यादिवशी भारतात येईल Jio चे 5G, मुकेश अंबानींनी केला खुलासा

भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये कमाल केल्यानंतर रिलायंस जियो आता भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन बनवण्याचे काम करत आहे, ज्याची किंमत 2,500 रुपयांपेक्षा कमी असू शकते. आता कंपनीने याची घोषणा केली आहे कि पुढल्या वर्षी म्हणजे 2021 च्या मध्यात जियो 5G नेटवर्क सादर केले जाईल. पण कोणत्याही तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

यादिवशी येईल 5G

आशा आहे कि दरवर्षीप्रमाणे कंपनी पुढल्या वर्षी होणाऱ्या ऍन्युअल जनरल मीटिंग (AGM) मध्ये जी ऑगस्ट मध्ये होते त्या दिवशी 5G सेवा लॉन्च करेल. पण यावर कोणतीही अधिकृत कमेंट आली नाही. मुकेश अंबानींनी एका विधानात म्हटले आहे कि रिलायंस जियो 2021 च्या दुसऱ्या सहामाहीत 5जी सेवा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रियेचा वेग वाढवण्याची गरज आहे. त्यांनी म्हटले आहे कि जोपर्यंत हि धोरणात्मकदृष्ट्या सोप्पी आणि स्वस्त बनवली जाणार नाही तोपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य नाही.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी आणि 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला किफायतशीर Moto G9 Power भारतात झाला लॉन्च, Samsung ची वाढेल का अडचण?

काही महिन्यांपूर्वी अमेरिकाच्या सॅन डियागो मध्ये झालेल्या एका वर्चुअल इवेंट मध्ये आपल्या 5G सेवेचे प्रदर्शन केले होते. या इवेंट मध्ये रिलायंस जियोचे प्रेसिडेंट मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम इवेंट मध्ये सांगितले कि क्वालकॉम आणि रिलायंसची सब्सिडरी रेडिसिस सह आम्ही 5जी टेक्नॉलॉजी वर काम करत आहोत आहेत जेणेकरून भारतात हि टेक्नॉलॉजी लवकर लॉन्च करता येईल.

मिळेल 1 Gbps bps चा स्पीड

या टेस्टिंग नंतर भारत त्या एलिट देशांच्या लिस्ट मध्ये समाविष्ट झाला आहे जे आपल्या युजर्सना 1 Gbps स्पीड देतात. सध्या अमेरिका, साउथ कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी असे देश आहेत जे आपल्या 5जी कस्टमर्सना 1 Gbps स्पीड देत आहेत.

हे देखील वाचा : स्वस्त Nokia 3.4 भारतात या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, देईल का चीनी कंपन्यांना आव्हान?

मेड इन इंडिया असेल 5G

जवळपास तीन महिन्यांपूर्वी 15 जुलैला रिलायंसच्या इंडस्ट्रीच्या बैठकीत रिलायंस जियोचे मलिक मुकेश अंबानींनी 5जी टेक्नोलॉजीच्या सुरवातीची घोषणा केली होती. देशातील साधनांचा वापर करून विकसित करण्यात आलेली हि टेक्नॉलॉजी देश देत मुकेश अंबानींनी म्हटले होते कि 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच रिलायंस जियो 5जी टेक्नॉलॉजीच्या टेस्टिंगसाठी तयार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here