Xiaomi Redmi 5a - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 May 2019 13:07:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/#respond Fri, 03 May 2019 13:07:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4235 Redmi 5A ने सर्वात जास्त विकला जाणाऱ्या एंडरॉयड स्मार्टफोनच्या रेस मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S9 ला मोठ्या अंतराने मात दिली आहे.

The post सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी पुन्हा एकदा सर्व कंपन्यांना मागे टाकत पुढे गेली आहे. यावेळी कंपनीच्या बजेट स्मार्टफोन Redmi 5A ने जी कमाल केली आहे ती सॅमसंग आणि नोकिया साठी धोक्याची घंटा आहे असे म्हणता येईल.

कारण, शाओमी Redmi 5A साल 2018 मध्ये भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला आहे. हि माहिती काउंटरपॉइंटच्या 2018 च्या ऐनुअल सेल्स रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. शाओमीच्या Redmi 5A ने सर्वात जास्त विकला जाणाऱ्या एंडरॉयड स्मार्टफोनच्या रेस मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S9 ला मोठ्या अंतराने मात दिली आहे.

पण 2018 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये iPhone X टॉपला आहे. ग्लोबली स्मार्टफोनचा सेल पहिला तर या लिस्ट मध्ये Redmi 5A पाचव्या नंबर वर आहे. चला बघूया 2018 च्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या रेस मध्ये कोणता फोन कोणत्या नंबर आहे.

विशेष म्हणजे ऍप्पल आईफोन एक्स साल 2017 मध्ये कंपनी ने आपल्या 10व्या एनिवर्सरी मध्ये लॉन्च केला होता. तसेच दुसऱ्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर दुसऱ्या नंबर वर iPhone 8 आणि तिसऱ्या नंबर वर iPhone 8 Plus आहे. तसेच साल 2016 मध्ये कंपनी ने iPhone 7 लॉन्च केला होता जो जगात विकला जाणारा चौथ्या नंबरचा स्मार्टफोन आहे.

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2019 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) टॉप वर होती. कंपनीची भारतीय बाजारात भागेदारी 29 टक्के आहे. याची माहिती काउंटरप्वाइंटच्या एका रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. पण याकाळात Xiaomi च्या दरवर्षीच्या आकड्यांच्या आधारावर 2 तक्क्याची घसरण दिसली आहे. गेल्यावर्षी कंपनीचा या तिमाहीत 31 टक्के मार्केट शेअर होता. तसेच दुसऱ्या नंबर वर 23 टक्के मार्केट शेअर सह सॅमसंग आहे.

The post सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/feed/ 0
या फोनने बनवले शाओमीला नंबर 1 ब्रँड, 9 महिन्यात 1 कोटी मॉडेल विकून केला रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-5a-10-million-unit-sales-in-9-months-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-5a-10-million-unit-sales-in-9-months-in-marathi/#respond Wed, 10 Oct 2018 09:16:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2427 विशेष म्हणजे नोव्हेंबर मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी 5ए ने पहिल्याच महिन्यात 10 लाख स्मार्टफोन विकून रेकॉर्ड बनवला होता. आता कंपनी ने रेडमी 5ए चे 1 कोटी हँडसेट विकून नवीन कीर्तिमान स्थापन केला आहे.

The post या फोनने बनवले शाओमीला नंबर 1 ब्रँड, 9 महिन्यात 1 कोटी मॉडेल विकून केला रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी इंडियन स्मार्टफोन मार्केट ची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. शाओमी चे असे अनेक फोन्स आहेत ज्यांनी आपल्या सेल मुळे रेकॉर्ड बनवले आहेत. अनेक हिट स्मार्टफोन घेऊन येणाऱ्या शाओमी ने अजून एक नवीन कारनामा जेल हे. शाओमी ने लॉन्च केलेल्या रेडमी 5ए ने आश्चर्यकारक रेकॉर्ड केला आहे. शाओमी ने रेडमी 5ए चे 1,00,00,000 यूनिट विकून हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

शाओमी ने अधिकृतपणे हि माहिती दिली आहे कि रेडमी 5ए चे 1,00,00,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत जो देशातील स्मार्टफोन बाजारातील मोठा रेकॉर्ड आहे. शाओमी ने सांगितले आहे कि रेडमी 5ए चे एक कोटी यूनिट फक्त 9 महिन्यांत विकले गेले आहेत जी देशातील कोणत्याही स्मार्टफोनची सर्वात जास्त वेगाने झालेली विक्री आहे. शाओमीचा दावा आहे कि फक्त 9 महिन्यात एवढे हँडसेट विकून रेडमी 5ए भारतातील सर्वात वेगवान 1 कोटींचा सेल करणारा फोन बनला आहे.

विशेष म्हणजे नोव्हेंबर मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी 5ए ने पहिल्याच महिन्यात 10 लाख स्मार्टफोन विकून रेकॉर्ड बनवला होता. आता कंपनी ने रेडमी 5ए चे 1 कोटी हँडसेट विकून नवीन कीर्तिमान स्थापन केला आहे. किंमत पाहता शाओमी रेडमी 5ए इंडिया मध्ये दोन वेरिएंट मध्ये सेल साठी ​उपलब्ध झाला आहे. फोनचा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो तसेच फोनचा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

शाओमी रेडमी 5ए चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1280×720 पिक्सल रेजल्यूशन वाली 5-इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड नुगट सह सादर करण्यात आला आहे जो 1.4गीगाहट्र्ज क्वॉडकोर स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. रेडमी 5ए मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी 5ए मध्ये डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post या फोनने बनवले शाओमीला नंबर 1 ब्रँड, 9 महिन्यात 1 कोटी मॉडेल विकून केला रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-5a-10-million-unit-sales-in-9-months-in-marathi/feed/ 0
शाओमी पुन्हा बनला देशातील सर्वात मोठा ब्रँड, रेडमी 5ए ठरला नंबर वन स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-top-smartphone-brand-q2-2018-idc-report-samsung-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-top-smartphone-brand-q2-2018-idc-report-samsung-in-marathi/#respond Tue, 14 Aug 2018 10:30:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1701 या लिस्ट मध्ये शाओमी च्या रेडमी 5ए ला पहिले स्थान मिळाले आहे. तर रेडमी नोट 5 प्रो, रेडमी नोट 5 आणि रेडमी 5 पण देशातील टॉप 5 स्मार्टफोन मध्ये आहेत.

The post शाओमी पुन्हा बनला देशातील सर्वात मोठा ब्रँड, रेडमी 5ए ठरला नंबर वन स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट वरील काही दिवसांपूर्वी काउंटरप्वाइंट चा एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात शाओमी आणि सॅमसंग ला देशातील सर्वात जास्त विकले जाणारे ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले होते तसेच दोघांमध्ये चांगलीच टक्कर होती. तर आता प्रसिद्ध रिसर्च फर्म आईडीसी ने पण एक नवीन रिपोर्ट सादर केला आहे ज्यात सांगण्यात आले आहे की देशात सर्वात वेगाने पुढे येणारी चीनी कंपनी शाओमी या रेस मध्ये सॅमसंग च्या पुढे गेली आहे आणि देशात सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

आईडीसी (इंटरनेशनल डाटा कॉपोरेशन) ने साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की देशातील स्मार्टफोन बाजारात सर्व कंपन्यांना मागे टाकत शाओमी सर्वात पुढे निघाली आहे. एप्रिल-मे-जून या काळात शाओमी ने भारतात 29.7 टक्के बाजारावर कब्जा करत देशातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड म्हणून पुढे आली आहे. दीर्घकाळ भारतात नंबर वन ब्रँड म्हणून राज्य करणारी सॅमसंग या शर्यतीत दुसर्‍या नंबर वर आली आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग च्या वाट्याला 23.9 टक्के मार्केट शेयर आला आहे.

शाओमी मध्ये गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी 12 टक्के जास्त वृद्धि झाली आहे. साल 2017 च्या दुसर्‍या तिमाहीत आईडीसी च्या रिपोर्ट नुसार शाओमी कडे 17.2 टक्के मार्केट शेयर होता. तर सॅमसंग कडे गेल्यावर्षी याच काळात 23.6 टक्के मार्केट शेयर होता. गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी वीवो आणि ओपो चा मार्केट शेयर कमी झाला आहे.

आईडीसी च्या रिपोर्ट मध्ये वीवो ने 12.6 टक्के मार्केट शेयर्स सोबत तिसरे स्थान मिला मिळवले आहे. तर गेल्यावर्षी वीवो ने दुसर्‍या तिमाहीत 12.8 टक्के मार्केट शेयर मिळवला होता. तसेच साल 2017 मध्ये 7.9 टक्के मार्केट शेयर मिळणारी ओपो यावर्षी 7.6 टक्के शेयर्स सह चौथ्या नंबर वर आली आहे.

2018 च्या दुसर्‍या तिमाहीत सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे तर या लिस्ट मध्ये शाओमी च्या रेडमी 5ए ला पहिले स्थान मिळाले आहे. तर रेडमी नोट 5 प्रो, रेडमी नोट 5 आणि रेडमी 5 पण देशातील टॉप 5 स्मार्टफोन मध्ये आहेत.

The post शाओमी पुन्हा बनला देशातील सर्वात मोठा ब्रँड, रेडमी 5ए ठरला नंबर वन स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-top-smartphone-brand-q2-2018-idc-report-samsung-in-marathi/feed/ 0
सॅमसंग पुन्हा नंबर एक वर, शाओमी ला मागे टाकत बनला भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड, रेडमी 5ए आहे टॉप सेलिंग फोन https://www.91mobiles.com/marathi/samsung-beats-xiaomi-number-one-smartphone-manufacturer-india-q2-2018-redmi-5a-best-selling-smartphone-counterpoint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-beats-xiaomi-number-one-smartphone-manufacturer-india-q2-2018-redmi-5a-best-selling-smartphone-counterpoint-in-marathi/#respond Wed, 25 Jul 2018 08:56:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1404 साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा रिपोर्ट समोर आला आहे ज्या नुसार सॅमसंग शाओमी ला मागे टाकत भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी स्मार्टफोन कंपनी बनली आहे.

The post सॅमसंग पुन्हा नंबर एक वर, शाओमी ला मागे टाकत बनला भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड, रेडमी 5ए आहे टॉप सेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग आणि चीन ची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी शाओमी भारतीय बाजारात एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. यात कोणतेही दुमत नसावे की अनेक वर्षांपासून इंडियन मोबाइल मार्केट वर राज्य करणार्‍या सॅमसंग ला शाओमी कडून चांगलीच टक्कर मिळाली आहे. काही वर्षांमध्ये शाओमी ने भारतीय स्मार्टफोन यूजर्स मध्ये खुप चांगल स्थान बनवल आहे आणि आपल्या स्वस्त स्मार्टफोंस मुळे कमी काळात देशात प्रसिद्ध झाली आहे. सॅमसंग आणि शाओमी च्या या शर्यतीत सॅमसंग ने पुन्हा एकदा शाओमी ला मागे टाकले आहे. साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा रिपोर्ट समोर आला आहे ज्या नुसार सॅमसंग शाओमी ला मागे टाकत भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी स्मार्टफोन कंपनी बनली आहे.

सॅमसंग ने इंडियन स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. देशात स्मार्टफोंस ची सर्वात जास्त विक्री करण्याच्या बाबतीत सॅमसंग ने शाओमी ला मागे टाकले आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने सादर केला आहे. काउंटरप्वाइंट च्या रिपोर्ट नुसार भारतात दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग चा मार्केट शेयर सर्वात जास्त होता. सॅमसंग ने जून 2018 च्या शेवटपर्यंत 29 टक्के इंडियन स्मार्टफोन मार्केट वर ताबा मिळवला आहे, तर बाजारात शाओमी चा शेयर 28 टक्के आहे.

शाओमी मागच्या काही काळापासून भारतात सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड होता. पण आता पुन्हा एकदा सॅमसंग शाओमी ला मागे टाकत पहिल्या नंबर वर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने घोषणा केली होती की कंपनी ने आपल्या नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 चा 2 मिलियन पेक्षा जास्त सेल केला आहे. दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग टॉप ला येण्याचे श्रेय पण याच नवीन स्मार्टफोंस ला दिले जात आहे. बोलले जात आहे की गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 सीरीज लोकांना आवडले आहेत आणि या स्मार्टफोंस च्या रेकॉर्ड सेल मुळे सॅमसंग पुन्हा एकदा एक नंबर वर आली आहे.

काउंटरप्वाइंट च्या या रिसर्च रिपोर्ट नुसार सॅमसंग आणि शाओमी नंतर 12 टक्के मार्केट शेयर सह वीवो तिसर्‍या आणि 10 टक्के शेयर सह ओपो चौथ्या नंबर वर आली आहे. तर आॅनर ने पण 2 टक्के मार्केट शेयर वाढवत भारतातील स्मार्टफोन बाजारात पाचवे स्थान मिळवले आहे. लक्षात घ्या गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग चा 24 टक्के मार्केट शेयर वर ताबा होता तर शाओमी ने 16 टक्के मार्केट शेयर घेतला होता. पण आता फक्त 15 महिन्यांनंतर सॅमसंग 24 टक्क्यांवरून 29 टक्क्यांवर पोचली आहे तर शाओमी ने 16 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर झेप घेतली आहे.

2018 च्या दुसर्‍या तिमाहीत सर्वात जास्त विकले जाणारे स्मार्टफोंस पाहता यात शाओमी च्या रेडमी 5ए चे नाव सर्वात वरती आहे. तसेच दुसर्‍या नंबर वर पण शाओमी चा रेडमी नोट 5 प्रो आहे. या यादीत सॅमसंग गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन तिसर्‍या नंबर वर राहिला आहे तर शाओमी रेडमी नोट 5 चौथ्या स्थानावर आहे. टॉप 5 स्मार्टफोन च्या लिस्ट मध्ये वीवो ने पण जागा मिळवली आहे. कंपनी चा वीवो वाय71 या लिस्ट मध्ये पाचवा आहे.

The post सॅमसंग पुन्हा नंबर एक वर, शाओमी ला मागे टाकत बनला भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड, रेडमी 5ए आहे टॉप सेलिंग फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-beats-xiaomi-number-one-smartphone-manufacturer-india-q2-2018-redmi-5a-best-selling-smartphone-counterpoint-in-marathi/feed/ 0
शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 15:13:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=545 सॅमसंग ला मीड तसेच लो बजेट सेग्मेंट मध्ये ओपो, वीवो, हुआवई व शाओमी काढून चांगली टक्कर मिळाली आहे.

The post शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेक बाजारात कोणती कंपनी सर्वात जास्त फेमस आहे आणि कोणाचे स्मार्टफोन सर्वात जास्त विकले जातात तर जास्तीत जास्त स्मार्टफोन यूजर शाओमी च नाव घेतील. प्रत्येक आठवड्याला शाओमी स्मार्टफोन्स चा फ्लॅश सेल सुरू होतो आणि फोन काही मिनिटांत आउट आॅफ स्टॉक होतो. शाओमी ची ही जादू फक्त भारतात नाही तर अंर्तराष्ट्रीय मंचावर पण चालू आहे. एका रिपोर्ट मध्ये शाओमी च्या स्मार्टफोन रेडमी 5ए ला ​बेस्ट सेलिंग एंडरॉयड फोन चा खिताब मिळाला आहे.

रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने आपल्या एक रिसर्च रिपोर्ट शेयर केला आहे ज्यात जागतिक मंचावर सर्वात जास्त विकले जाणार्‍या स्मार्टफोन्स ची लिस्ट बनवण्यात आली आहे. बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स च्या या लिस्ट मध्ये साल 2018 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या स्मार्टफोन सेल चा सामवेश आहे. या लिस्ट मध्ये जगातील सर्वात जास्त विकल्या गेलेल्या स्मार्टफोन चा खिताब अॅप्पल च्या फ्लॅग​शिप फोन आयफोन 10 ला मिळाला आहे. आयफोन 10 पहिला टॉप सेलिंग फोन ठरला आहे तर अॅप्पल चा आयफोन 8 प्लस सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन्स च्या लिस्ट मध्ये दुसर्‍या नंबर वर आला आहे.

या लिस्ट मध्ये शाओमी च्या रेडमी 5ए ला तिसरा क्रमांक मिळाला आहे. बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स मध्ये तिसरे स्थान मिळवण्या सोबतच शाओमी रेडमी 5ए सर्वात जास्त विकला जाणारा पहिला एंडरॉयड स्मार्टफोन पण बनला आहे. मार्केट शेयर पाहता अॅप्पल आयफोन 10 ने 3.4 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे तर दुसर्‍या क्रमांकावरील आयफोन 8 प्लस ने 2.3 टक्के शेयर्स त्याचबरोबर तिसर्‍या क्रमांकावरील शाओमी रेडमी 5ए ने 1.8 टक्के मार्केट शेयर मिळवला आहे.

काउंटरप्वाइंट च्या या लिस्ट मध्ये ओपो ए83 चौथ्या क्रमांकावर आहे तर सॅमसंग चा फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी एस9 ने पाचवा आणि गॅलेक्सी एस9+ ने सहावा क्रमांक मिळवला आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग च्या गॅलेक्सी एस9 सीरीज मुळे सॅमसंग ने प्रीमियम सेग्मेंट मध्ये जवळपास दुप्पट फायदा कमवला आहे. दुसरीकडे सॅमसंग ला मीड तसेच लो बजेट सेग्मेंट मध्ये ओपो, वीवो, हुआवई व शाओमी काढून चांगली टक्कर मिळाली आहे.

The post शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/feed/ 0