आधार कार्ड म्हणजे प्रत्येक भारतीयांची ओळख. सध्या छोट्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आधार कार्ड बनवले जाते. शाळा-हॉस्पिटलच्या कामांपासून बॅंक व इतर सरकारी कामांमध्ये ओळख म्हणून Aadhaar Card ला प्राधान्य दिले जाते. कधी कधी असे होते कि एखाद्या कारणामुळे आपल्याला आधार कार्ड मध्ये काही बदल करावे लागतात आणि यात घराचा पत्ता आणि नावाची स्पेलिंग इत्यादींचा समावेश आहे. अश्या कामासाठी आधार सेंटरच्या चकरा माराव्या लागतात आणि मोठ्या रांगेत उभे राहावे लागते. पण आज आम्ही तुम्हाला अशी सोप्पी पद्धत सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या इंटरनेट वर स्वतः ऑनलाईन हे बदल करू शकता आणि यासाठी कोणाच्या मागे पुढे फिरावे लागणार नाही किंवा अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
अशी बदल आपली माहिती :
1. सर्वप्रथम आधार कार्डची ऑफिशियल वेबसाइट ओपन करा : uidai.gov.in
2. इथे खाली स्क्रॉल केल्यावर ‘अपडेट डेमोग्राफिक डेटा’ चा ऑप्शन मिळेल, यावर क्लिक करा.
3. इथे नवीन टॅब ओपन होईल, तुम्हाला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ ची वर क्लिक करावे लागेल.
4. डेटा अपडेट होण्याआधी आधार कार्डचा नंबर मागितला जाईल जे वेरीफाय केल्यावर रजिट्रर्ड मोबाईल नंबर वर ओटीपी पण पाठवला जाईल, तो सबमिट करा.
5. लॉग इन झाल्यानंतर पुन्हा ‘अपडेट डेमोग्राफिक डेटा’ ऑप्शनची निवड करा, त्यानंतर जे बदल करायचे आहेत ती माहिती भरा.
हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता
6. इथे नाव, पत्ता, जन्म तारीख, मोबाईल नंबर, भाषा, जेंडर आणि ईमेल सारखे अनेक ऑप्शन मिळतील, तुम्हाला ज्यात बदल करायचे आहे त्यावर क्लिक करून नवीन माहिती भरा.
हे देखील वाचा : दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत
7. नवीन माहिती इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेत भरण्याचा पर्याय मिळेल. इथे खास लक्ष देण्याची गरज आहे, कि तुम्ही जे पण माहिती सब्मिट करत आहात नीट वाचून घ्या.
8. सर्व डिटेल्स भरल्यानंतर ऍड्रेस प्रूफ म्हणून कोणताही एक आयडी अपलोड करावी लागेल. हि पीडीएफ, जेपीईजी किंवा पीएनजी कोणत्याही फॉर्मेट मध्ये अपलोड करता येईल.
9. फॉर्म कंपलीट झाल्यानंतर 50 रुपयांची ऑनलाईन पेमेंट करावे लागेल, जे डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बॅंकिंगच्या माध्यमातून करता येईल.
10. पेमेंट यशस्वी झाल्यावर मोबाईल नंबर वर कंफर्मेशन सह यूआरएन कोड पाठवला जाईल. या कोडच्या माध्यमातून नंतर अपडेशन प्रोसेस ट्रॅक करता येईल.