शाओमी इंडियन स्मार्टफोन मार्केट ची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. शाओमी चे असे अनेक फोन्स आहेत ज्यांनी आपल्या सेल मुळे रेकॉर्ड बनवले आहेत. अनेक हिट स्मार्टफोन घेऊन येणाऱ्या शाओमी ने अजून एक नवीन कारनामा जेल हे. शाओमी ने लॉन्च केलेल्या रेडमी 5ए ने आश्चर्यकारक रेकॉर्ड केला आहे. शाओमी ने रेडमी 5ए चे 1,00,00,000 यूनिट विकून हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
शाओमी ने अधिकृतपणे हि माहिती दिली आहे कि रेडमी 5ए चे 1,00,00,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत जो देशातील स्मार्टफोन बाजारातील मोठा रेकॉर्ड आहे. शाओमी ने सांगितले आहे कि रेडमी 5ए चे एक कोटी यूनिट फक्त 9 महिन्यांत विकले गेले आहेत जी देशातील कोणत्याही स्मार्टफोनची सर्वात जास्त वेगाने झालेली विक्री आहे. शाओमीचा दावा आहे कि फक्त 9 महिन्यात एवढे हँडसेट विकून रेडमी 5ए भारतातील सर्वात वेगवान 1 कोटींचा सेल करणारा फोन बनला आहे.
विशेष म्हणजे नोव्हेंबर मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी 5ए ने पहिल्याच महिन्यात 10 लाख स्मार्टफोन विकून रेकॉर्ड बनवला होता. आता कंपनी ने रेडमी 5ए चे 1 कोटी हँडसेट विकून नवीन कीर्तिमान स्थापन केला आहे. किंमत पाहता शाओमी रेडमी 5ए इंडिया मध्ये दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे. फोनचा 2जीबी रॅम/16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो तसेच फोनचा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.
शाओमी रेडमी 5ए चे स्पेसिफिकेशन्स पाहता फोन मध्ये 1280×720 पिक्सल रेजल्यूशन वाली 5-इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड नुगट सह सादर करण्यात आला आहे जो 1.4गीगाहट्र्ज क्वॉडकोर स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो. रेडमी 5ए मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा रियर आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी 5ए मध्ये डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.















