5000mAh Battery आणि 6GB RAM सह Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री

Highlights

  • Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 3GB RAM आणि 2GB RAM सह लाँच झाला आहे.
  • Extended RAM टेक्नॉलॉजीसह फोनला 6GB RAM ची पावर मिळते.
  • फुल चार्ज नंतर हा मोबाइल 29 दिवसांचा स्टॅन्ड बाय टाइम देऊ शकतो.

टेक्नो ब्रँड आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्ससाठी भारतात प्रसिद्ध आहे. त्यातल्या त्या कंपनीची ‘पॉप’ सीरीज एंट्री लेव्हल स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. कंपनीनं या सीरिजचा विस्तार करत नवीन Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एंट्री लेव्हल डिवायस आहे जो फक्त 6,799 रुपयांमध्ये भारतात सेलसाठी उपलब्ध होईल. पॉप 7 प्रो मध्ये 3GB RAM सह MediaTek Helio A22 चिपसेट देण्यात आला आहे.

Tecno Pop 7 Pro Price

टेक्नो पॉप 7 प्रो भारतीय बाजारात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये 2 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठा व्हेरिएंट 3 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 6,799 रुपये आणि 7,299 रुपये आहे. Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारीपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर Endless Black आणि Uyuni Blue कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

Tecno Pop 7 Pro Specifications

  • 6.6″ HD+ Display
  • 3GB+3GB = 6GB RAM
  • MediaTek Helio A22
  • 5,000mAh Battery
  • 12MP AI Dual Rear Camera

टेक्नो पॉप 7 प्रो स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेवर 480निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळतात. या फोनचे डायमेंशन 163.86 X 75.51 X 8.9एमएम आहे.

Tecno Pop 7 Pro स्मार्टफोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरवर काम करतो. हा फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो 2जीबी रॅम व्हेरिएंट एक्स्ट्रा 2जीबी रॅम तसेच 3जीबी रॅम व्हेरिएंट अतिरिक्त 3जीबी रॅमची ताकद देतो. म्हणजे हा टेक्नो मोबाइल गरज पडल्यास 6जीबी रॅमची परफॉर्मन्स देऊ शकतो.

फोटोग्राफीसाठी टेक्नो पॉप 7 प्रो मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.85 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एआय लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 149 रुपयांमध्ये 15 पेक्षा जास्त OTT आणि मोफत डेटा; Airtel नं आणला नवा स्वस्त प्लॅन

Tecno Pop 7 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो हायओएस 11.0 सह चालतो. या फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हा फोन IPX2 रेटेड आहे ज्यामुळे पाण्याच्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here