रियलमी 3 लवकरच होईल लॉन्च, वीडियो आला समोर

ओपो ने गेल्याच वर्षी भारतात आपला सब ब्रँड रियलमी सादर केला होता. रियलमी ने सध्या काही निवडक स्मार्टफोनच लॉन्च केले आहेत पण सर्व स्मार्टफोन भारतीय बाजारात हिट झाले आहेत. कमी किंमत आणि चांगले स्पेसिफिकेशन्स यामुळे रियलमी लोकांना आवडायला लागली आहे. रियलमी ने गेल्यावर्षी भारतातील सर्वात स्वस्त 8जीबी रॅम असलेला फोन रियलमी 2 प्रो लॉन्च केला होता, ज्याची किंमत कंपनी ने नुकतीच कमी केली आहे. तर आता रियलमी इंडिया पुन्हा एकदा तेच यश मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. रियलमी लवकरच रियलमी 3 स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. एका लीक मध्ये रियलमी 3 संबंधित वीडियो समोर आला आहे ज्यामुळे कंपनीच्या योजनेचा खुलासा झाला आहे.

रियलमीच्या सीईओ ने केले ट्वीट
रियलमी इंडियासाचे सीईओ माधव सेठ यांनी कालरात्री एक ट्वीट केले होते. या ट्वीट मध्ये माधव सेठ यांनी यूजर्सना विचारले होते कि त्यांना रियलमीच्या आगामी स्मार्टफोन मध्ये कोणते फीचर्स हवे आहेत. ट्वीट मधून माधव सेठ यांनी यूजर्सना विचारले होते कि त्यांना रियलमीच्या नेक्स्ट स्मार्टफोन मध्ये कोणते स्पेसिफिकेशन्स व फीचर्स हवे आहेत. सीईओ च्या या ट्वीट मधून जरी आगामी फोनच्या नावाविषयी किंवा लॉन्च संबंधित कोणतीही माहिती मिळाली नसली तरी ट्वीट वरून समजते कि कंपनी लवकरच एखादा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.

रियलमी 3 असेल कंपनीचा नेक्स्ट फोन
तसे पाहता रियलमीच्या आगामी स्मार्टफोन बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, ज्यात कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या नावाची आणि अनुमानित स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. पण आता एका ताजा लीक मध्ये कंपनीचे सीईओ माधव सेठ यांचा एक वीडियो वायरल झाला आहे ज्यात त्यांनी स्वतः कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा केला आहे कि कंपनीचा आगामी स्मार्टफोन ‘रियलमी 3’ नावासह लॉन्च केला जाईल.

एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए20 मध्ये असेल डुअल कॅमेरा आणि माइक्रोयूएसबी स्लॉट

गली बॉय वरून प्रेरित रियलमी
रियलमीच्या सीईओ चा लीक वीडियो बॉलीवुडच्या लेटेस्ट मूवी गली बॉय पासून प्रेरित आहे. लीक झालेल्या वीडियो मध्ये कंपनी सीईओ अनेक डान्सर सोबत नाचताना दिसत आहेत. या वीडियो मध्ये रॅपचा समावेश केला गेला आहे ज्यात ‘रियलमी 3’ चा उल्लेख झाला आहे. लीक वीडियो एखाद्या गाण्याची छोटीशी क्लिप आहे जी एडिट करताना ओरिजनल वीडियो चित्रित करण्यात आला आहे. या वीडियो मध्ये 16 फेब्रुवारी हि तारीख दिसत आहे. हा वीडियो बीजीआर ने आपल्या रिपोर्ट मध्ये पब्लिश केला आहे.

रियलमी 3 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी 3 संबंधित या वीडियो मध्ये फोनच्या लुक किंवा स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित असेल तसेच 12एनएम आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालेल. कंपनी हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये आणेल ज्यांची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असेल. वाचकांना रियलमी 3 संबंधित अपडेट लवकरच दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here