Xiaomi Mi 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला शाओमीचा दमदार मी 9 स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-launch-today-in-china-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-launch-today-in-china-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 09:50:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3663 Mi 9 ट्रांसपेरेंट एडिशन मध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

The post 12जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला शाओमीचा दमदार मी 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने आज आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 9 सादर केला आहे. लॉन्चच्या आधीच शाओमीचे सीईओ ली जून आणि प्रेसिडेंट लिन बिन यांनी या फोनचे काही महत्वाचे फीचर सार्वजनिक केले होते. खाली आम्ही फोन संबंधित फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

शाओमी मी 9 ची किंमत
Mi 9 ची किंमत पाहता याच्या एंट्री-लेवल वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, ज्याची किंमत आरएमबी 2,999 (जवळपास 32,000 रुपये) आहे. तर याच्या 8जीबी + 128जीबी वेरिएंटची किंमत आरएमबी 3,299 (जवळपास 35,000 रुपये) आहे. त्याचबरोबर कंपनी ने मी 9 चा ट्रांसपेरेंट एंडिशन पण लॉन्च केला आहे जो 12जीबी रॅम+ 256जीबी स्टोरेज सह येतो. या वेरिएंटची किंमत आरएमबी 3,999 (जवळपास 42,300 रुपये) आहे. शाओमी मी 9 डीप स्पेस ग्रे, ग्रेडिएंट ब्लू आणि ग्रेडिएंट पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

याव्यतिरिक्त कंपनी ने या इवेंट मध्ये वायरलेस चार्जिंग पावर बँक पण सादर केली आहे.10 वॉट पावर आउटपुट सह येणाऱ्या या चार्जिंग पावर बँकची किंमत आरएमबी 149 (जवळपास 1,580 रुपये) आहे. तसेच दुसऱ्या मॉडेल मध्ये 20 वॉट वायरलेस चार्जिंग आउटपुट आहे, ज्याची किंमत आरएमबी 169 (जवळपास 1,800 रुपये) आहे. तर स्टॅंडर्ड 20W क्यूई-अनुरूप वायरलेस चार्जिंग पॅडची किंमत आरएमबी 99 (जवळपास 1,050 रुपये) आहे.

रियलमी 3 लवकरच होईल लॉन्च, वीडियो आला समोर

हॅन्डसेट मध्ये 7एनएम प्रोसेस ने बनलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक ऑक्टाकोर प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.84 गीगाहर्ट्ज आहे. तसेच मी 9 मध्ये 6.39-इंचाचा सॅमसंग एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनुसार हा खूप वेगवान इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. यासाठी कंपनी ने यात थर्ड जेनरेशन इन डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर वापरला आहे.

शाओमी मी 9 वाटरड्रॉप नॉच सह येतो, ज्यात 24-मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर आहे. तसेच फोनच्या बॅकला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एक सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत मागील बाजूस 2एक्स ऑप्टिकल झूम असलेला 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे.

एयरटेलच्या दुप्पट 4जी स्पीड देत आहे जियो, जाणून घ्या इतर कंपन्यांची स्थिती

प्रोटेक्टिव कवर मधून 20 वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येणाऱ्या या फोन मध्ये 3,300 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन कनेक्टिविटी साठी यूएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक, 4 जी वीओएलटीई, ब्लूटूथ आणि वाई-फाई सपोर्टचा समावेश आहे.

मी 9 एसई, ट्रांसपेरेंट/एक्सप्लोरर एडिशन चे स्पेसिफिकेशन्स
या इवेंट मध्ये कंपनी ने मी 9 ट्रांसपेरेंट एंडिशन ची घोषणा पण केली आहे. त्याचबरोबर ट्रांसपेरेंट एडिशन 40 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह येतो. Mi 9 ट्रांसपेरेंट एडिशन मध्ये 12जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर लो-एंड वेरिएंट मी 9 एसई मध्ये 5.97-इंच डिस्प्ले, 3,070एमएएच बॅटरी, 18 वॉट फास्ट चार्जिंग, 48एमपी + 8एमपी + 13एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 712 एसओसी आहे. तसेच यात 6जीबी रॅम आणि 64जीबी व 128जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे.

The post 12जीबी रॅम आणि 48एमपी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला शाओमीचा दमदार मी 9 स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-launch-today-in-china-in-marathi/feed/ 0
लॉन्चच्या आधी शाओमी मी 9 ची माहिती आली समोर, 12जीबी रॅम आणि 48एमपी चा असेल कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-12gb-ram-and-48mp-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-12gb-ram-and-48mp-camera-in-marathi/#respond Mon, 18 Feb 2019 07:46:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3645 शाओमी मी 9 चा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.7 परसेंट आहे.

The post लॉन्चच्या आधी शाओमी मी 9 ची माहिती आली समोर, 12जीबी रॅम आणि 48एमपी चा असेल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
संपूर्ण जगाला माहितीच आहे कि शाओमी नेहमीच सॅमसंगला टक्कर देत आली आहे. सॅमसंग जेव्हा पण काही प्लान करते त्याआधी शाओमी आपला नवीन डिवाइस सादर करते. अलीकडेच समजले होते कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 सह 12जीबी रॅम असलेला मॉडेल सादर करू शकते. परंतु सॅमसंगच्या आधीच शाओमी ने आपल्या नवीन मी 9 ची माहिती दिली आहे ज्यात 12जीबी रॅम असेल. खास बाब अशी कि शाओमीच्या या फोनची माहिती स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सोबत फोनचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

शाओमीच्या अधिकाऱ्याने काय म्हटले
शाओमी मी 9 चे स्पेसिफिकेशन स्वतः कंपनीचे फाउंडर, चेयरमेन आणि सीईओ ली जून यांनी सांगितले आहेत. त्यांनी यासाठी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर एक पोस्ट केली आहे ज्यात लिहिले आहे “आम्ही सावधानतापूर्वक शाओमी 9 चा ट्रांसपॅरेन्ट एडिशन तयार केला आहे.” सोबत त्यांनी या फोनच्या काही स्पेसिफिकेशनची पण माहिती दिली आहे.

त्यांनी माहिती दिली आहे कि ”या फोन मध्ये तुम्हाला न्यू स्काई—फाई स्टाइल सह 7—पीस लेंस असलेला कॅमेरा मिळेल. फोन मध्ये एफ/1.4 अपर्चर सह 48—मेगापिक्सलचा कॅमेरा असेल आणि 12जीबी रॅम असेल.”

त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये फोनच्या डिजाइन बद्दल पण काही कमेंट केल्या आहेत आणि लिहिले आहे कि या फोनचा बॅक पॅनल पण खूप पातळ आहे आणि ट्रांसपॅरेन्ट आहे. या पोस्ट सोबत त्यांनी फोटो पण शेयर केला आहे. हा फोन दिसायला गेल्यावर्षी लॉन्च शाओमी मी 8 एक्सप्लोर एडिशन सारखा वाटतो.

चीन पेक्षा पण जास्त भारतात विकले जातात शाओमीचे फोन!

शाओमी मी 9 चे स्पेसिफिकेशन
आतापर्यंत या फोन बद्दल बरीच माहिती समोर आली आहे ज्यानुसार शाओमी मी 9 मध्ये तुम्हाला कोर्निेंग गोरिल्ला ग्लास ची कोटिंग मिळेल. सोबत कंपनी फोटोग्राफी साठी यात लेजर ऑटोफोकस सारखे फीचर्स देऊ शकते. तसेच पीडीएएफ आणि सीडीएएफ (फेस एंड कॉन्ट्रास्ट डिटेक्शन ऑटोफोकस) सारखे फीचर्स पण मिळतील. तसेच आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये क्लोज्ड—लूप वाइस क्वाइल मोटर दिली जाईल जी ऑटो फोकस अजून चांगले करेल.

कंपनीचा दावा आहे कि शाओमी मी 9 मध्ये तुम्हाला ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. हि फिंगरप्रिंट स्कॅनरची पाचवी जेनरेशन आहे जी आधीच्या सेंसरच्या तुलनेत 25 टक्के जास्त फास्ट आहे.

हे शाओमी स्मार्टफोन होतील नवीन आणि एडवांस मीयूआई 11 ने अपडेट, बघा तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये

शाओमी मी 9 मध्ये सॅमसंग निर्मि​त एमोलेड पॅनलचा वापर केला गेला आहे जो एफएचडी+ डिस्प्ले सह येतो. तसेच या फोन मध्ये 103.8 परसेंट चा एनटीएससी वाइड कलर सपोर्ट आहे. तसेच यात सनलाइट मोड 2.0 सपोर्ट आहे आणि याबद्दल कंपनी म्हणते आहे कि “हा आउटडोर मध्ये कलर ऑप्टिमाइजेशन आणि ब्राइटनेस अजून चांगली बनवतो ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट व्यू मिळतो.” शाओमी मी 9 चा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.7 परसेंट आहे.

आतापर्यंत लीक रिपोर्ट मध्ये केल्या गेलेल्या खुलास्यानुसार हा फोन क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान 7 नॅनोमी चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर सादर केला जाऊ शकतो. तसेच 12जीबी वेरियंट सोबत 8जीबी आणि 6जीबी रॅम चे मॉडेल पण येऊ शकतात. सोबत यात 128जीबी आणि 256जीबी मेमरी वेरियंट असू शकतात. कंपनी हा 12एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करू शकते.

The post लॉन्चच्या आधी शाओमी मी 9 ची माहिती आली समोर, 12जीबी रॅम आणि 48एमपी चा असेल कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-12gb-ram-and-48mp-camera-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 9 झाला सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट, या शानदार फीचर्सची मिळाली माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi9-certified-on-imda-singapore-specifications-leaked-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi9-certified-on-imda-singapore-specifications-leaked-in-marathi/#respond Mon, 11 Feb 2019 13:48:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3599 हा फोन सिंगापुरच्या आईएमडीए वर लिस्ट केला गेला आहे.

The post शाओमी मी 9 झाला सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट, या शानदार फीचर्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीच्या फाउंडर लेई जून यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी मी सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा लवकरच बाजारात मी 9 नावासह लॉन्च केला जाईल. या घोषणेसह लेई जून ने एक हिंट देत सांगतिले होते कि हा डिवाइस फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह सादर केला जाईल. शाओमीने अजूनतरी मी 9 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण हा फोन सिंगापुरच्या आईएमडीए वर लिस्ट केला गेला आहे.

शाओमी मी 9 सिंगापुरच्या इंफो कम्यूनिकेशन्स मीडिया डेवलेपमेंट अथॉरिटी (आईएमडीए) वर लि​स्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर मी 9 चा मॉडेल नंबर एम1901एफ1जी असा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शाओमी मी 9 एखाद्या सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर मॉडेल नंबर सोबतच स्पष्ट करण्यात आले आहे कि हा फोन शाओमी द्वारा लॉन्च केला जाणारा फोन मी 9 च आहे.

हा झाला आहे खुलासा
मी 9 संबंधित स्पेसिफिकेशन्स सिंगापुरच्या वेबसाइट वर सांगण्यात आले नाहीत पण या लिस्टिंग मध्ये मी 9 स्मार्टफोनचे नाव आणि मॉडेल नंबर समोर आला आहे. तसेच मी 9 च्या कनेक्टिविटी फीचर्सचा खुलासा पण आईएमडीए ने केला आहे. वेबसाइट वर मी 9 ​सर्टिफाइड कारण्यासोबतच हा फोन ब्लूटूथ व वाईफाई रेडी असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे मी 9 ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफाइड पण केला गेला आहे. तसेच मी 9 मध्ये एनएफसी फीचर पण असेल असे पण आईएमडीए मुळे समजले आहे.

सॅमसंग नंतर आता गूगल पण देईल शाओमीला टक्कर, घेऊन येत आहे 2जीबी रॅम असलेला स्वस्तातला फोन

असे असतील स्पेसिफिकेशन्स
शाओमी मी 9 बद्दल आतापर्यंत आलेल्या अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या संभावित स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. लीक्सनुसार मी 9 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलस्क्रीन डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 2के स्क्रीन रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक्सनुसार मी 9 एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च होईल.

मी 9 शाओमी द्वारा 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो सोबत हा फोन क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालेल. तसेच पावर बॅकअप साठी मी 9 मध्ये 32वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

शाओमी मी 9 कधी येईल याबद्दल काहीच बोलता येणार नाही. तसेच समोर आलेले फोनचे स्पेसिफिकेशन्स वर पण विश्वास ठेवता येणार नाही. अशा आहे कि शाओमी लवकरच मी 9 बद्दल एखादी घोषणा करेल.

The post शाओमी मी 9 झाला सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट, या शानदार फीचर्सची मिळाली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi9-certified-on-imda-singapore-specifications-leaked-in-marathi/feed/ 0
शाओमी मी 9 मध्ये असेल 48एमपी कॅमेरा असेलेला होल डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-48mp-camera-and-hole-in-display-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-48mp-camera-and-hole-in-display-in-marathi/#respond Mon, 10 Dec 2018 08:52:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3102 माई ड्राइवर कडून दिलेल्या माहितीनुसार शाआमी द्वारा लॉन्च केला जाणारा 48-मेगापिक्सल कॅमेरा फोनसाठी कंपनी एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर करणार आहे

The post शाओमी मी 9 मध्ये असेल 48एमपी कॅमेरा असेलेला होल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाओमी लवकरच 48-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉन्च करणार आहे. हे स्वतः कंपनीचे प्रेसि​डेंट लीन बिन ने सांगितले होते. त्यावेळी फोनचे नाव सांगण्यात आले नव्हते पण आज नवीन माहिती समोर आली आहे ज्यात फोनच्या नावासोबतच काही स्पेसिफिकेशन्सचा पण उल्लेख करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार हा फोन शाओमी मी 9 असू शकतो. तुम्हाला तर माहितीच आहे की दरवर्षी शाओमी मी सीरीज मध्ये आपला फ्लॅगशिप फोन सादर करते आणि नवीन वर्षात मी 9 येणार आहे. इतकेच नव्हे तर समोर आलेल्या माहितीनुसार या फोन मध्ये स्क्रीनच्या खाली होल डिस्प्ले डिजाइन सह सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

माई ड्राइवर कडून दिलेल्या माहितीनुसार शाआमी द्वारा लॉन्च केला जाणारा 48-मेगापिक्सल कॅमेरा फोनसाठी कंपनी एलसीडी डिस्प्ले पॅनलचा वापर करणार आहे आणि या पॅनलचा पुरवठा चीनी डिस्प्ले मेकर कंपनी बोईकरत आहे. हा डिस्प्ले फुल बेजल लेस नसेल तर खाली थोडी चिन असू शकते.

रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की शाओमीच्या या फोनची डिजाइन सॅमसंग गॅलेक्सी ए8एस आणि हुआवई नोवा 4 सारखी असेल ज्यात बाजूला होल कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी 9 बद्दल जी माहिती आता पर्यंत समोर आली आहे त्यानुसार हा फोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह येऊ शकतो. तसेच कंपनी फोटोग्राफी साठी सोनी आईएमएक्स 586 सेंसर किंवा मग सॅमसंगच्या कॅमेरा सेंसर चा वापर करू शकते. तसेच अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे की या फोन मध्ये मीयूआई 10 असेल. त्यामुळे आशा करता येईल की हा एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल.

The post शाओमी मी 9 मध्ये असेल 48एमपी कॅमेरा असेलेला होल डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-to-launch-with-48mp-camera-and-hole-in-display-in-marathi/feed/ 0
5जी सपोर्ट आणि 10जीबी रॅम असलेला शाओमी मी 9 आला समोर, स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल तुम्ही हैराण https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-render-design-leak-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-render-design-leak-features-specifications-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 07:18:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2845 शाओमी मी 9 एंडरॉयड च्या नवीन ओएस वर्जन वर सादर होईल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट वर चालेले. विशेष म्हणजे क्वालकॉम ने अजून स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट आॅफिशियल केला नाही.

The post 5जी सपोर्ट आणि 10जीबी रॅम असलेला शाओमी मी 9 आला समोर, स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल तुम्ही हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने यावर्षी आपला 8वा वर्धापन दिन साजरा करत मी सीरीज मध्ये कंपनीने सर्वात ताकदवान आणि दमदार स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. हे तुम्ही स्मार्टफोन शानदार डिजाईन व ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह येतात आणि वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. मी 8 सीरीजच्या यशानंतर आता शाओमी नवीन धमाका करण्याची तयारी करत आहे. आणि हा धमाका होईल मी 9 रूपात. शाओमीच्या आगामी पावरफुल फोन मी 9 चे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

शाओमी मी 9 चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स प्रसिद्ध टिप्सटर बेंजामिन गेस्किन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केले आहेत. सर्वात आधी मी 9 चा लुक आणि डिजाईन पाहता मी 9 चा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे. डिस्प्ले वर वरच्या बाजूला छोटीशी नॉच देण्यात आली आहे आणि याच नॉच मध्ये दोन सेल्फी कॅमेरा आहेत. तर फोनच्या फ्रंट पॅनल वरच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर या फोटो मध्ये दाखवण्यात आला आहे. मी 9 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

मी 9 या ट्वीट मध्ये 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लीक नुसार शाओमीचा हा नवीन स्मार्टफोन मी 9 खूपच पावरफुल असेल. लीक नुसार कंपनी हा फोन 10जीबी रॅम सह लॉन्च करेल हा फोन 5जी कनेक्टिविटी सपोर्ट सह बाजारात येईल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि 10जीबी रॅम सोबत शाओमी मी 9 8जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम वेरिएंट्स मध्ये पण लॉन्च केला जाईल.

शाओमी मी 9 एंडरॉयड च्या नवीन ओएस वर्जन वर सादर होईल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट वर चालेले. विशेष म्हणजे क्वालकॉम ने अजून स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट आॅफिशियल केला नाही. कॅमेरा सेग्मेंट पाहता लीकनुसार मी 9 च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा शक्तिशाली कॅमेरा सेंसर असेल. यासोबत 13-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचे दोन इतर कॅमेरा सेंसर सह मी 9 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल.

पावर बॅकअप साठी शाओमी मी 9 मध्ये क्विक चार्ज 5.0 टेक्नॉलॉजीवाली 3,700एमएएच ची बॅटरी देनाय्त येईल. तसेच लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि मी 9 वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करेल. शाओमी ने अजूनतरी मी 9 नाददल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही त्यामुळे मी 9 चे उपरोक्त स्पेसिफिकेशन्स ठोस नाहीत असे आपण म्हणू शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात वनप्लस च्या पण 5जी फोनची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोणती कंपनी सर्वात आधी 5जी सपोर्ट असेलेला फोन बाजारात आणेल हे आता बघावे लागेल.

The post 5जी सपोर्ट आणि 10जीबी रॅम असलेला शाओमी मी 9 आला समोर, स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल तुम्ही हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-9-render-design-leak-features-specifications-in-marathi/feed/ 0