Vivo Y52s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 May 2021 12:02:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-t1-edition-snapdragon-480-5g-version-launch-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-t1-edition-snapdragon-480-5g-version-launch-specs-price/#respond Mon, 03 May 2021 12:02:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10787 Vivo Y52s (t1 edition) अँड्रॉइड ओएसवर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेटवर चालतो. हा फोन Coral Sea, Monet आणि Titanium Gray कलरमध्ये बाजारात आला आहे.

The post 8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आपला 5G फोन सादर करत हुए Vivo Y52s लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटसह बाजारात आला होता ज्याची बेस किंमत 18,000 रुपयांच्या आसपास आहे. आता वीवोने आपल्या या फोनमध्ये नवीन फेरबदल करून अजून एक मॉडेल मार्केटमध्ये सादर केला आहे. वीवो वाय52एस चा हा नवीन मॉडेल क्वॉलकॉम प्रोसेसरने सुसज्ज केला गेला आहे जो स्नॅपड्रॅगॉन 480 5जी चिपसेटसह चालतो. (Vivo Y52s T1 edition Snapdragon 480 5G version launch specs price)

Vivo Y52s च्या या नवीन मॉडेलला Vivo Y52s (t1 edition) नाव देण्यात आला आहे जो सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे. वीवो वाय52एस चा पहिला मॉडेल मीडियाटेक डायमनसिटी 720 चिपसेटला सपोर्ट करत होता तर या नवीन मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट देण्यात आला आहे. हे दोन्ही चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतात तसेच डुअल बॅंड 5जी वर काम करतात. मीडियाटेक व क्वॉलकॉम दोन्ही कंपन्यांचे हे चिपसेट मिडबजेट फोनसाठी बनवण्यात आले आहेत.

VIVO Y52S चा फोटो

Vivo Y52s (t1 edition)

वीवो वाय52एस च्या या नवीन एडिशनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20.1:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 1080 × 2408 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करत आहे. या नवीन ओपो फोनचे डायमेंशन 164.15×75.35×8.40एमएम आणि वजन 185.5 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

Vivo Y52s (t1 edition) अँड्रॉइड ओएसवर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेटवर चालतो. हा फोन 8 जीबी रॅमसह 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो वाय52एस च्या नवीन एडिशनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन Coral Sea, Monet आणि Titanium Gray कलरमध्ये बाजारात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वाय52एस टी1 एडिशन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटण देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

The post 8GB RAM आणि 5,000mAh बॅटरीसह लॉन्च झाला स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट असलेला Vivo Y52s 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-t1-edition-snapdragon-480-5g-version-launch-specs-price/feed/ 0
धमाका करण्यास 5G स्मार्टफोन मार्केट मध्ये आला स्वस्त Vivo Y52s, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launched-in-china-with-8gb-ram-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launched-in-china-with-8gb-ram-know-price-specification/#respond Tue, 08 Dec 2020 13:35:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9218 Vivo Y52s ची किंमत पाहता, कंपनीने डिवाइसचा 6GB रॅम वेरिएंट CNY 1,598 (जवळपास 18,100 रुपये) मध्ये सादर केला आहे.

The post धमाका करण्यास 5G स्मार्टफोन मार्केट मध्ये आला स्वस्त Vivo Y52s, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मार्केट मध्ये होत असलेले बदल आणि युजर्सची मागणी पाहता Vivo ने आपला नवीन 5G फोन सादर केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Vivo Y52s नावाने सादर केला गेला आहे. सध्या कंपनीने हा फोन आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला आहे आणि आशा आहे कि लवकरच डिवाइस भारतीय बाजारात एंट्री करेल. पण अधिकृतपणे याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. लेटेस्ट मिड-रेंज 5G स्मार्टफोनच्या आधी कंपनीने अजून अनेक नवीन डिवाइस सादर केले आहेत.

Vivo Y52s ची किंमत

Vivo Y52s ची किंमत पाहता, कंपनीने डिवाइसचा 6GB रॅम वेरिएंट CNY 1,598 (जवळपास 18,100 रुपये) मध्ये सादर केला आहे. तसेच हँडसेटच्या 8GB रॅम ऑप्शनची किंमत CNY 1,798 (जवळपास 20,300 रुपये) आहे. फोन चीन मध्ये JD.com वर आधीपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. याची माहिती सर्वात आधी Plafuldroid वेबसाइटने दिली आहे. Y52s कंपनीने Monet, Coral Sea, आणि Titanium Grey कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे जो 12 डिसेंबर पासून विकला जाईल.

हे देखील वाचा : या 10 स्टेप्स फॉलो करून स्वतःच करा आपल्या आधार कार्ड मध्ये नाव, पत्त्यासह इतर बदल

Vivo Y52s चे स्पेसिफिकेशन्स

हा फोन कंपनीने 6.58-इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2,408 पिक्सल) डिस्प्ले सह सादर केला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20.1:9 आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 720 SoC आहे. फोन मध्ये 6GB रॅम व 8GB रॅम सह 128GB की स्टोरेज पण देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : यादिवशी भारतात येईल Jio चे 5G, मुकेश अंबानींनी केला खुलासा

Vivo Y52s मधील कनेक्टिविटी ऑप्शंस मध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.1, GPS / A-GPS, USB टाइप- C आणि 3.5mm च्या हेडफोन जॅकचा समावेश आहे. बोर्ड वर सेंसर मध्ये एक एक्सीलरोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि एक सेंसर आहे. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. Vivo Y52s मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 18W ड्यूल इंजन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. तसेच फोनचा आकार 164.15×75.35×8.40 मिमी आहे आणि याचे वजन 185.5 ग्राम आहे.

The post धमाका करण्यास 5G स्मार्टफोन मार्केट मध्ये आला स्वस्त Vivo Y52s, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launched-in-china-with-8gb-ram-know-price-specification/feed/ 0
5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह येत आहे Vivo Y52s https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launch-soon-with-5000mah-battery-48mp-dual-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launch-soon-with-5000mah-battery-48mp-dual-rear-camera/#respond Fri, 04 Dec 2020 12:38:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9164 समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Vivo Y52s सादर करण्याची योजना बनवत आहे.

The post 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह येत आहे Vivo Y52s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फोन निर्माता कंपनी Vivo अनेक दिवसांपासून मार्केट मध्ये आपले नवीन फोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहे. शाओमी-रियलमी सारख्या कंपन्यांना पण टक्कर देण्यासाठी वीवो देश-विदेशात नवीन टेक्नोलॉजी सह आपले फोन्स लॉन्च करण्यापासून मागे हटत नाही. तसेच, आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Vivo Y52s सादर करण्याची योजना बनवत आहे. रिपोर्ट्सनुसार हँडसेट अलीकडेच चीन दूरसंचारच्या प्रोडक्ट लाइब्रेरी मध्ये दिसला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मॉडेल नंबर V2057A सह येईल. आता हा डिवाइस चायनीज सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म 3C आणि TENAA वर स्पॉट केला गेला आहे.

किंमत आणि कलर ऑप्शन

China Telecom लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि Vivo Y52s या महिन्यात म्हणजे 10 डिसेंबर विक्रीसाठी सादर केला जाईल. याची किंमत 1,998 Yuan (जवळपास 22,546 रुपये) असेल. फोन Titanium Gray, Monet आणि Color Sea कलर मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 16एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन भारतात लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये

स्पेसिफिकेशन्स

Vivo Y52s चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.58-इंच IPS LCD पॅनल वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला जाऊ शकतो. पण सध्या याची माहिती मिळाली नाही कि फोन फुल एचडी+ रेजोल्यूशन 1080 x 2408 पिक्सल सह येईल कि यापेक्षा जास्त पिक्सलला सपोर्ट करेल. फोन मध्ये MediaTek Dimensity 720 SoC असेल. याचा अर्थ असा आहे कि फोन 5G सपोर्ट सह सादर केला जाईल. या SoC सह 8GB की रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : मित्राला घ्यायला सांगा Samsung का स्मार्टफोन आणि मिळवा 7500 रुपयांची बक्षीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॅक पॅनल पाहता Vivo Y52s मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी लेंस दिली जाईल. तसेच फोन मध्ये प्रीइंस्टॉल अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,910mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच फोनची साइज 164.15 x 75.35 x 8.4mm आणि वजन 185.5 ग्राम असेल.

The post 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह येत आहे Vivo Y52s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y52s-launch-soon-with-5000mah-battery-48mp-dual-rear-camera/feed/ 0