गुपचूप बाजारात आला Vivo Y56 5G; 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह इतकी आहे किंमत

Highlights

  • Vivo Y56 5G फुल स्पेसिफिकेशन्ससह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
  • हा विवो फोन ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
  • हा 5जी फोन 8GB RAM आणि Mediatek Dimensity 700 वर चालतो.

विवो सध्या बाजारात पुन्हा सक्रिय झाली आहे. लवकरच कंपनीची ‘व्ही 27 सीरिज’ भारतीय बाजारात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी कंपनीनं Vivo Y100 स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. आता बातमी आली आहे की कंपनीनं आपल्या ‘वाय’ सीरीजचा आणखी मोबाइल फोन Vivo Y56 5G देखील भारतीय बाजारात आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा विवो 5जी फोन देशातील ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे आणि जो फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y56 5G Price

Vivo Y56 5G इंडिया लाँचची माहिती रिटेलर महेश टेलीकॉमच्या माध्यमातून समोर आली आहे. या युजरनं फोन बॉक्सचा फोटो शेयर करत सांगितलं आहे की विवो वाय56 5जी मार्केटमध्ये आला आहे जो 19,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंपनी वेबसाइटवर हा फोन लिस्ट झाला आहे परंतु ऑनलाइन खरेदी करता येत नाही. हे देखील वाचा: लॅपटॉपपेक्षा जास्त रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग; गेमर्ससाठी iQOO Neo 7 झाला भारतात लाँच

Vivo Y56 5G Specifications

  • 6.58″ FHD+ Display
  • 18W 5,000mAh Battery
  • 50MP Dual Rear Camera
  • Mediatek Dimensity 700
  • 8GB RAM + 128GB Storage

Vivo Y56 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.58-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2408 × 1080 pixels आहे. त्याचबरोबर यात 60Hz रिफ्रेश रेट, वॉटरड्रॉप नॉच आहे. फोनला पावर देण्यासाठी MediaTek Dimensity 700 SoC सह 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. तसेच फोन 8GB extendable RAM ला सपोर्ट करतो.

इतकेच नव्हे तर डिवाइस Android 13 बेस्ड Funtouch OS custom skin वर चालतो. फोटोग्राफीसाठी Vivo Y56 मध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP सेकंडरी लेन्स मिळते. सेल्फीसाठी f/2.0 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: यापेक्षा स्वस्तात मिळणार नाही 5000mAh Battery आणि 6GB RAM; Tecno Pop 7 Pro ची भारतात एंट्री

फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh battery देण्यात आली आहे जी 18W fast charging support सह येते. तसेच फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. कनेक्टिव्हिटी फीचर्स पाहता 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here