सॅमसंग पुन्हा नंबर एक वर, शाओमी ला मागे टाकत बनला भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड, रेडमी 5ए आहे टॉप सेलिंग फोन

सॅमसंग आणि चीन ची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी शाओमी भारतीय बाजारात एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. यात कोणतेही दुमत नसावे की अनेक वर्षांपासून इंडियन मोबाइल मार्केट वर राज्य करणार्‍या सॅमसंग ला शाओमी कडून चांगलीच टक्कर मिळाली आहे. काही वर्षांमध्ये शाओमी ने भारतीय स्मार्टफोन यूजर्स मध्ये खुप चांगल स्थान बनवल आहे आणि आपल्या स्वस्त स्मार्टफोंस मुळे कमी काळात देशात प्रसिद्ध झाली आहे. सॅमसंग आणि शाओमी च्या या शर्यतीत सॅमसंग ने पुन्हा एकदा शाओमी ला मागे टाकले आहे. साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा रिपोर्ट समोर आला आहे ज्या नुसार सॅमसंग शाओमी ला मागे टाकत भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी स्मार्टफोन कंपनी बनली आहे.

सॅमसंग ने इंडियन स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. देशात स्मार्टफोंस ची सर्वात जास्त विक्री करण्याच्या बाबतीत सॅमसंग ने शाओमी ला मागे टाकले आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने सादर केला आहे. काउंटरप्वाइंट च्या रिपोर्ट नुसार भारतात दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग चा मार्केट शेयर सर्वात जास्त होता. सॅमसंग ने जून 2018 च्या शेवटपर्यंत 29 टक्के इंडियन स्मार्टफोन मार्केट वर ताबा मिळवला आहे, तर बाजारात शाओमी चा शेयर 28 टक्के आहे.

शाओमी मागच्या काही काळापासून भारतात सर्वात जास्त विकला जाणारा ब्रांड होता. पण आता पुन्हा एकदा सॅमसंग शाओमी ला मागे टाकत पहिल्या नंबर वर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सॅमसंग ने घोषणा केली होती की कंपनी ने आपल्या नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 चा 2 मिलियन पेक्षा जास्त सेल केला आहे. दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग टॉप ला येण्याचे श्रेय पण याच नवीन स्मार्टफोंस ला दिले जात आहे. बोलले जात आहे की गॅलेक्सी जे6 आणि गॅलेक्सी जे8 सीरीज लोकांना आवडले आहेत आणि या स्मार्टफोंस च्या रेकॉर्ड सेल मुळे सॅमसंग पुन्हा एकदा एक नंबर वर आली आहे.

काउंटरप्वाइंट च्या या रिसर्च रिपोर्ट नुसार सॅमसंग आणि शाओमी नंतर 12 टक्के मार्केट शेयर सह वीवो तिसर्‍या आणि 10 टक्के शेयर सह ओपो चौथ्या नंबर वर आली आहे. तर आॅनर ने पण 2 टक्के मार्केट शेयर वाढवत भारतातील स्मार्टफोन बाजारात पाचवे स्थान मिळवले आहे. लक्षात घ्या गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत सॅमसंग चा 24 टक्के मार्केट शेयर वर ताबा होता तर शाओमी ने 16 टक्के मार्केट शेयर घेतला होता. पण आता फक्त 15 महिन्यांनंतर सॅमसंग 24 टक्क्यांवरून 29 टक्क्यांवर पोचली आहे तर शाओमी ने 16 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर झेप घेतली आहे.

2018 च्या दुसर्‍या तिमाहीत सर्वात जास्त विकले जाणारे स्मार्टफोंस पाहता यात शाओमी च्या रेडमी 5ए चे नाव सर्वात वरती आहे. तसेच दुसर्‍या नंबर वर पण शाओमी चा रेडमी नोट 5 प्रो आहे. या यादीत सॅमसंग गॅलेक्सी जे6 स्मार्टफोन तिसर्‍या नंबर वर राहिला आहे तर शाओमी रेडमी नोट 5 चौथ्या स्थानावर आहे. टॉप 5 स्मार्टफोन च्या लिस्ट मध्ये वीवो ने पण जागा मिळवली आहे. कंपनी चा वीवो वाय71 या लिस्ट मध्ये पाचवा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here