Realme 5 ला टक्कर देण्यासाठी आला Samsung Galaxy M10s, किंमत करेल हैराण

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने आज भारतात आपले दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यात Galaxy M30s सह Galaxy M10s चा पण समावेश आहे. दोन्ही फोन कंपनीच्या M सीरीज मध्ये सादर करण्यात आले आहेत. याआधी या दोन्ही फोनचे छोटे वर्जन म्हणजे Galaxy M30 आणि Galaxy M10 लॉन्च केले गेले आहेत. Galaxy M10s बद्दल बोलायचे तर कंपनीने हा बजेट कॅटगरी मध्ये सादर केला आहे, ज्यामुळे हा Realme 5 ला टक्कर देईल.

किंमत आणि उपलब्धता

Samsung Galaxy M10s कंपनीने 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज सह सादर केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हँडसेट ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया सोबत कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर 29 सप्टेंबर पासून सेल केला जाईल. फोन Opal Black, Sapphire Blue आणि Pearl White मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: 13 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor Play 3e, जाणून घ्या किंमत

Samsung Galaxy M10s चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M10s पाहता हा 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एमोलेड 6.4-इंचाच्या V-इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. तसेच Galaxy M10s एंडरॉयड 9 पाई सह कंपनीच्या एक्सनॉस 7884B चिपसेट वर आधारित आहे. स्मार्टफोन मध्ये 3जीबी रॅम आणि 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 4जी डाउनलोड स्पीड मध्ये Jio पुन्हा एक नंबर, वोडाफोन ने इथे मारली बाजी

फोन मध्ये देण्यात आलेल्या कॅमेऱ्या बद्दल बोलायचे झाले तर Galaxy M10s मध्ये मागे डुअल कॅमेरा आहे, ज्यात एक F1.95 अपर्चर सह 13-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि दूसरा वाइड अँगल 5-मेगपिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग ऑप्शन सह देण्यात आली आहे. फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर पण आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here