Vivo S17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 31 May 2023 08:35:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 विवो एस17 सीरीजची दणक्यात एंट्री; तीन दणकट मोबाइल फोन Vivo S17, S17t आणि S17 Pro लाँच https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-and-vivo-s17-pro-launched-in-china-price-features-specifications-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-and-vivo-s17-pro-launched-in-china-price-features-specifications-details-in-marathi/#respond Wed, 31 May 2023 08:35:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21280 विवोनं आज आपली नवीन ‘एस’ सीरीज सादर करून तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं Vivo S17, Vivo S17t आणि Vivo S17 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टायलिश डिजाइन आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची माहिती वाचू शकता. विवो एस17 सीरीजची किंमत Vivo S17 ची किंमत 8GB RAM […]

The post विवो एस17 सीरीजची दणक्यात एंट्री; तीन दणकट मोबाइल फोन Vivo S17, S17t आणि S17 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • स्मार्टफोनमध्ये 4एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे
  • सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 आहे

विवोनं आज आपली नवीन ‘एस’ सीरीज सादर करून तीन नवीन मोबाइल फोन चीनमध्ये सादर केले आहेत. कंपनीनं Vivo S17, Vivo S17t आणि Vivo S17 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत जे स्टायलिश डिजाइन आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आले आहेत. पुढे तुम्ही ह्या सीरीजची माहिती वाचू शकता.

विवो एस17 सीरीजची किंमत

Vivo S17 ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 2499 युआन (जवळपास 29,290 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 2799 युआन (जवळपास 32,900 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 2999 युआन (जवळपास 35,999 रुपये)

Vivo S17 Pro ची किंमत

  • 8GB RAM + 256GB Storage = 3099 युआन (जवळपास 36,000 रुपये)
  • 12GB RAM + 256GB Storage = 3299 युआन (जवळपास 38,300 रुपये)
  • 12GB RAM + 512GB Storage = 3499 युआन (जवळपास 40,500 रुपये)

विवो एस17 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

Vivo S17 Pro

प्रोसेसर : ह्या स्मार्टफोनमध्ये 4एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.1गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी610 जीपीयू आहे. वी17 प्रो अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 वर चालतो.

स्क्रीन : ह्या फोनमध्ये 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेली 6.78 इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. विवोनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

सेल्फी कॅमेरा : Vivo S17 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/2.0 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो.

रियर कॅमेरा : फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/1.98 अपर्चर असेलेल्या 12 मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आणि एफ/2.2 अपर्चरच्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्ससह चालतो.

बॅटरी : विवो एस17 प्रो मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ह्यात 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

Vivo S17

प्रोसेसर : हा विवो फोन 6एनएम क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 2.5गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. फोनमध्ये अँड्रॉइड 13 आधारित ओरिजनओएस 3 आहे तसेच ग्राफिक्ससाठी एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे.

स्क्रीन : हा स्मार्टफोन देखील अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेल्या 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालतो . हा फोन पण इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी विवो एस17 स्मार्टफोन देखील एफ/2.0 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एफ/1.88 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो एस17 5जी फोन देखील 4,600एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये आला आहे 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालतो.

Vivo S17t

विशेष म्हणजे विवो एस17टी मॉडेलचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स सीरीजच्या वॅनिला मॉडेल एस17 सारखे आहेत. परंतु कंपनीनं ह्याच्या प्रोसेसरमध्ये बदल करून Vivo S17t मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 चिपसेटसह मार्केटमध्ये आणला आहे. ग्राफिक्ससाठी हा मोबाइल फोन माली-जी77 जीपीयूला सपोर्ट करतो. विवोनं ह्या मॉडेलची किंमतीत सांगितली नाही.

The post विवो एस17 सीरीजची दणक्यात एंट्री; तीन दणकट मोबाइल फोन Vivo S17, S17t आणि S17 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-and-vivo-s17-pro-launched-in-china-price-features-specifications-details-in-marathi/feed/ 0
80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-smartphone-spotted-in-3c-listing-with-80w-fast-charging/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-smartphone-spotted-in-3c-listing-with-80w-fast-charging/#respond Fri, 12 May 2023 09:25:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20850 चिनी स्मार्टफोन ब्रँड विवो आपल्या नवीन फोन मॉडेल Vivo S17 वर काम करत आहे. हा फोन चायनीज सर्टिफिकेशन वेबसाइट 3C वर लिस्ट झाला आहे. आलेल्या बातमीनुसार हा फोन कंपनी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर करू शकते. ह्या नवीन स्मार्टफोन लाइनअपमध्ये Vivo S17 सोबतच Vivo S17e आणि Vivo S17 Pro चा समावेश केला जाऊ शकतो. विशेष […]

The post 80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo S17 स्मार्टफोन लाँचपूर्वीच दिसला वेबसाइटवर
  • V2283A मॉडेल नंबरसह करण्यात आला लिस्ट
  • भारतात विवो वी29 नावानं केला जाऊ शकतो लाँच.

चिनी स्मार्टफोन ब्रँड विवो आपल्या नवीन फोन मॉडेल Vivo S17 वर काम करत आहे. हा फोन चायनीज सर्टिफिकेशन वेबसाइट 3C वर लिस्ट झाला आहे. आलेल्या बातमीनुसार हा फोन कंपनी 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर करू शकते. ह्या नवीन स्मार्टफोन लाइनअपमध्ये Vivo S17 सोबतच Vivo S17e आणि Vivo S17 Pro चा समावेश केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अंदाज लावला जात आहे की Vivo S17 भारतात Vivo V29 नावानं सादर केला जाऊ शकतो.

विवो एस17 फास्ट चार्जिंग सपोर्ट

Vivo S17 स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशनवर मॉडेल नंबर V2283A सह लिस्ट करण्यात आला आहे. चायना कंप्लसरी सर्टिफिकेट (CCC अर्थात 3C) ही एजेंसी चीनमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना विक्रीपूर्वी सेफ्टी सर्टिफिकेट देते. हे देखील वाचा: OPPO Reno 10 Pro आणि Reno 10 Pro+ भारतीय वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतात लाँच

Vivo S17 स्मार्टफोन 3C च्या वेबसाइटवर कंपनीच्या चार्जर मॉडेल नंबर V8037L0A0-CN, V8037L0B0-CN, आणि V8037L0D0-CN सह लिस्ट करण्यात आला आहे. ह्या चार्जरचा पावर आउटपुट 10W (5V/2A), 18W (9V/2A), आणि 80W (11V/7.3A) आहे. असा आहे त्यामुळे Vivo S17 स्मार्टफोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर केला जाईल, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कंपनीनं Vivo S17 फोनची फास्ट चार्जिंग सुधारली आहे.

विवो एस17 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 1.5K OLED Display
  • Qualcomm Snapdragon 778G

Vivo S सीरीजच्या आगामी Vivo S17 स्मार्टफोनमध्ये 1.5K OLED डिस्प्ले पॅनल दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. Vivo S17 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह लाँच केला जाईल.

  • 12GB RAM, 256GB Storage
  • Android 13

विवोचा हा अपकमिंग स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 256GB स्टोरेज, आणि 12GB रॅम + 256GB आशा तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा फोन लेटेस्ट Android 13 OS वर आधारित कंपनीच्या कस्टम युआयवर चालेल. हे देखील वाचा: Xiaomi चे दिवस गेले? टॉप 3 मधून बाहेर झाली कंपनी! जाणून घ्या भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड

  • 80W Fast Charging
  • 50MP Camera

अपकमिंग Vivo S17 स्मार्टफोनबद्दल चर्चा आहे की हा 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह मार्केटमध्ये येऊ शकतो. फोटोग्राफी पाहता Vivo S17 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX766V चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS)ला सपोर्टसह येईल.

The post 80W फास्ट चार्जिंगसह दिसला Vivo चा नवीन फोन; एस सीरिजमध्ये होऊ शकतो दाखल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s17-smartphone-spotted-in-3c-listing-with-80w-fast-charging/feed/ 0