5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह येत आहे Vivo Y52s

फोन निर्माता कंपनी Vivo अनेक दिवसांपासून मार्केट मध्ये आपले नवीन फोन्स सादर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहे. शाओमी-रियलमी सारख्या कंपन्यांना पण टक्कर देण्यासाठी वीवो देश-विदेशात नवीन टेक्नोलॉजी सह आपले फोन्स लॉन्च करण्यापासून मागे हटत नाही. तसेच, आता समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Vivo Y52s सादर करण्याची योजना बनवत आहे. रिपोर्ट्सनुसार हँडसेट अलीकडेच चीन दूरसंचारच्या प्रोडक्ट लाइब्रेरी मध्ये दिसला होता. लिस्टिंग मध्ये समोर आले होते कि फोन मॉडेल नंबर V2057A सह येईल. आता हा डिवाइस चायनीज सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्म 3C आणि TENAA वर स्पॉट केला गेला आहे.

किंमत आणि कलर ऑप्शन

China Telecom लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि Vivo Y52s या महिन्यात म्हणजे 10 डिसेंबर विक्रीसाठी सादर केला जाईल. याची किंमत 1,998 Yuan (जवळपास 22,546 रुपये) असेल. फोन Titanium Gray, Monet आणि Color Sea कलर मध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 16एमपी क्वॉड कॅमेरा असलेला हा शानदार फोन भारतात लॉन्च, किंमत फक्त 9,999 रुपये

स्पेसिफिकेशन्स

Vivo Y52s चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.58-इंच IPS LCD पॅनल वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला जाऊ शकतो. पण सध्या याची माहिती मिळाली नाही कि फोन फुल एचडी+ रेजोल्यूशन 1080 x 2408 पिक्सल सह येईल कि यापेक्षा जास्त पिक्सलला सपोर्ट करेल. फोन मध्ये MediaTek Dimensity 720 SoC असेल. याचा अर्थ असा आहे कि फोन 5G सपोर्ट सह सादर केला जाईल. या SoC सह 8GB की रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : मित्राला घ्यायला सांगा Samsung का स्मार्टफोन आणि मिळवा 7500 रुपयांची बक्षीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॅक पॅनल पाहता Vivo Y52s मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 48-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी लेंस दिली जाईल. तसेच फोन मध्ये प्रीइंस्टॉल अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम असेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,910mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच फोनची साइज 164.15 x 75.35 x 8.4mm आणि वजन 185.5 ग्राम असेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here