5जी सपोर्ट आणि 10जीबी रॅम असलेला शाओमी मी 9 आला समोर, स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल तुम्ही हैराण

शाओमी ने यावर्षी आपला 8वा वर्धापन दिन साजरा करत मी सीरीज मध्ये कंपनीने सर्वात ताकदवान आणि दमदार स्मार्टफोन लॉन्च केले होते. शाओमी ने मी 8, मी 8एसई आणि मी 8 इक्स्प्लॉरर एडिशन सादर केले होते. हे तुम्ही स्मार्टफोन शानदार डिजाईन व ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह येतात आणि वेगवेगळ्या वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहेत. मी 8 सीरीजच्या यशानंतर आता शाओमी नवीन धमाका करण्याची तयारी करत आहे. आणि हा धमाका होईल मी 9 रूपात. शाओमीच्या आगामी पावरफुल फोन मी 9 चे फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

शाओमी मी 9 चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स प्रसिद्ध टिप्सटर बेंजामिन गेस्किन ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केले आहेत. सर्वात आधी मी 9 चा लुक आणि डिजाईन पाहता मी 9 चा फ्रंट पॅनल पूर्णपणे बेजल लेस आहे. डिस्प्ले वर वरच्या बाजूला छोटीशी नॉच देण्यात आली आहे आणि याच नॉच मध्ये दोन सेल्फी कॅमेरा आहेत. तर फोनच्या फ्रंट पॅनल वरच इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर या फोटो मध्ये दाखवण्यात आला आहे. मी 9 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे.

मी 9 या ट्वीट मध्ये 6.4-इंचाच्या एमोलेड डिस्प्ले सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लीक नुसार शाओमीचा हा नवीन स्मार्टफोन मी 9 खूपच पावरफुल असेल. लीक नुसार कंपनी हा फोन 10जीबी रॅम सह लॉन्च करेल हा फोन 5जी कनेक्टिविटी सपोर्ट सह बाजारात येईल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि 10जीबी रॅम सोबत शाओमी मी 9 8जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम वेरिएंट्स मध्ये पण लॉन्च केला जाईल.

शाओमी मी 9 एंडरॉयड च्या नवीन ओएस वर्जन वर सादर होईल तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट वर चालेले. विशेष म्हणजे क्वालकॉम ने अजून स्नॅपड्रॅगॉन 8150 चिपसेट आॅफिशियल केला नाही. कॅमेरा सेग्मेंट पाहता लीकनुसार मी 9 च्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा शक्तिशाली कॅमेरा सेंसर असेल. यासोबत 13-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचे दोन इतर कॅमेरा सेंसर सह मी 9 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल.

पावर बॅकअप साठी शाओमी मी 9 मध्ये क्विक चार्ज 5.0 टेक्नॉलॉजीवाली 3,700एमएएच ची बॅटरी देनाय्त येईल. तसेच लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि मी 9 वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करेल. शाओमी ने अजूनतरी मी 9 नाददल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही त्यामुळे मी 9 चे उपरोक्त स्पेसिफिकेशन्स ठोस नाहीत असे आपण म्हणू शकतो. विशेष म्हणजे या आठवड्यात वनप्लस च्या पण 5जी फोनची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोणती कंपनी सर्वात आधी 5जी सपोर्ट असेलेला फोन बाजारात आणेल हे आता बघावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here