Vivo ने काल म्हणजे 10 मार्चला अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या ‘नेक्स सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन Vivo NEX 3s 5G लॉन्च केला आहे. नावावरून समजले असले कि नेक्स 3एस एक 5जी फोन आहे जो शानदार लुक सोबतच पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो. कंपनीने नेक्स 3एस 5जी सध्या चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांत येऊ शकतो. NEX 3s वीवो द्वारे गेल्या वर्षी लॉन्च केलाय गेलेल्या NEX 3 स्मार्टफोनचा अपग्रेडेड वर्जन आहे जो ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च झाला आहे. चला एक नजर टाकूया वीवो नेक्स 3एस 5जी च्या पावर वर.
Vivo NEX 3s 5G फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला गेला आहे ज्याची स्क्रीन दोन्ही बाजुंनी बॅक पॅनलच्या दिशेने वळली आहे. कंपनीने या डिस्प्लेला वॉटरफॉल डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बटण, सेंसर किंवा नॉच नाही. डिस्प्लेचा वरच्या बाजूचा आणि खालच्या बाजूचा भाग पण बेजल लेस आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर सेल्फीसाठी पॉप-अप कॅमेरा सेटअप आहे. हा मॉड्यूल थोडा रुंद आहे ज्यात कॅमेरा सेंसर सोबतच फ्लॅश लाइट पण आहे. Vivo NEX 3s 5G चा बॅक पॅनल शाईनी आणि ग्लॉसी आहे जो ग्लास पॅनल वर बनला आहे. Vivo NEX 3s 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो राउंड शेप मध्ये आहे. बॅक पॅनल वर मधोमध एक रिंग देण्यात आली आहे आणि या रिंग मध्ये तीन सेंसर्स आहेत. कॅमेरा सेटअप रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.
Vivo NEX 3s 5G
वीवो नेक्स 3एस 5जी कंपनीने 6.89 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन एचडीआर10+ ला सपोर्ट करते तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेट वर विजुअल क्वॉलिटी देते. Vivo NEX 3s ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नोलॉजी सह येते. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस वर चालतो.
Vivo NEX 3s मध्ये प्रोसेसिंगसाठी ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 देण्यात आला आहे जो डुअल मोड 5जी टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. कंपनीने नेक्स 3एस दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Vivo NEX 3s LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज टेक्नॉलॉजी वर चालतो.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Vivo NEX 3s 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर राउंड शेप मध्ये देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 64 मेगापिक्सलचा ISOCELL Bright GW1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच नेक्स 3एस मध्ये 13 मेगापिक्सलची सेकेंडरी टेलीफोटो लेंस आणि 120डिग्री व्यू असलेला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी Vivo NEX 3s 5G 16 मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी Vivo NEX 3s 5G मध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,400एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo NEX 3s 5G ची किंमत पाहता चीनी बाजारात फोनचा 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 4998 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार 53,000 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनचा 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 5298 युआन मध्ये सादर करण्यात आला आहे जो भारतीय करंसीनुसार जवळपास 56,000 रुपयांचा आहे. चीन मध्ये हा फोन 14 मार्च पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोन इतर बाजारांमध्ये लॉन्च होईल की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.