स प्रमाणे कोणतेही ​फिजिकल बटण व नॉच नाही. वीडियो मध्ये फोन पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला ज्याच्या डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहेत. वीडियो मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या फ्रंट पॅनल सह बॅक पॅनल वर पण डिस्प्ले असेल.

वीडियो मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा सेंसर दिले जातील. फोनच्या बॅक पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर गोलाकार रिंग मध्ये असतील तसेच एक कॅमेरा सेंसर या रिंगच्या बाहेर डावीकडे असेल कॅमेरा रिंग च्या उजवीकडील फ्लॅश लाईट पण या वीडियो मध्ये दिसली आहे. वीवो नेक्स प्रमाणे या फोन मध्ये पण पॉप-अप फ्रंट कॅमेरा असेल जो फोनच्या वरच्या पॅनल वर बॉडीच्या आत असेल. हा कॅमेरा सेल्फी ची कमांड देताच फोन बॉडीच्या बाहेर येईल.

वीवो नेक्स एस2 मध्ये सीरीजच्या पहिल्या मॉडेल प्रमाणे अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण असेल. वीवो नेक्स एस2 च्या पहिल्या लीक झालेल्या फोन मध्ये फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्लेच्या खाली वीवोचा लोगो पण दाखवण्यात आला होता. लीक झालेल्या फोटो मध्ये फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर तसेच सोबत पावर बटण दिसला होता. वीवो ने अजूनतरी नेक्स सीरीजच्या कोणत्याही आगामी फोन बद्दल घोषणा केली नाही, त्यामुळे नेक्स एस2 ची रियर ईमेज व अन्य स्पेसिफिकेशन्सची वाट बघितली जात आहे.

The post वीवोच्या या फोन मध्ये असतील 2 डिस्प्ले, 3 रियर कॅमेरा आणि अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, बघा हा शानदार वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-s2-video-leak-dual-displays-three-rear-cameras-in-marathi/feed/ 0
वीवो घेऊन येत आहे डुअल डिस्प्ले असलेला फोन, लॉन्चच्या आधीच फोटो झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-phone-triple-rear-camera-image-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-phone-triple-rear-camera-image-leaked-in-marathi/#respond Mon, 26 Nov 2018 09:47:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2979 वीवो च्या या डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन चे फोटो चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आले आहेत.

The post वीवो घेऊन येत आहे डुअल डिस्प्ले असलेला फोन, लॉन्चच्या आधीच फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो बद्दल काही दिवसांपासुन बातमी येत आहे की कंपनी एका अशा फोन वर काम करत आहे ज्याच्या फ्रंट पॅनल सोबत बॅक पॅनल वर पण स्क्रीन असेल, म्हणजे वीवो चा हा स्मार्टफोन डुअल डिस्प्ले सह येईल. आज एका लीक मधून वीवो च्या या अनोख्या डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनचे फोटोज पण समोर आले आहेत. लीक झालेल्या फोटोज वरून फक्त वीवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली नसुन सोबत फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

वीवो च्या या डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन चे फोटो चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आले आहेत. वेईबो वर फोनच्या फ्रंट तसेच बॅक पॅनल दाखविण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता हा फोनचा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहे. फ्रंट पॅनल वर कोणतेही नॉच व सेंसर नाही. बोलले जात आहे की हा फोन वीवो की नेक्स सीरीज अंतर्गत लॉन्च होईल. नेक्स सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे यात पण पॉप-अप फ्रंट कॅमेरा असेल जो सेल्फी कमांड देताच फोन बॉडी मधून बाहेर येईल.

वीवो नेक्स च्या या आगामी स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर पण डिस्प्ले देण्यात आला आहे. बक पॅनल वर फोन च्या वरच्या बाजूला जिथे कॅमेरा सेटअप देण्यात आला तिथे खाली ‘वीवो’ चा लोगो आहे. बॅक पॅनल वर मध्य भागी डिस्प्ले आहे. बॅक पॅनल वरील डिस्प्लेची साईज पण फोनच्या फोटो मध्ये खुप मोठी दिसत आहे. बॅक डिस्प्लेच्या वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तिथ एलईडी फ्लॅश सोबत तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. जे एका रांगेत आहेत.

नेक्स सीरीजच्या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याने फोटो घेता येत होता तर या फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्ले मुळे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ने पण सेल्फी घेता येईल. त्यामुळे कंपनी या स्मार्टफोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा देणार नाही असे वाटते. लीक झालेल्या फोटो मध्ये फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. वीवो च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल की नाही ते नक्की नाही.

वीवो ने अजूनतरी या स्मार्टफोन बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. बोलले जात आहे की कंपनी पुढल्या वर्षी हा स्मार्टफोन आणेल. तोपर्यंत फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व फीचर्स साठी कंपनी कडून मिळणार्‍या माहितीची वाट बघावी लागेल.

The post वीवो घेऊन येत आहे डुअल डिस्प्ले असलेला फोन, लॉन्चच्या आधीच फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-dual-screen-phone-triple-rear-camera-image-leaked-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/#respond Mon, 01 Oct 2018 12:14:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2337 सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही कधी विचार केला आहे का अचानक पणे स्मार्टफोन मधील रॅम बद्दल इतकी चर्चा का सुरू झाली आहे? लोक जास्त रॅम असलेला फोन का शोधत आहेत? त्यामागील एक कारण म्हणजे आता अॅप्स आणि गेम्स हेवी होत आहेत. हाय रेजल्यूशन असलेले हे अॅप्स चालवण्यासाठी जास्त रॅम ची गरज असते नाही तर फोन लॅग होईल किंवा स्लो होईल. फोन मध्ये अॅप्स आणि गेम्स इंटरनल मेमरी मध्ये स्टोर झाले तरी जेव्हा तुम्ही ते चालवता तेव्हा ते रॅम चा वापर करतात. याच कारणामुळे लोक जास्त रॅम असलेला फोन शोधतात. फोन मध्ये रॅम जास्त असल्यास तो लवकर हँग होणार नाही. फोन फास्ट चालेल आणि लॅग पण कमी होईल. सुरवातीला 1जीबी रॅम भरपूर जास्त असायचा पण आजकाल 8जीबी रॅम वाले फोन भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. खाली आम्ही 8जीबी रॅम असलेल्या अशाच 7 दमदार फोनची माहिती दिली आहे.

1. रियलमी 2 प्रो

सध्या भारतीय बाजारात हा सर्वात स्वस्त 8जीबी रॅम वाला फोन आहे. रियलमी 2 प्रो नुकताच कंपनी ने लॉन्च केला आहे. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

2. शाओमी पोको एफ1

शाओमी ने भारतीय बाजारात पोको नावाने दुसरा ब्रँड सादर केला आहे. या अंतर्गत कंपनी ने पोको एफ1 नावाने पहिला मॉडेल लॉन्च केला आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. 8जीबी वाला वेरियंट 256जीबी मेमरी सह येतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे.

3. असूस झेनफोन 5झेड

या वर्षी असूस ने पण 8जीबी रॅम सह आपला फोन सादर केला आहे. कंपनी झेनफोन 5झेड आणला आहे जो चांगल्या प्रोसेसर सोबत 8जीबी रॅम मध्ये उपलब्ध आहे. याचा एक वेरियंट 6जीबी रॅम सह पण येतो. असूस झेनफोन 5झेड मध्ये 6.2-इंचाची नॉच स्टाइल वाली फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात 6जीबी व 8जीबी रॅम वाले दोन मेमरी वेरियंट उपलब्ध आहेत. 8जीबी रॅम मॉडेल सोबत 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर 6जीबी वाला वेरियंट 128जीबी मेमरी सह येतो. फोटोग्राफी साठी यात 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सलचा सेंसर आहे. या फोन मध्ये एआई कॅपेबिलिटी आहे. कॅमेरा सोबत वाइड एंगल सपोर्ट आहे आणि यात एआई इंटीग्रेशन पण देण्यात आला आहे.

4. वनप्लस 6

भारतात 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात वनप्लस ने गेल्या वर्षीच केली होती. या वर्षी पण कंपनी ने 8जीबी रॅम सह वनप्लस 6 आणला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला 6.28-इंच एमोलेड डिस्प्ले आहे जो नॉच स्टाइल सह सादर करण्यात आला आहे. फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. रॅम सोबत सर्वात ताकदवान प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो यात 2.8गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये पण हा मागे नाही आणि फोन मध्ये 20-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 376के सेंसर आणि 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 519 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 371 सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

5. वीवो नेक्स

ओपो व्यतिरिक्त वीवो ने पण इनविजिबल कॅमेरा वाला फोन सादर केला आहे आणि हा फोन पण खुप दमदार आहे. वीवो ने नेक्स भारतात आणला आहे ज्यात पॉप-अप सेल्फी कमेरा देण्यात आला आहे. वीवो नेक्स मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच फोन मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे.

6. ओपो फाइंड एक्स

ओपो फाइंड एक्स ची सर्वात मोठी खासियत याचा कॅमेरा सेटअप आहे. या फोन मध्ये रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही फोनच्या बॉडी च्या आत आहेत जे बाहेरून दिसत नाहीत. फोटो घेण्यासाठी कॅमेरा अॅप उघडताच फोनच्या बॉडी च्या आतून कॅमेरा सेंसर बाहेर येतात आणि फोटो घेतात. कंपनी ने बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर आहे. पण इतर स्पेसिफिकेशन पण काही कमी दमदार नाहीत. फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन कलर ओएस 5.1 वर चालतो जो एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आधारित या फोन मध्ये 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

7. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9

सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सह कंपनी ने 8जीबी रॅम वाल्या फोनची सुरवात केली ज्यात 512जीबी इंटरनल स्टारेेज देण्यात आली. याचा एक मॉडल 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी वाला पण आहे. फोन मध्ये एसपेन फीचर आहे जो इतर कोणत्याही फोन मध्ये नाही. तुम्ही यात सहज नोट बनवू शकता आणि याने कॅमेरा कंट्रोल करू शकता आणि यूट्यूब वीडियो प्ले करू शकता. प्रत्येक बाबतीत तुम्हाला हा फोन आवडेल. गॅलेक्सी नोट 9 मध्ये 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाली कपंनी ने 6.4-इंचाची सुपरएमोलेड कर्व्ड स्क्रीन दिली आहे. फोनचा कॅमेरा पण खुप दमदार आहे. यात एफ1.5/एफ2.4 वेरियेबल अपर्चर सह 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे जो एफ1.7 अपर्चर सह येतो.

The post 8जीबी रॅम सह येणारे 7 दामदार एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-8gb-ram-phone-in-india-in-marathi/feed/ 0
भारतात लॉन्च झाला इनविजिबल सेल्फी कॅमेरा वाला अनोखा स्मार्टफोन वीवो नेक्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-launch-in-india-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-launch-in-india-features-specifications-price-in-marathi/#respond Thu, 19 Jul 2018 09:20:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1322 वीवो ने आपल्या या फोन मधून नॉच डिजाईन बाजूला सारून अल्ट्रा फुल डिस्प्ले सादर केला आहे.

The post भारतात लॉन्च झाला इनविजिबल सेल्फी कॅमेरा वाला अनोखा स्मार्टफोन वीवो नेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट आणि हाईएंड ​टेक्नॉलजी वाला स्मार्टफोन वीवो नेक्स सादर केला आहे. आपल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा मुळे अंर्तराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध झालेला हा स्मार्टफोन मागील महिन्यात चीन मध्ये वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. भारतात वीवो नेक्स चा एकच वेरिएंट सादर करण्यात आला आहे जो 44,990 रुपयांमध्ये आणला गेला आहे. हा स्मार्टफोन 21 जुलै पासून अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो नेक्स च्या या फोन ची सर्वात मोठी खासियत याचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फोन च्या बॉडी मध्ये असतो पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. हा शानदार स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. वीवो ने आपल्या या फोन मधून नॉच डिजाईन बाजूला सारून अल्ट्रा फुल डिस्प्ले सादर केला आहे.

फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो तसेच प्रोसेसिंग साठी यात कोरियो 385 आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर ​डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो ने आपल्या कॅमेरा सेटअप ला आईएमएक्स सेंसर्स चा सपोर्ट​ दिला आहे. वीवो नेक्स मध्ये सिक्योरिटी साठी अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही.

वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच येतात. वीवो चा हा फोन कंपनी च्या एआई असिस्टेंड जोवी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता वीवो नेक्स 44,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post भारतात लॉन्च झाला इनविजिबल सेल्फी कॅमेरा वाला अनोखा स्मार्टफोन वीवो नेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-launch-in-india-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
वीवो नेक्स ची लॉन्च च्या आधी समोर आली किंमत, जाणून घ्या काय असेल प्राइस आणि कधी होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-india-price-rs48990-amazon-leak-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-india-price-rs48990-amazon-leak-feature-specification-in-marathi/#respond Fri, 13 Jul 2018 12:55:06 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1255 माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये वीवो नेक्स च्या किंमतीचा खुलासा केला आहे.

The post वीवो नेक्स ची लॉन्च च्या आधी समोर आली किंमत, जाणून घ्या काय असेल प्राइस आणि कधी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने काही दिवसांपूर्वी आॅफिशियल केले होते की कंपनी येत्या 19 जुलै ला भारतात आपला लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन वीवो नेक्स लॉन्च करणार आहे. कंपनी ने फोन ची लॉन्च डेट तसेच या संबधी इतर माहिती सांगितली नव्हती पण एका लीक मधून फोन च्या लॉन्च आधी याची किंमत आणि इतर माहिती मिळाली आहे.

माय स्मार्ट प्राइस ने आपल्या रिपोर्ट मध्ये वीवो नेक्स च्या किंमतीचा खुलासा केला आहे. या वेबसाइट ने सांगितले आहे की 19 जुलै ला लॉन्च होणारा वीवो नेक्स स्मार्टफोन अमेजॉन इंडिया एक्सक्लूसिव असेल आणि कंपनी याला 48,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. या लीक मधून ही माहिती पण समोर आली आहे की वीवो 19 जुलै ला आपला स्मार्टफोन अमेजॉन वर प्री-आॅर्डर साठी सादर करेल जो नंतर सेल साठी उपलब्ध होईल.

काही दिवसांपूर्वी चीन मध्ये वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. वीवो नेक्स च्या या दोन्ही मॉडेल्स ची सर्वात मोठी खासियत यांचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फोन च्या बॉडी मध्ये आहे पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. समोर आलेली किंमत पाहता दाट शक्यता आहे की भारतात वीवो नेक्स मॉडेलच लॉन्च केला जाईल.

फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. या फोन मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो तसेच प्रोसेसिंग साठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर ​डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो नेक्स अल्टिमेट मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तर वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर फिंरगप्रिंट सेंसर आहे. वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच निघतात. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो नेक्स ची ठोस किंमत आणि स्पेसिफिकेशन्स साठी 19 जुलै ची वाट बघावी लागेल.

The post वीवो नेक्स ची लॉन्च च्या आधी समोर आली किंमत, जाणून घ्या काय असेल प्राइस आणि कधी होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-india-price-rs48990-amazon-leak-feature-specification-in-marathi/feed/ 0
भारतात येत आहे वीवो नेक्स, जुलै च्या तिसर्‍या आठवड्यात होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-coming-to-india-in-third-week-of-july-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-coming-to-india-in-third-week-of-july-in-marathi/#respond Tue, 19 Jun 2018 08:49:14 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=958 भारतात वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट मधील कोणता वेरिएंट लॉन्च होईल किंवा कंपनी दोन्ही मॉडेल सादर करेल याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे.

The post भारतात येत आहे वीवो नेक्स, जुलै च्या तिसर्‍या आठवड्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसच झाले आहेत वीवो ने आपला एडवांस आणि ताकदवान डिवाईस नेक्स अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करून. वीवो नेक्स आॅफिशियल होण्याआधी वीवो इंडिया ने पण हा फोन येणार असल्याचा टीजर शेयर केला होता. वीवो इंडिया द्वारा टीजर शेयर करण्यवार प्रश्न केले जात होते की हा फोन भारतात पण लॉन्च होईल की फक्त ग्लोबल प्लॅटफार्म च्या माध्यमातुन चीन मध्ये उपलब्ध होईल. हा फोन चीन मध्ये तरी लॉन्च झाला आहे पण 91मोबाईल्स ला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की जुलै महिन्यात हा शानदार स्मार्टफोन भारतात पण लॉन्च होणार आहे.

​रिटेल मार्केट शी संबधित सुत्रांनी आम्हाला सांगितले आहे की वीवो कंपनी आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन वीवो नेक्स ला भारतात आणण्याची तयारी करत आहे हा स्मार्टफोन जुलै च्या तिसर्‍या आठवड्यात भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. पण हे स्पष्ट झाले नाही की वीवो नेक्स चा स्नॅपड्रॅगन 710 वाला वेरिएंट भारतात लॉन्च होईल की याचा स्नॅपड्रॅगन 845 वाला वेरिएंट देशात येईल. पण सूत्रांनुसार हा फोन 40,000 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

काही दिवसांपूर्वी चीन मध्ये वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. वीवो नेक्स च्या या दोन्ही मॉडेल्स ची सर्वात मोठी खासियत यांचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फोन च्या बॉडी मध्ये आहे पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. या फोन मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर कोणतेही फिजीकल बटन नाही तसेच को तीही नॉच पण नाही.

वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे तर वीवो नेक्स अल्टिमेट 8जीबी च्या पावरफुल रॅम ला सपोर्ट करतो. वीवो नेक्स अल्टिमेट 128जीबी तसेच 256जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन्स मध्ये सादर करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल लेटेस्ट एंडरॉयड वर चालतात. प्रोसेसिंग साठी वीवो नेक्स मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट देण्यात आला आहे तर वीवो नेक्स अल्टिमेट क्वालकॉम च्या सर्वात फास्ट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर ​डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सामील आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो नेक्स अल्टिमेट मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तर वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर फिंरगप्रिंट सेंसर आहे. वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच निघतात. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता वीवो नेक्स 3,898 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 41,000 रुपये होतात. तसेच वीवो नेक्स अल्टिमेट चा 128जीबी वेरिएंट 4,498 युआन आणि 256जीबी वेरिएंट 4,998 युआन मध्ये बाजारात आणला गेला आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 47,000 रुपये आणि 52,700 रुपयांच्या आसपास असेल. भारतात वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट मधील कोणता वेरिएंट लॉन्च होईल किंवा कंपनी दोन्ही मॉडेल सादर करेल याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे.

The post भारतात येत आहे वीवो नेक्स, जुलै च्या तिसर्‍या आठवड्यात होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-coming-to-india-in-third-week-of-july-in-marathi/feed/ 0
8जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि 6.59-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह लॉन्च झाला इनवीजीबल सेल्फी कॅमेरा वाला वीवो नेक्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-vivo-nex-ultimate-official-8gb-ram-full-specification-feature-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-vivo-nex-ultimate-official-8gb-ram-full-specification-feature-price-in-marathi/#respond Wed, 13 Jun 2018 07:26:13 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=884 वीवो नेक्स अल्टिमेट मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तर वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर फिंरगप्रिंट सेंसर आहे.

The post 8जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि 6.59-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह लॉन्च झाला इनवीजीबल सेल्फी कॅमेरा वाला वीवो नेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सेल्फी ची कमांड देताच फोन च्या बॉडी मधून बाहेर येऊन फोटो घेणारा फ्रंट कॅमेरा असलेल्या वीवो च्या स्मार्टफोन ची वाट संपूर्ण टेक बाजार बघत आहे आणि आज कंपनी ने आपल्या घोषणे नुसार हा अनोखा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर केला आहे. वीवो ने या इनविजिबल सेल्फी कॅमेरा वाला स्मार्टफोन ‘वीवो नेक्स’ नावाने सादर केला आहे. वीवो नेक्स सोबत कंपनी ने या फोन चा अजून एक मॉडेल ‘वीवो नेक्स अल्टिमेट’ पण सादर केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन दिसायला जेवढे शानदार आहेत तेवढेच यांचे स्पेसिफिकेशन्स पण दमदार आहेत.

वीवो नेक्स च्या या दोन्ही मॉडेल्स ची सर्वात मोठी खासियत यांचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप आहे जो फोन च्या बॉडी मध्ये आहे पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. या फोन मध्ये 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर कोणतेही फिजीकल बटन नाही तसेच को तीही नॉच पण नाही.

वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे तर वीवो नेक्स अल्टिमेट 8जीबी च्या पावरफुल रॅम ला सपोर्ट करतो. वीवो नेक्स अल्टिमेट 128जीबी तसेच 256जीबी च्या दोन स्टोरेज आॅप्शन्स मध्ये सादर करण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल लेटेस्ट एंडरॉयड वर चालतात. प्रोसेसिंग साठी वीवो नेक्स मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट देण्यात आला आहे तर वीवो नेक्स अल्टिमेट क्वालकॉम च्या सर्वात फास्ट स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर ​डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सामील आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो नेक्स अल्टिमेट मध्ये अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे तर वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर फिंरगप्रिंट सेंसर आहे. वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच निघतात. या दोन्ही स्मार्टफोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता वीवो नेक्स 3,898 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 41,000 रुपये होतात. तसेच वीवो नेक्स अल्टिमेट चा 128जीबी वेरिएंट 4,498 युआन आणि 256जीबी वेरिएंट 4,998 युआन मध्ये बाजारात आणला गेला आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 47,000 रुपये आणि 52,700 रुपयांच्या आसपास असेल.

The post 8जीबी रॅम, 256जीबी मेमरी आणि 6.59-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह लॉन्च झाला इनवीजीबल सेल्फी कॅमेरा वाला वीवो नेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-nex-vivo-nex-ultimate-official-8gb-ram-full-specification-feature-price-in-marathi/feed/ 0