शाओमीच्या फाउंडर लेई जून यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि कंपनी मी सीरीजच्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि हा लवकरच बाजारात मी 9 नावासह लॉन्च केला जाईल. या घोषणेसह लेई जून ने एक हिंट देत सांगतिले होते कि हा डिवाइस फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सह सादर केला जाईल. शाओमीने अजूनतरी मी 9 च्या लॉन्च व स्पेसिफिकेशन्स संबंधित कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण हा फोन सिंगापुरच्या आईएमडीए वर लिस्ट केला गेला आहे.
शाओमी मी 9 सिंगापुरच्या इंफो कम्यूनिकेशन्स मीडिया डेवलेपमेंट अथॉरिटी (आईएमडीए) वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर मी 9 चा मॉडेल नंबर एम1901एफ1जी असा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शाओमी मी 9 एखाद्या सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट केला गेला आहे. या वेबसाइट वर मॉडेल नंबर सोबतच स्पष्ट करण्यात आले आहे कि हा फोन शाओमी द्वारा लॉन्च केला जाणारा फोन मी 9 च आहे.

हा झाला आहे खुलासा
मी 9 संबंधित स्पेसिफिकेशन्स सिंगापुरच्या वेबसाइट वर सांगण्यात आले नाहीत पण या लिस्टिंग मध्ये मी 9 स्मार्टफोनचे नाव आणि मॉडेल नंबर समोर आला आहे. तसेच मी 9 च्या कनेक्टिविटी फीचर्सचा खुलासा पण आईएमडीए ने केला आहे. वेबसाइट वर मी 9 सर्टिफाइड कारण्यासोबतच हा फोन ब्लूटूथ व वाईफाई रेडी असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजे मी 9 ब्लूटूथ आणि वाईफाई सर्टिफाइड पण केला गेला आहे. तसेच मी 9 मध्ये एनएफसी फीचर पण असेल असे पण आईएमडीए मुळे समजले आहे.
सॅमसंग नंतर आता गूगल पण देईल शाओमीला टक्कर, घेऊन येत आहे 2जीबी रॅम असलेला स्वस्तातला फोन
असे असतील स्पेसिफिकेशन्स
शाओमी मी 9 बद्दल आतापर्यंत आलेल्या अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनच्या संभावित स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. लीक्सनुसार मी 9 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 6.4-इंचाचा फुलस्क्रीन डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो 2के स्क्रीन रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. लीक्सनुसार मी 9 एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च होईल.
मी 9 शाओमी द्वारा 6जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो सोबत हा फोन क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालेल. तसेच पावर बॅकअप साठी मी 9 मध्ये 32वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 3,500एमएएच ची बॅटरी मिळू शकते.
शाओमी मी 9 कधी येईल याबद्दल काहीच बोलता येणार नाही. तसेच समोर आलेले फोनचे स्पेसिफिकेशन्स वर पण विश्वास ठेवता येणार नाही. अशा आहे कि शाओमी लवकरच मी 9 बद्दल एखादी घोषणा करेल.















