भारतात लॉन्च झाला इनविजिबल सेल्फी कॅमेरा वाला अनोखा स्मार्टफोन वीवो नेक्स

टेक कंपनी वीवो ने आज भारतीय बाजारात आपला लेटेस्ट आणि हाईएंड ​टेक्नॉलजी वाला स्मार्टफोन वीवो नेक्स सादर केला आहे. आपल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा मुळे अंर्तराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध झालेला हा स्मार्टफोन मागील महिन्यात चीन मध्ये वीवो नेक्स आणि वीवो नेक्स अल्टिमेट वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला होता. भारतात वीवो नेक्स चा एकच वेरिएंट सादर करण्यात आला आहे जो 44,990 रुपयांमध्ये आणला गेला आहे. हा स्मार्टफोन 21 जुलै पासून अमेजॉन वर सेल साठी उपलब्ध होईल.

वीवो नेक्स च्या या फोन ची सर्वात मोठी खासियत याचा फ्रंट कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी साठी वीवो ने फोन च्या वरच्या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो फोन च्या बॉडी मध्ये असतो पण सेल्फी क्लिक करताना फोन च्या बॉडी बाहेर येतो. हा शानदार स्मार्टफोन 19.3:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात चारी बाजूला खुपच बारीक बेजल्स आहेत. वीवो ने आपल्या या फोन मधून नॉच डिजाईन बाजूला सारून अल्ट्रा फुल डिस्प्ले सादर केला आहे.

फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 2316 x 1080 पिक्सल रेजल्यूशन वाला 6.59-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. वीवो ने वीवो नेक्स 6जीबी रॅम मेमरी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड वर चालतो तसेच प्रोसेसिंग साठी यात कोरियो 385 आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो नेक्स च्या बॅक पॅनल वर ​डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात वर्टिकल शेप मध्ये 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा आहेत. तसेच फोन च्या बॉडी मधील फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे. वीवो ने आपल्या कॅमेरा सेटअप ला आईएमएक्स सेंसर्स चा सपोर्ट​ दिला आहे. वीवो नेक्स मध्ये सिक्योरिटी साठी अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो बाहेरून दिसत नाही.

वीवो च्या या फोन मध्ये स्पीकर्स फोन च्या बॉडी मध्ये आहेत आणि म्यूजिक व सांउड फोन च्या बॉडी मधूनच येतात. वीवो चा हा फोन कंपनी च्या एआई असिस्टेंड जोवी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये पावर बॅकअप साठी फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता वीवो नेक्स 44,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here