वीवो घेऊन येत आहे डुअल डिस्प्ले असलेला फोन, लॉन्चच्या आधीच फोटो झाला लीक

वीवो बद्दल काही दिवसांपासुन बातमी येत आहे की कंपनी एका अशा फोन वर काम करत आहे ज्याच्या फ्रंट पॅनल सोबत बॅक पॅनल वर पण स्क्रीन असेल, म्हणजे वीवो चा हा स्मार्टफोन डुअल डिस्प्ले सह येईल. आज एका लीक मधून वीवो च्या या अनोख्या डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोनचे फोटोज पण समोर आले आहेत. लीक झालेल्या फोटोज वरून फक्त वीवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली नसुन सोबत फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

वीवो च्या या डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन चे फोटो चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आले आहेत. वेईबो वर फोनच्या फ्रंट तसेच बॅक पॅनल दाखविण्यात आला आहे. फोनचा फ्रंट पॅनल पाहता हा फोनचा डिस्प्ले पूर्णपणे बेजल लेस आहे. फ्रंट पॅनल वर कोणतेही नॉच व सेंसर नाही. बोलले जात आहे की हा फोन वीवो की नेक्स सीरीज अंतर्गत लॉन्च होईल. नेक्स सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे यात पण पॉप-अप फ्रंट कॅमेरा असेल जो सेल्फी कमांड देताच फोन बॉडी मधून बाहेर येईल.

वीवो नेक्स च्या या आगामी स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर पण डिस्प्ले देण्यात आला आहे. बक पॅनल वर फोन च्या वरच्या बाजूला जिथे कॅमेरा सेटअप देण्यात आला तिथे खाली ‘वीवो’ चा लोगो आहे. बॅक पॅनल वर मध्य भागी डिस्प्ले आहे. बॅक पॅनल वरील डिस्प्लेची साईज पण फोनच्या फोटो मध्ये खुप मोठी दिसत आहे. बॅक डिस्प्लेच्या वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. तिथ एलईडी फ्लॅश सोबत तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. जे एका रांगेत आहेत.

नेक्स सीरीजच्या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याने फोटो घेता येत होता तर या फोनच्या बॅक पॅनल वरील डिस्प्ले मुळे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ने पण सेल्फी घेता येईल. त्यामुळे कंपनी या स्मार्टफोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा देणार नाही असे वाटते. लीक झालेल्या फोटो मध्ये फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. वीवो च्या या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल की नाही ते नक्की नाही.

वीवो ने अजूनतरी या स्मार्टफोन बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. बोलले जात आहे की कंपनी पुढल्या वर्षी हा स्मार्टफोन आणेल. तोपर्यंत फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व फीचर्स साठी कंपनी कडून मिळणार्‍या माहितीची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here