Vivo U10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 15 Nov 2019 13:02:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/#respond Fri, 15 Nov 2019 13:02:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5793 Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo भारतात आपल्या ‘यू सीरीज’ चा विस्तार करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे कि येत्या 22 नोव्हेंबरला Vivo चा हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल आणि हा फोन Vivo U20 नावाने लॉन्च केला जाईल. Vivo U20 कंपनीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेल्या Vivo U10 चा अपग्रेडेड वर्जन असेल. Vivo U20 शॉपिंग साइट अमेझॉन वर लिस्ट केला गेला आहे जिथे फोनच्या लुक आणि डिजाईन सोबत याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.

असा असेल लुक

Vivo U20 च्या अमेझॉन लिस्टिंग वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Vivo U20 अमेझॉनच्या प्रोडक्ट पेज वर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्यात स्क्रीनच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo U20 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

फोनचा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली ‘AI Triple Camera’ लिहिण्यात आले आहे. फोनच्या रियर पॅनल वर मधोमध फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खालच्या बाजूला Vivo ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. Vivo U20 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

5,000एमएएच बॅटरी

अमेझॉन वर लाईव झालेल्या प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे कि Vivo U20 स्मार्टफोन 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाईल. सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीच्या दाव्यानुसार Vivo U20 फुल चार्ज केल्यानंतर 273 तासांचा स्टॅण्डबाय टाईम, 21 तासांचा इंस्टाग्राम ऍक्सेस, 17 तासांचा फेसबुक आणि 11 तासांचा यूट्यूब ऍक्सेस देऊ शकतो.

Vivo U20 स्पेसिफिकेशन्स

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता अमेझॉन लिस्टिंग मध्ये समजले आहे कि Vivo U20 भारतात 6 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाईल. हा फोन UFS 2.1 स्टोरेज क्षमतेसह येईल. तसेच प्रोसेसिंग साठी Vivo U20 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. आशा आहे कि Vivo U20 इंडियन मार्केट मध्ये एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Vivo U10

या सीरीज मधील स्मार्टफोन Vivo U10 बद्दल बोलायचे तर हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जो 8,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. सोबत Vivo U10 च्या दुसऱ्या वेरिएंटची किंमत 9,990 रुपये आहे जो 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरीला सपोर्ट करतो. Vivo U10 च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 10,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Vivo U10 मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. तसेच फोनची स्टोरेज को 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोन मध्ये मागे 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर सुपर वाइड ऍंगल लेंस आहे. फोन मध्ये तीसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन पण 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला Vivo U20, 22 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u20-with-5000mah-battery-6gb-ram-snapdragon-675-launch-date-22-november-india/feed/ 0
10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 10 स्मार्टफोन, जे गेल्या 30 दिवसांत झाले आहेत भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-vivo-u10-samsung-galaxy-m10s-moto-e6s-lenovo-infinix-tecno-latest-android-smartphone-under-10000-price-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-vivo-u10-samsung-galaxy-m10s-moto-e6s-lenovo-infinix-tecno-latest-android-smartphone-under-10000-price-in-india/#respond Wed, 25 Sep 2019 15:32:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5421 पुढे आम्ही 10 अश्या स्मार्टफोन्सची लिस्ट बनवली आहे जे गेल्या 30 दिवसांत भारतीय बाजारात लॉन्च झाले आहेत.

The post 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 10 स्मार्टफोन, जे गेल्या 30 दिवसांत झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोठा डिस्प्ले, पावरफुल प्रोसेसर, जास्त कॅमेरा सेंसर्स आणि दमदार बॅटरी. हे सर्व फीचर्स जर एकाच स्मार्टफोन मध्ये हवे असतील तर 20,000 रुपये खर्च करावे लागत होते. पण आता भारतातील सर्व टेक ब्रँड्स स्मार्टफोन यूजर्सना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात हे सर्व फीचर्स असलेले मोबाईल बाजारात आणत आहेत. Xiaomi, Samsung व Vivo समवेत इतर दिग्गज ब्रँड्सनी पण भारतात कमी किंमतीत शानदार स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. जर तुम्ही पण स्वस्त बजेट मध्ये दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही 10 अश्या स्मार्टफोन्सची लिस्ट बनवली आहे जे गेल्या 30 दिवसांत भारतीय बाजारात लॉन्च झाले आहेत.

1. Xiaomi Redmi 8A

शाओमी ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Redmi 8A स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात 2 जीबी रॅम आणि 3 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. Xiaomi Redmi 8A चा 2 जीबी रॅम वेरिएंट 6,499 रुपये आणि 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi 8A 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22-इंचाच्या एचडी+ टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई सह हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. Xiaomi Redmi 8A मध्ये 12 मेगापिक्सलचा Sony IMX363 रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन डुअल सिम व 4जी एलटीई सह 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

2. Vivo U10

Vivo ने कालच भारतात आपल्या नवीन ‘यू सीरीज’ ची सुरवात करत Vivo U10 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे ज्यात बेस मॉडल 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि या वेरिएंटची किंमत 8,990 रुपये आहे. तसेच Vivo U10 चे इतर दोन वेरिएंट 3 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज सह लॉन्च झाले आहेत. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 9,990 रुपये आणि 10,990 रुपये आहे. Vivo U10 29 सप्टेंबर पासून अमेझॉन वर विकत घेता येईल.

Vivo U10 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.35 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई सह हा डिवाईस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर वर चालतो. फोटोग्राफी साठी Vivo U10 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे तीन सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

3. Samsung Galaxy M10s

Samsung ने 18 सप्टेंबरला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. Samsung Galaxy M10s कंपनीने 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला आहे जो येत्या 29 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. हा फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M10s 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या V-इनफिनिटी एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह एक्सनॉस 7884B चिपसेट वर चालतो. Galaxy M10s मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सल आणि 5 मेगपिक्सलच्या दोन सेंसर्सला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy M10s 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4,000 एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

4. Moto E6S

Motorola ने गेल्या 16 सप्टेंबरला भारतीय बाजारात आपला पहिला एंडरॉयड स्मार्ट टीवी लॉन्च केला होता. Motorola TV सोबत कंपनीने Moto E6s स्मार्टफोन पण बाजारात आणला होता. हा स्मार्टफोन 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता जो 23 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. हा फोन रिच क्रेनबेरी आणि पॉलिश्ड ग्रेफाइट कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

Moto E6s 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला गेला आहे जो 6.1 इंचाच्या मॅक्स विजन एचडी+ नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड पाई आधारित हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी22 चिपसेट वर चालतो. Moto E6s 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी Moto E6s डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Moto E6s मध्ये पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5. Lenovo A6 Note

Lenovo ने सप्टेंबरच्या 5 तारखेला भारतात एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Lenovo Z6 Pro, Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note स्मार्टफोनचा समावेश होता. Lenovo A6 Note तिन्ही फोन मध्ये सर्वात स्वस्त फोन आहे जो 7,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच 11 सप्टेंबर पासूनच देशात विक्री साठी उपलब्ध झाला आहे.

Lenovo A6 Note मध्ये 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.09-इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड ओएस सोबत फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Lenovo A6 Note मध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर्स आहे. तसेच सेल्फी साठी हा लेनोवो फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Lenovo A6 Note मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. Infinix Hot 8

Infinix Hot 8 ने 4 सप्टेंबरला भारतीय बाजारात पाऊल टाकले होते. हा स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो 12 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. या किंमतीत Infinix Hot 8 स्मार्टफोन यूजर्सना 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

स्पेसिफिकेशन्स पाहता Infinix Hot 8 20:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन 2.0गीगाहर्ट्ज आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Infinix Hot 8 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे तीन सेंसर्स आहेत. तसेच फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Infinix Hot 8 मध्ये पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

7. Tecno Spark Go

टेक कंपनी टेक्नो ने गेल्या 29 ऑगस्टला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते ज्यात Tecno Spark Go आणि Tecno Spark 4 Air चा समावेश होता. Tecno Spark Go यात सर्वात स्वस्त फोन होता जो 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम मेमरी सह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark Go 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर आणि मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा एआई रियर कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

8. Tecno Spark 4 Air

टेक्नो द्वारा लॉन्च केला गेलेला हा दुसरा डिवाईस पण एंट्री सेग्मेंट मध्ये आला आहे. हा स्मार्टफोन 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Tecno Spark 4 Air भारतीय बाजारात 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Tecno Spark 4 Air पण 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड पाई सह हा फोन 2.0 गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो ए22 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी हा टेक्नो फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि सेकेंडरी वीजीए कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Tecno Spark 4 Air 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

9. Samsung Galaxy A10s

सॅमसंगचा हा फोन 27 ऑगस्टला भारतीय बाजारात आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. Samsung Galaxy A10s चा 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर व एक्सनॉस चिपसेट वर हा फोन चालतो. फोटोग्राफी साठी Galaxy A10s मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A10s मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

10. Samsung Galaxy A20s

Samsung ने या आठवड्यात Galaxy A20s ग्लोबल मंचावर ऑफिशियल केला आहे. हा फोन लवकरच भारतात येणार आहे पण 91मोबाईल्सला फोन लॉन्चच्या आधीच Galaxy A20s ची इंडियन किंमत मिळाली आहे. Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट मध्ये भारतात लॉन्च केला जाईल, ज्यात 3 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरी तसेच 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. Samsung आपल्या नवीन स्मार्टफोन Galaxy A20s चा 3 जीबी रॅम वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. तर फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 12,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy A20s 2.4डी ग्लास ने प्रोटेक्टेड 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचे सेंसर्स आहेत. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A20s मध्ये पावर बॅकअप साठी 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे 10 स्मार्टफोन, जे गेल्या 30 दिवसांत झाले आहेत भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-8a-vivo-u10-samsung-galaxy-m10s-moto-e6s-lenovo-infinix-tecno-latest-android-smartphone-under-10000-price-in-india/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-launched-in-india-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-launched-in-india-know-price-specifications/#respond Tue, 24 Sep 2019 12:29:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5400 Vivo U10 कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने अलीकडेच जगातील पहिला डुअल पॉप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Vivo V17 Pro लॉन्च केला होता, ज्याची किंमत 29,990 रुपये होती. आज कंपनीने आपल्या बजेट कॅटगरी मध्ये Vivo U10 सादर केला आहे.

कंपनीच्या U सीरीज मध्ये येणारा हँडसेट ऑनलाइन एक्सक्लूसिव सेल केला जाईल. त्यामुळे कंपनी Vivo U10 पण ई-कॉर्मस अमेझॉन इंडिया वर 29 पासून सेल करेल. U10 च्या 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,990 रुपये, 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,990 रुपये आहे.

डिजाइन

Vivo U10 कंपनीने ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट दिली जाईल तर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचप्रमाणे Vivo U10 वॉटरड्रॉप नॉच सह जी ‘वी’ शेप असेल. Vivo U10 चा डिस्प्ले बेजल लेस आहे. पण खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. त्याचप्रमाणे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण Vivo U10 च्या उजव्या पॅनल वर असेल तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक असेल.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये होईल भारतात लॉन्च, किंमत होईल 10,990 रुपयांपासून सुरु

दमदार बॅटरी

कंपनीने Vivo U10 मध्ये 5,000एमएएच पावर असेलेली बॅटरी दिली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये Vivo U10 यूजरला 4.5 तासांचा टॉकटाईम मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल सेकंडरी सेंसर सुपर वाइड अँगल लेंस सह आहे. फोन मध्ये तिसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च

Vivo U10 कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. या वेरिएंट्स मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-launched-in-india-know-price-specifications/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo U10, किंमत असेल 12,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-to-launch-with-5000mah-battery-triple-rear-camera-specifications-price-24-september/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-to-launch-with-5000mah-battery-triple-rear-camera-specifications-price-24-september/#respond Wed, 18 Sep 2019 13:28:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5348 कंपनी नुसार Vivo U10 फुल चार्ज केल्यानंतर 12 तास यूट्यूब किंवा 15 तास सोशल मीडिया किंवा मग लागोपाठ 7 तासांपर्यंत PUBG खेळात येईल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo U10, किंमत असेल 12,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करत अगदी नवीन ‘यू सीरीज’ आणणार आहे. Vivo येत्या 24 सप्टेंबरला हि सीरीज सादर करेल आणि त्याचदिवशी Vivo U सीरीजचा पहिला स्मार्टफोन Vivo U10 भारतीय बाजारात येईल . Vivo U10 कंपनीचा लो बजेट स्मार्टफोन असेल तसेच Vivo हा फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरच सेल साठी उपलब्ध करेल करून देईल. Vivo U10 साठी शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर प्रोडक्ट पेज आधीच बनले आहे आणि आज या प्रोडक्ट पेजने Vivo U10 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा पण केला आहे.

Vivo U10 च्या अमेझॉन इंडिया वरील प्रोडक्ट पेज वर फोनच्या बॅटरीचे डिटेल सार्वजनिक करण्यात आले आहेत. अमेझॉन व्यतिरिक्त हे डिटेल कंपनीच्या अधिकृत इंडियन वेबसाइट वर पण अपडेट झाले आहेत. Vivo ने यू सीरीजच्या पहिल्या स्मार्टफोन Vivo U10 बद्दल सांगितले आहे कि हा डिवाईस 5,000एमएएच च्या मोठ्या व पावरफुल बॅटरी सह टेक बाजारात लॉन्च केला जाईल तसेच याची बॅटरी फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: 6,000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च झाला Samsung Galaxy M30s, किंमत फक्त 13,999 रुपये

पावरफुल बॅटरी

Vivo U10 मध्ये 5,000एमएएच पावर असेलेली बॅटरी असल्याचा खुलासा करण्यासोबतच Vivo ने सांगितले आहे कि कंपनीचा हा आगामी फोन मोठ्या बॅटरी सोबत 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करेल. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये Vivo U10 यूजरला 4.5 तासांचा टॉकटाईम देईल. तसेच बॅटरी बद्दल बोलायचे तर कंपनी नुसार Vivo U10 फुल चार्ज केल्यानंतर 12 तास यूट्यूब किंवा 15 तास सोशल मीडिया किंवा मग लागोपाठ 7 तासांपर्यंत PUBG खेळात येईल.

लो बजेट असेल Vivo U10

91मोबाईल्सशी बोलताना निपुण मार्या यांनी सांगितले आहे कि Vivo U सीरीज द्वारे कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. सीरीजचा पहिला स्मार्टफोन Vivo U10 पण एक लो बजेट डिवाईस असेल. भारतात या सीरीजची किंमत 7,000 रुपयांपासून 12,000 रुपयांमध्ये असेल. निपुण मार्या यांच्यानुसार Vivo U10 कंपनी एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. त्यामुळे Vivo U10 च्या सर्वात मोठ्या वेरिएंटची किंमत जास्तीत जास्त 12,000 रुपयांच्या असपास असेल.

हे देखील वाचा: Realme 5 ला टक्कर देण्यासाठी आला Samsung Galaxy M10s, किंमत करेल हैराण

ट्रिपल रियर कॅमेरा

Vivo U10 कंपनी ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च करेल. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट दिली जाईल तसेच मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचप्रामणे Vivo U10 वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला जाईल जो ‘वी’ शेपचा असेल. Vivo U10 चा डिस्प्ले बेजल लेस असेल तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. तसेच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण Vivo U10 च्या उजव्या पॅनल वर असतील तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट दिला जाईल. त्याचप्रमाणे फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक असेल.

Vivo U10 चे स्पेसिफिकेशन्स काय असतील तसेच हा कोणत्या किंमतीत देशात सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 24 सप्टेंबरची वाट बघावी लागेल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च होईल Vivo U10, किंमत असेल 12,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u10-to-launch-with-5000mah-battery-triple-rear-camera-specifications-price-24-september/feed/ 0