91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात एक एक्सक्लूसिव बातमीत सांगितले होते कि वीवो आपल्या हिट स्मार्टफोन वी11 प्रो च्या अपग्रेडेड वर्जन वर काम करत आहे. एक बातमी आली आहे कि कंपनी आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. आत ऑफिशियली वीवो ने नवीन सेल्फी पॉप-अप कॅमेरा असलेल्या फोन लॉन्च साठी मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.
आशा आहे कि हा डिवाइस वीवो आपल्या हिट स्मार्टफोन वी11 प्रो चा अपग्रेडेड वर्जन म्हणून सादर करेल. इनवाइट मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याची डिजाइन दाखवण्यात आली आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी स्मार्टफोन फुल-डिजाइन सह सादर करेल.
विशेष म्हणजे वीवो ने गेल्यावर्षी वीवो नेक्स स्मार्टफोनच्या माध्यमातून पॉप-अप कॅमेऱ्याची सुरवात केली होती. हा कॅमेरा सेटअप फोनच्या डिस्प्ले वर नसून फोन बॉडीच्या आत असतो जो बाहेरून दिसत नाही. सेल्फी कमांड देताच हा कॅमेरा सेटअप फोन बॉडीच्या बेहरे येतो आणि फोटो क्लिक करतो. वीवो आपला हा फोन फ्लॅगशिप डिवाईस म्हणून लॉन्च करेल तसेच याची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. आशा आहे कि वीवोचा हा फोन ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लेटफॉर्म वर सेलसाठी उपलब्ध होईल.
वीवो इंडिया ने गेल्यावर्षी भारतीय बाजारात ‘वी’ शेप वॉटरड्रॉप नॉच असलेला स्मार्टफोन वी11 प्रो लॉन्च केला होता. वी11 प्रो मधील नॉचला कंपनीने ‘हेलो नॉच’ नाव दिले होते. वीवो वी11 प्रो मध्ये सिंगल फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता. तसेच या फोनच्या नवीन वर्जन मधील पॉप-अप कॅमेरा असल्याचे समोर आल्यामुळे वाटत आहे कि वीवोचा आागामी स्मार्टफोन पण एकाच सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च होईल.















