आगामी Vivo Y56 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक

Highlights

 • Vivo Y56 लो बजेट 5जी फोन असेल.
 • हा MediaTek Dimensity 700 प्रोसेसर वर काम करेल.
 • फोनमध्ये 8GB RAM + 128GB Storage मिळेल.

Vivo Y100 24,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आता या सीरीजच्या अजून एका स्वस्त 5जी फोन Vivo Y56 5G ची बातमी समोर आली आहे की हा विवो मोबाइल लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. एका नवीन लीकमध्ये वाय56 5जी फोनच्या स्पेसिफिकेशन्सवरील पडदा हटला आहे आणि हा स्मार्टफोन 8GB RAM तसेच MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो.

Vivo Y56 5G

 • 6.5″ HD+ 60Hz Display
 • 8GB + + 128GB Storage
 • MediaTek Dimensity 700
 • 13MP + 2MP Rear Camera
 • 10W 5,000mAh Battery

विवो वाय56 5जी फोनची माहिती टिपस्टर पारस गुगलानीच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटच्या माध्यमातून फोनच्या बॅक पॅनलच्या फोटो सोबतच स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील देण्यात आली आहे. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की हा विवो फोन मीडियाटेकच्या डिमेनसिटी 700 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो जो ड्युअल मोड 5जी SA/NSAला सपोर्ट करू शकतो. सांगण्यात आलं आहे की या स्माटफोनमध्ये अँड्रॉइड 12 ओएस मिळू शकतो.

Vivo Y56 5G फोनचा सिंगल मेमरी व्हेरिएंटच सध्या समोर आला आहे ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असल्याचं समजतं. लीकनुसार हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतो. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.

Vivo Y100 Specifications

 • 6.38″ FHD+ 90Hz Display
 • 8GB + 8GB = 16GB RAM
 • MediaTek Dimensity 900
 • 64MP Triple Rear Camera
 • 16MP Selfie Camera
 • 44W 4,500mAh Battery

विवो वाय100 5जी फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजसह 24,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 सह 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या मीडियाटेक डिमेनसिटी 900 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. हा विवो फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे.

Vivo Y100 5G 6.38 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी विवो वाय100 च्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल बोका लेन्स + 2 मेगापिक्सलची सुपर मॅक्रो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here