Vivo V25 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Sep 2022 07:02:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-launched-in-india-with-50-mp-selfie-camera-20gb-ram-know-price-specifications-offer-sale-discount-deals/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-launched-in-india-with-50-mp-selfie-camera-20gb-ram-know-price-specifications-offer-sale-discount-deals/#respond Thu, 15 Sep 2022 07:00:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13127 Vivo V25 India Launch: विवोनं काही दिवसांपूर्वी आपल्या ‘वी’ सीरिजमध्ये दमदार स्मार्टफोन Vivo V25 Pro सादर केला होता. आता या सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन कंपनीनं विवो वी25 नावानं भारतात लाँच केला आहे. Vivo V25 स्मार्टफोन स्मार्टफोन 50MP Selfie Camera सह बाजारात आला आहे. तसेच या मोबाइलमध्ये 12GB RAM, MediaTek Dimensity 900, 64MP Rear Camera आणि […]

The post 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo V25 India Launch: विवोनं काही दिवसांपूर्वी आपल्या ‘वी’ सीरिजमध्ये दमदार स्मार्टफोन Vivo V25 Pro सादर केला होता. आता या सीरिजचा आणखी एक स्मार्टफोन कंपनीनं विवो वी25 नावानं भारतात लाँच केला आहे. Vivo V25 स्मार्टफोन स्मार्टफोन 50MP Selfie Camera सह बाजारात आला आहे. तसेच या मोबाइलमध्ये 12GB RAM, MediaTek Dimensity 900, 64MP Rear Camera आणि 44W Fast Charging सारखे शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

Vivo V25 5G Specifications

विवो वी25 स्मार्टफोनमध्ये 2040 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.44 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती

vivo v25 launched in india with 50 mp selfie camera 20gb ram know price specifications offer sale discount deals

हा विवो मोबाइल 8GB Extended RAM सह येतो म्हणजे इंटरनल रॅमसह 8जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. म्हणजे फोनच्या मोठ्या व्हेरिएंटमध्ये गरज पडल्यास एकूण 20GB रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर Color Changing Fluorite AG Glass देण्यात आलं आहे. हा बॅक पॅनल प्रकाशानुसार रंग बदलतो.

Vivo V25 ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 5G आणि 4G दोन्ही सिम वापरता येतील. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,500एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Tecno Mobile Phones Under 7000: कमी बजेटमध्ये दमदार फीचरसह येणारे जबरदस्त स्मार्टफोन

vivo v25 launched in india with 50 mp selfie camera 20gb ram know price specifications offer sale discount deals

विवो वी25 मध्ये कंपनीनं कॅमेऱ्यावर जास्त लक्ष दिलं असल्याचं दिसत आहे. खासकरून सेल्फीसाठी Vivo V25 च्या फ्रंट पॅनलवर 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चरसह येतो आणि ऑटो आय फोकस फिचरला सपोर्ट करतो. तर मागे एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो OISला स्पॉट करतो. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देखील देण्यात आला आहे.

Vivo V25 5G Price in India

विवो वी25 5जी फोनचे दोन व्हेरिएंट्स भारतीयांच्या सेवेत दाखल झाले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते, कंपनीनं या मॉडेलची किंमत 27,999 रुपये ठेवली आहे. तर Vivo V25 5G चा 12GB RAM व 256GB Storage असलेला मॉडेल 31,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विवो वी25 Elegant Black आणि Surfing Blue कलरमध्ये फ्लिपकार्ट व रिटेल स्टोर्सवर विकत घेता येईल.

The post 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-launched-in-india-with-50-mp-selfie-camera-20gb-ram-know-price-specifications-offer-sale-discount-deals/feed/ 0
32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/#respond Wed, 20 Jul 2022 06:25:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11558 टॅक्स चोरीच्या आरोप असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo नं आपल्या मोबाईल बिजनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. स्मार्टफोन मार्केटबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी भारतात आपली नवीन Vivo V25 series लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील, ज्यातील विवो वी25 प्रो आता BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या […]

The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टॅक्स चोरीच्या आरोप असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo नं आपल्या मोबाईल बिजनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. स्मार्टफोन मार्केटबद्दल बोलायचे झाले तर ही कंपनी भारतात आपली नवीन Vivo V25 series लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरीजमध्ये Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील, ज्यातील विवो वी25 प्रो आता BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु ऑगस्टमध्ये Vivo V25 series सादर केली जाईल अशी चर्चा आहे. सीरीजचा प्रो मॉडेल आता बीआयएस म्हणजे Bureau of Indian Standards certification वर स्पॉट झाला आहे त्यामुळे लवकरच विवो वी25 प्रो स्मार्टफोनसह विवो वी25 देखील भारतात लाँच होऊ शकतो.

Vivo V25 series चा भारतीय लाँच

विवो इंडियानं आतापर्यंत आपल्या नव्या स्मार्टफोन सीरीजच्या लाँचबाबत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी सीरीजचे दोन्ही मॉडेल्स एकत्र लाँच करणार नाही. Vivo V25 स्मार्टफोन आधी म्हणजे ऑगस्टमध्ये लाँच होईल. तर Vivo V25 Pro साठी थोडा वेळ जास्त म्हणजे सप्टेंबर महिन्याची वाट बघावी लागू शकते. हे देखील वाचा: आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली OnePlus ची लाँच डेट समजली; जाणून घ्या OnePlus 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V25 Pro

स्पेसिफिकेशन्स पाहता, या फोनमध्ये 6.56-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 8100 सह सादर केला जाईल. Vivo V25 Pro स्मार्टफोनचे भारतात 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB असे तीन व्हेरिएंट्स येऊ शकतात.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो ज्यात 50MP Sony IMX766V प्रायमरी लेन्स सह 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo V25 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. पावर बॅकअपसाठी या विवो मोबाईलमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल जी 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. विवो वी25 प्रो मोबाईल फोन 40,000 रुपयांमध्ये लाँच होईल, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: OPPO Reno 8 की OnePlus Nord 2T 5G; एकसारखी किंमत असलेल्या दोन्हींपैकी कोणता फोन आहे दमदार?

Vivo V25

विवो वी25 स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटवर चालणार 6.62-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले दिली जाऊ शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 778G SoC किंवा MediaTek Dimensity 1200 SoC मिळू शकतो. हा विवो मोबाईल 44W किंवा 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह फोनमध्ये 16MP चा Selfie कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25-and-vivo-v25-pro-india-launch-price-specification-sale-details/feed/ 0