Vivo Y56 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:48:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-vivo-y56-5g-launched-in-india-check-price-and-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-vivo-y56-5g-launched-in-india-check-price-and-specifications-details/#respond Thu, 16 Feb 2023 11:36:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17888 विवो सध्या बाजारात पुन्हा सक्रिय झाली आहे. लवकरच कंपनीची ‘व्ही 27 सीरिज’ भारतीय बाजारात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी कंपनीनं Vivo Y100 स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. आता बातमी आली आहे की कंपनीनं आपल्या ‘वाय’ सीरीजचा आणखी मोबाइल फोन Vivo Y56 5G देखील भारतीय बाजारात आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा विवो 5जी फोन […]

The post गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y56 5G फुल स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
  • हा विवो फोन ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
  • हा 5जी फोन 8GB RAM आणि Mediatek Dimensity 700 वर चालतो.

विवो सध्या बाजारात पुन्हा सक्रिय झाली आहे. लवकरच कंपनीची ‘व्ही 27 सीरिज’ भारतीय बाजारात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी कंपनीनं Vivo Y100 स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. आता बातमी आली आहे की कंपनीनं आपल्या ‘वाय’ सीरीजचा आणखी मोबाइल फोन Vivo Y56 5G देखील भारतीय बाजारात आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा विवो 5जी फोन देशातील ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे आणि जो फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y56 5G Price

Vivo Y56 5G इंडिया लाँचची माहिती रिटेलर महेश टेलीकॉमच्या माध्यमातून समोर आली आहे. या युजरनं फोन बॉक्सचा फोटो शेयर करत सांगितलं आहे की विवो वाय56 5जी मार्केटमध्ये आला आहे जो 19,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनी वेबसाइटवर हा फोन लिस्ट झाला आहे परंतु ऑनलाइन खरेदी करता येत नाही. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

Vivo Y56 5G Specifications

  • 6.58″ FHD+ Display
  • 18W 5,000mAh Battery
  • 50MP Dual Rear Camera
  • Mediatek Dimensity 700
  • 8GB RAM + 128GB Storage

Vivo Y56 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2408 × 1080 pixels आहे. त्याचबरोबर यात 60Hz रिफ्रेश रेट, वॉटरड्रॉप नॉच आहे. फोनला पावर देण्यासाठी MediaTek Dimensity 700 SoC सह 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. तसेच फोन 8GB extendable RAM ला सपोर्ट करतो.

इतकेच नव्हे तर डिवाइस Android 13 बेस्ड Funtouch OS custom skin वर चालतो. फोटोग्राफीसाठी Vivo Y56 मध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP सेकंडरी लेन्स मिळते. सेल्फीसाठी f/2.0 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही 5000mAh Battery आणि 6GB RAM; Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh battery देण्यात आली आहे जी 18W fast charging support सह येते. तसेच फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटी फीचर्स पाहता 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

The post गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-phone-vivo-y56-5g-launched-in-india-check-price-and-specifications-details/feed/ 0
आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/#respond Mon, 13 Feb 2023 10:28:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17754 Vivo Y100 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता या सीरीजच्या अजून एका स्वस्त 5जी फोन Vivo Y56 5G ची बातमी समोर आली आहे की हा विवो मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. एका नवीन लीकमध्ये वाय56 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्सवरील पडदा हटला आहे आणि हा स्मार्टफोन 8GB […]

The post आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y56 लो बजेट 5जी फोन असेल.
  • हा MediaTek Dimensity 700 प्रोसेसर वर काम करेल.
  • फोनमध्ये 8GB RAM + 128GB Storage मिळेल.

Vivo Y100 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता या सीरीजच्या अजून एका स्वस्त 5जी फोन Vivo Y56 5G ची बातमी समोर आली आहे की हा विवो मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. एका नवीन लीकमध्ये वाय56 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्सवरील पडदा हटला आहे आणि हा स्मार्टफोन 8GB RAM तसेच MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो.

Vivo Y56 5G

  • 6.5″ HD+ 60Hz Display
  • 8GB + + 128GB Storage
  • MediaTek Dimensity 700
  • 13MP + 2MP Rear Camera
  • 10W 5,000mAh Battery

विवो वाय56 5जी फोनची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटच्या माध्यमातून फोनच्या बॅक पॅनलच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील देण्यात आली आहे. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा विवो फोन मीडियाटेकच्या डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो जो ड्युअल मोड 5जी SA/NSAला सपोर्ट करू शकतो. सांगण्यात आलं आहे की या स्माटफोनमध्ये अँड्रॉइड 12 ओएस मिळू शकतो.

Vivo Y56 5G फोनचा सिंगल मेमरी व्हेरिएंटच सध्या समोर आला आहे ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असल्याचं समजतं. लीकनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.

Vivo Y100 Specifications

  • 6.38″ FHD+ 90Hz Display
  • 8GB + 8GB = 16GB RAM
  • MediaTek Dimensity 900
  • 64MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Camera
  • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 5जी फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह 24,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 सह 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे.

Vivo Y100 5G 6.38 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी विवो वाय100 च्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल बोका लेन्स + 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-5g-phone-vivo-y56-5g-specification-leaked-launch-in-india-soon/feed/ 0