4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च

Samsung ने काही दिवसांपूर्वी फिलिपिंस मध्ये आपली ‘गॅलेक्सी ए’ सीरीज वाढवत Galaxy A20s स्मार्टफोन सादर केला होता जो ट्रिपल रियर कॅमेरा सह आला आहे. आता सॅमसंग ने आपला हा डिवाईस ग्लोबल मंचावर पण लॉन्च केला आहे. सॅमसंग ने आज आपल्या ग्लोबल वेबसाइट वर गॅलेक्सी ए20एस चे प्रोडक्ट पेज बनवून प्रेस रिलीजच्या माध्यमातून हा फोन अधिकृतपणे लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A20s टेक मंचावर ऑफिशियल केल्यामुळे हा डिवाईस लवकरच भारतात येण्याची शक्यता वाढली आहे.

Samsung Galaxy A20s डिजाईन

सॅमसंग ने गॅलेक्सी ए20एस स्मार्टफोन इनफिनिटी डिस्प्ले वर सादर केला आहे ज्याच्या वर ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. डिस्प्ले दोन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Samsung Galaxy A20s च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे.

Samsung Galaxy A20s स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए20एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.5 इंचाच्या एचडी+ Infinity V डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.4डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. Samsung Galaxy A20s एंडरॉयड 9 पाई आधारित वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वरील क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 506 जीपीयू आहे. आशा आहे कि इंडिया मध्ये पण हा स्मार्टफोन या चिपसेट सह लॉन्च होईल.

Samsung Galaxy A20s ग्लोबल मंचावर दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A20s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A20s डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत एफएम रेडियो पण आहे. सिक्योरिटी साठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A20s मध्ये 4000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. पण Samsung Galaxy A20s भारतात कधी लॉन्च होईल हे निश्चित सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here