इंडियन टेलीकॉम मार्केट वर अलीकडेच रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि भारतात 4जी नेटवर्कच्या उपलब्धतेच्या बाबतीत जियो अव्वल आहे तर एयरटेल सर्वात वेगवान 4जी इंटरनेट स्पीड देते. या रिपोर्ट मध्ये 2018 च्या शेवटच्या तीन महिन्यांचे आकडे होते. आता भारतीय टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी अर्थात् ट्राई ने पण 4जी इंटरनेट स्पीड वर आपला रिपोर्ट सादर केला आहे ज्यानुसार जियो सर्वात वेगवान 4जी डाउनलोड स्पीड देत आहे तर आइडियाचा 4जी अपलोड स्पीड सर्वात जास्त आहे.
रिपोर्ट काय म्हणतो
भारतीय टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी (ट्राई) च्या या रिपोर्ट मध्ये भारतीय टेलीकॉम कंपन्यांच्या 4जी इंटरनेट स्पीड ची माहिती देण्यात आली आहे. हा रिपोर्ट साल 2019 च्या पहिल्या महिन्याचा म्हणजे जानेवारीचा आहे. या रिपोर्ट मध्ये 4जी नेटवर्क वर मिळणाऱ्या डाउनलोड तसेच अपलोड स्पीडचे आकडे सादर केले गेले आहेत, ज्यावरून समजते कि जानेवारीत 4जी नेटवर्क वर कोणत्या कंपनी ने किती डाउनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड दिला आहे.

4जी डाउनलोड मध्ये जियो अव्वल
ट्राई च्या रिपोर्टनुसार रिलायंस जियो सर्व कंपन्यांना मागे टाकत नंबर वन वर आली आहे. तसेच कंपनीच्या 4जी डाउनलोड स्पीड मध्ये डिसेंबरपेक्षा जानेवारीत वाढ झालेली दिसली आहे. डिसेंबर महिन्यात जियो ने 18.7एमबीपीएस चा 4जी डाउनलोड स्पीड दिला होता तर जानेवारीत हा स्पीड वाढून 18.8एमबीपीएस झाला आहे. जियो फॅन्ससाठी आनंदाची बाब अशी कि हे दुसऱ्या नंबर वरील कंपनी पेक्षा जवळपास दुप्पट आहेत.
रियलमी 3 लवकरच होईल लॉन्च, वीडियो आला समोर
अन्य टेलीकॉम कंपन्या पाहता जियो नंतर एयरटेल कंपनी या लिस्ट मध्ये दुसऱ्या नंबर वर आली आहे. याच काळात एयरटेल ने 9.5एमबीपीएस चा स्पीड देत दुसरा नंबर मिळवला आहे. विशेष म्हणजे एयरटेलचा स्पीड डिसेंबरपेक्षा जानेवारीत कमी आहे, नवीन वर्षात एयरटेलचा 4जी डाउनलोड स्पीड कमी झाला आहे. तसेच 6.7एमबीपीएस स्पीड देत वोडाफोन ने तिसरा आणि 5.5एमबीपीएस चा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड देत आइडिया ने चौथा नंबर मिळवला आहे.
एक्सक्लूसिव: सॅमसंग गॅलेक्सी ए20 मध्ये असेल डुअल कॅमेरा आणि माइक्रोयूएसबी स्लॉट
असा आहे कंपन्यांचा 4जी अपलोड स्पीड
सरासरी 4जी अपलोड स्पीड बद्दल बोलायचे तर ट्राई च्या रिपोर्टनुसार आपला रेकॉर्ड कायम ठेवत आइडिया पुन्हा एकदा पहिल्या नंबर वर आली आहे. डिसेंबर महिन्यात आइडिया ने 5.8एमबीपीएस चा सरासरी अपलोड स्पीड देत पहिले स्थान मिळवले आहे. डिसेंबरच्या तुलनेत आइडिया चा 4जी अपलोड जास्त आहे. याच यादीत 5.4एमबीपीएस स्पीड सह वोडाफोन दुसऱ्या नंबर वर आहे. तर 4.4एमबीपीएस स्पीड सह रिलायंस जियो तिसऱ्या आणि 3.8एमबीपीएस स्पीड सह एयरटेल चौथ्या क्रमांकावर आहे.














