सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी पुन्हा एकदा सर्व कंपन्यांना मागे टाकत पुढे गेली आहे. यावेळी कंपनीच्या बजेट स्मार्टफोन Redmi 5A ने जी कमाल केली आहे ती सॅमसंग आणि नोकिया साठी धोक्याची घंटा आहे असे म्हणता येईल.

कारण, शाओमी Redmi 5A साल 2018 मध्ये भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला आहे. हि माहिती काउंटरपॉइंटच्या 2018 च्या ऐनुअल सेल्स रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. शाओमीच्या Redmi 5A ने सर्वात जास्त विकला जाणाऱ्या एंडरॉयड स्मार्टफोनच्या रेस मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S9 ला मोठ्या अंतराने मात दिली आहे.

पण 2018 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये iPhone X टॉपला आहे. ग्लोबली स्मार्टफोनचा सेल पहिला तर या लिस्ट मध्ये Redmi 5A पाचव्या नंबर वर आहे. चला बघूया 2018 च्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या रेस मध्ये कोणता फोन कोणत्या नंबर आहे.

विशेष म्हणजे ऍप्पल आईफोन एक्स साल 2017 मध्ये कंपनी ने आपल्या 10व्या एनिवर्सरी मध्ये लॉन्च केला होता. तसेच दुसऱ्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर दुसऱ्या नंबर वर iPhone 8 आणि तिसऱ्या नंबर वर iPhone 8 Plus आहे. तसेच साल 2016 मध्ये कंपनी ने iPhone 7 लॉन्च केला होता जो जगात विकला जाणारा चौथ्या नंबरचा स्मार्टफोन आहे.

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2019 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) टॉप वर होती. कंपनीची भारतीय बाजारात भागेदारी 29 टक्के आहे. याची माहिती काउंटरप्वाइंटच्या एका रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. पण याकाळात Xiaomi च्या दरवर्षीच्या आकड्यांच्या आधारावर 2 तक्क्याची घसरण दिसली आहे. गेल्यावर्षी कंपनीचा या तिमाहीत 31 टक्के मार्केट शेअर होता. तसेच दुसऱ्या नंबर वर 23 टक्के मार्केट शेअर सह सॅमसंग आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here