Xiaomi Redmi 6 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Sep 2018 10:30:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,000 एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी रेडमी 6 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 06 Sep 2018 07:08:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1967 जसे—जसे शाओमी चे मार्केट भारतात वाढत आहे तसे—तसे कंपनी देशात जास्त फोन मॉडेल लॉन्च करत आहे. आधी वर्षातून दोन तीन मॉडेलच येत होते तर आता एकाच वेळी तीन मॉडेल सादर केले जात आहेत. आज पण असेच काहीसे झाले आहे. भारतातील नंबर एक स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने भारतीय बाजारात रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ […]

The post 4,000 एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी रेडमी 6 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जसे—जसे शाओमी चे मार्केट भारतात वाढत आहे तसे—तसे कंपनी देशात जास्त फोन मॉडेल लॉन्च करत आहे. आधी वर्षातून दोन तीन मॉडेलच येत होते तर आता एकाच वेळी तीन मॉडेल सादर केले जात आहेत. आज पण असेच काहीसे झाले आहे. भारतातील नंबर एक स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने भारतीय बाजारात रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ तीन मॉडेल सादर केले आहेत. कंपनी ने शाओमी रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो आणले आहेत. यात सर्वात दमदार रेडमी 6 प्रो आहे आणि प्रत्येकजण त्यासाठी उत्सुक आहे. रेडमी 6ए बद्दलच्या संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा आणि रेडमी 6 बद्दल वाचायचे असेल तर इथे क्लिक करा.

शाओमी रेडमी 6 प्रो च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सेल रेज्ल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या बजेट मध्ये नेमकेच फोन या स्पेसिफिकेशन सह येतात. तसेच खास बाब म्हणजे कमी रेंज मध्ये येऊन सुद्धा कंपनी ने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे ज्यात नॉच आहे. पण कंपनी ने स्क्रीन प्रोटेक्शन ची माहिती दिली नाही.

शाओमी रेडमी 6 प्रो मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओ​रियो वर आधारित आहे. फोन मध्ये होम पॅनल वरच तुम्हाला मेन्यू मिळेल. त्याचबरोबर मी थीम्स आणि वॉलपेपर मिळतील. तसेच एआई अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस वर आधारित काही सेवा पण वापरता येतील.

प्रोसेसिंग पाहता हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जरी हा प्रोसेसर थोडा जुना असला तरी परफॉर्मेंस च्या बाबतीत चांगला आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6 प्रो मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा वर्टिकल शेप मध्ये सादर केला आहे आणि कॅमेरा सोबतच एलईडी फ्लॅश आहे. फोन मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सल चा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर नॉच च्या वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो 3जीबी आणि 4जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. या सोबत मेमरी वेरियंट पण थोडे वेगळे आहेत. तुम्हाला हा फोन 32जीबी आणि 64जीबी च्या स्टोरेज वेरियंट मध्ये मिळतील. फोन मध्ये एक्सपेंडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी चे कार्ड वापरु शकता.

डाटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि खास बाब म्हणजे माक्रोएसडी कार्ड साठी वेगळा स्लॉट आहे. ज्यामुळे तुम्ही दोन सिम सोबत कार्ड पण वापरू शकता. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ आहे. कंपनी ने हा माइक्रो यूएसबी कनेक्टिविटी सह सादर केला आहे.

चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत फोन मध्ये मोठी बॅटरी पण देण्यात आली आहे. हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरी सह येतो. तसेच सिक्योरिटी साठी फोन च्या मागच्या पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि हा फेस अनलॉक ला पण सपोर्ट करतो.

शाओमी ने रेडमी 6 प्रो च्या 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वाला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. हा फोन 12 सप्टेंबर पासून आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया आणि मी इंडिया स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4,000 एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी रेडमी 6 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/#respond Mon, 25 Jun 2018 05:25:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1026 चीनी बाजारात हा स्मार्टफोन रेड, चेरी, ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो उद्या पासून म्हणजे 26 जून पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी अंर्तराष्ट्रीय बाजारात खुप आक्रमक दिसत आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये कंपनी ने एका नंतर एक अनेक स्मार्टफोन व स्मार्ट डिवाईस लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या रेडमी 6 सीरीज च्या स्मार्टफोन नंतर आता कंपनी ने अजून एक नवीन स्मार्टफोन रेडमी 6प्रो लॉन्च केला आहे. शाओमी ने हा डिवाईस लो बजट सेग्मेंट मध्ये सादर केला आहे ज्यात कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत.

रेडमी 6प्रो के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात नॉच आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट एंडरॉयड सह मीयूआई 9 ला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंग साठी यात आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट देण्यात आला आहे.

शाओमी ने आपल्या या फोन मध्ये एआई टेक्निक दिली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश आहे. डुअल रियर कॅमेरा 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा आहे तर फोन च्या फ्रंट पॅनल वर नॉच मधील सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सल चा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर हा फोन फेस अनलॉक टेक्निकला पण सपोर्ट करतो.

रेडमी 6प्रो रियल डुअल सिम फोन आहे ज्यात 2 ​सिम स्लॉट सोबत 256जीबी पर्यंतचा माइक्रोएसडी कार्ड वापरता येईल. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा स्मार्टफोन रेड, चेरी, ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो उद्या पासून म्हणजे 26 जून पासून तिथे सेल साठी उपलब्ध होईल.

शाओमी ने रेडमी 6प्रो तिन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे. पहिला वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी ला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 999 युआन (​जवळपास 10,500 रुपये) आहे. दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम व 32जीबी मेमरी सह 1,199 युआन (​जवळपास 12,500 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे तसेच तिसर्‍या वेरिएंट ची किंमत 1,299 युआन (​जवळपास 13,500 रुपये) ठेवण्यात आली आहे आणि हा 4जीबी रॅम सह 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो.

The post शाओमी रेडमी 6प्रो लॉन्च, नॉच डिस्प्ले सह 4,000एमएएच बॅटरी, डुअल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-launched-with-notch-display-4000mah-battery-dual-camera-and-4-gb-ram/feed/ 0
लॉन्च च्या आधी समोर आले शाओमी रेडमी 6प्रो चे फोटो, डुअल कॅमेरा सह मिळाली नॉच डिसप्ले ची माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-live-photo-leak-with-notch-display-and-dual-camera-before-official-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-live-photo-leak-with-notch-display-and-dual-camera-before-official-launch-in-marathi/#respond Thu, 21 Jun 2018 05:43:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=991 शाओमी रेडमी 6प्रो च्या समोर आलेल्या लीक नुसार या स्मार्टफोन मध्ये 4जीबी रॅम असेल तसेच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.

The post लॉन्च च्या आधी समोर आले शाओमी रेडमी 6प्रो चे फोटो, डुअल कॅमेरा सह मिळाली नॉच डिसप्ले ची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल कालच आम्ही बातमी दिली होती की कंपनी येणार्‍या 25 जूनला आपल्या रेडमी सीरीज चा नवीन स्मार्टफोन रेडमी 6प्रो लॉन्च करणार आहे. रेडमी 6प्रो सोबत कंपनी आपली टॅबलेट सीरीज पुढे नेत मी पॅड 4 पण सादर करेल. शाओमी च्या या दोन्ही डिवाईस चा लॉन्च इन्वाईट चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आला होता. तसेच आज रेडमी 6प्रो ची रियल ईमेज पण इंटरनेट वर लीक झाल्या आहेत. या फोटो वरून शाओमी च्या आगामी फोन च्या डिजाईन व फीचर्स ची माहिती मिळाली आहे.

वेईबो वर शाओमी रेडमी 6प्रो ची रियर ईमेज शेयर करण्यात आल्या आहेत. वेबसाइट वर फोनचे 6 फोटो शेयर करण्यात आले आहेत ज्यात फोन फ्रंट व बॅक पॅनल सह साईड एंगल वरून पण दाखवण्यात आला आहे. फोटो समोर आल्यामुळे समजले आहे की शाओमी रेडमी 6प्रो नॉच डिस्प्ले असलेला बेजल लेस स्मार्टफोन असेल. फोनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा व सेंसर सह नॉच आहे तर फोन च्या चारी बाजूला बारीक बेजल पण देण्यात आली आहे.

रेडमी 6प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल जो 2280 × 1080 पिक्सेल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. फोटो मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत. फोन च्या रियर पॅनल वर वरच्या आणि खालच्या बाजूला एंटिना बँड डिजाईन आहे.

शाओमी रेडमी 6प्रो च्या समोर आलेल्या लीक नुसार या स्मार्टफोन मध्ये 4जीबी रॅम असेल तसेच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल. फोनचा डुअल रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल चा असेल तर यात 5 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी 6प्रो मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी सांगण्यात आली आहे.

The post लॉन्च च्या आधी समोर आले शाओमी रेडमी 6प्रो चे फोटो, डुअल कॅमेरा सह मिळाली नॉच डिसप्ले ची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-live-photo-leak-with-notch-display-and-dual-camera-before-official-launch-in-marathi/feed/ 0
25 जूनला लॉन्च होतील शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4, जाणून घ्या काय असेल खासीयत यांची https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-xiaomi-mi-pad-4-to-launch-on-25-june-with-8-inch-screen-and-4000mah-battery-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-xiaomi-mi-pad-4-to-launch-on-25-june-with-8-inch-screen-and-4000mah-battery-in-marathi/#respond Wed, 20 Jun 2018 06:23:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=972 चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वेईबो वर शाओमी चा लॉन्च इन्वाईट शेयर करण्यात आला आहे.

The post 25 जूनला लॉन्च होतील शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4, जाणून घ्या काय असेल खासीयत यांची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने टेक बाजारात आपली स्थिती मजबूत केली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमी सर्वात मोठा ब्रांड बनली आहे आणि आता शाओमी जागतिक मंचावर वेगाने पुढे जाऊ पाहत आहे. कदाचीत याच कारणामुळे लागोपाठ शाओमी नव नवीन डिवाईस लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी मी 8 स्मार्टफोन मॉडेल्स आणि रेडमी 6 व रेडमी 6ए फोन लॉन्च झाले होते आता कंपनी रेडमी 6प्रो स्मार्टफोन आणि मी पॅड 4 लॉन्च करणार आहे. शाओमी या 25 जूनला आपले हे दोन्ही डिवाईस टेक जगासमोर आणणार आहे.

चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वेईबो वर शाओमी चा लॉन्च इन्वाईट शेयर करण्यात आला आहे. वेबसाइट वरून माहिती मिळाली आहे की शाओमी येणार्‍या 25 जूनला चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी रेडमी 6प्रो स्मार्टफोन आणि मी पॅड 4 लॉन्च करेल. शाओमी च्या या मीडिया इन्वाईट मध्ये फुटबॉल ग्राउंड दाखविण्यात आला आहे ज्यावरून शाओमी चे हे डिवाईस फीफा वर्ल्ड कप 2018 संबधी असू शकतात.

शाओमी रेडमी 6प्रो चा लॉन्च पोस्टर पाहता यात फुटबॉल ग्राउंड वर खेळाडूंची प्लेसमेंट दाखवण्यात आली आहे. या पोस्टर मध्ये खेळाडूंच्या जर्सी वर काही नंबर ​लिहिण्यात आले आहेत जे फोन चे स्पेसिफिकेशन्स पण जाहिर करतात. या पोस्टर वरून समजले आहे की रेडमी 6प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिजाईन वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये आर्टिफिशियल ​टेक्निक असू शकते आणि फोन चा कॅमेरा पण एआई फीचर सह काम करेल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट ​दिला जाईल आणि हा फोन 4,000एमएएच च्या मोठया बॅटरी वर चालेल.

शाओमी मी पॅड 4 च्या पोस्टर मध्ये पण फुटबॉल ग्राउंड दाखवण्यात आला आहे. यात मी पॅड 4 चा बॅक पॅनल पण दाखवण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये वरच्या बाजूला एंटिना बँड डिजाईन दिसत आहे तसेच बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोटो मध्ये रियर कॅमेरा सोबत फ्लॅश लाईट दाखविण्यात आली नाही. पोस्टर मध्ये मी पॅड 4 मध्ये 8 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4 आगामी 25 जूनला चीनी बाजारात येतील. या दोन्ही डिवाईस च्या किंमती काय असतील तसेच चीनी च्या बाहेर भारता सह अन्य बाजारांमध्ये हा डिवाईस कधी येईल याबद्दल अजून तरी काहीच बोलता येणार नाही.

The post 25 जूनला लॉन्च होतील शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4, जाणून घ्या काय असेल खासीयत यांची first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-pro-xiaomi-mi-pad-4-to-launch-on-25-june-with-8-inch-screen-and-4000mah-battery-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 15:03:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=680 किंमती बद्दल आता पर्यंत माहिती मिळाली नाही पण या फोन ची अपेक्षित किंमत 10,000 रुपये आहे.

The post शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या आधी शाओमी वर्षातून दोन किंवा तीन मॉडेल घेऊन येत होती. पण मागच्या वर्षी कंपनी ने भरपूर फोन लॉन्च केले होते. यावर्षी पण आता पर्यंत भारतात पाच पेक्षा जास्त मॉडेल सादर करून झाली आहे. त्याचबरोबर कंपनी पुढच्या महिन्याच्या सुरवातीला एक नवीन फोन घेऊन येत आहे. विशेष म्हणजे शाओमी च्या फोन लॉन्च ची मालिका इथेच थांबत नाही. कंपनी च्या काही फोन बद्दल आता पासून लीक येत आहेत. यात शाओमी मी8 पासून कमी बजेट वाला रेडमी 6 पण सामिल आहे. बातमीनुसार कंपनी ने रेडमी 6 सीरीज ची तयारी केली आहे आणि काही महिन्यांत हा फोन लॉन्च पण होईल.

मागच्याच आठवड्यात आम्ही शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए बद्दल माहिती दिली होती. हे फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आज रेडमी मी 6 प्लस पण दिसला आहे आणि हा फोन डिजाइन च्या बाबतीत त्या दोन्ही मॉडेल पेक्षा खुप वेगळा आहे. शाओमी रेडमी 6 प्लस मध्ये आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 6 मॉडेल नंबर एम1805डी1एसई नावाने टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. पण हा लॉन्च च्या वेळी रेडमी 6 प्लस किंवा रेडमी 6 प्रो नावाने लॉन्च केला जाईल याबद्दल काही विशेष माहिती मिळाली नाही पण फोन ला सध्या 6 प्लस बोलले जात आहे.

नॉच स्क्रीन सह शाओमी रेडमी 6 प्लस मॉडेल जुन्या रेडमी 5 आणि 5 प्लस मॉडेल पेक्षा थोडा मोठा आहे. तसेच मागच्या पॅनल वर तुम्हाला डुअल रियर कॅमेरा मिळेल. तर फ्रंट पॅनल वर नॉच स्क्रीन सह काही सेंसर देण्यात आले आहेत. फोन चे स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये तुम्हाला 5.84—इंचाची स्क्रीन मिळेल.

फोन मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो वाल बेजल लेस फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर सादर करू शकते आणि यात 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. पण बातमी आहे की एक वेरियंट मीडियाटेक हेलियो चिपसेट सह पण लॉन्च होऊ शकतो.

आधी आलेल्या लीक नुसार शाओमी रेडमी 6 प्लस 2जीबी/3जीबी/4जीबी रॅम वेरियंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला 12—मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा आणि 5—मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. टेना वर लिस्ट केलेल्या फोन मध्ये स्पष्ट दिसत आहे की हा एंडरॉयड ओरियो 8.1 वर आधारित आहे. याच्या किंमती बद्दल आता पर्यंत माहिती मिळाली नाही पण या फोन ची अपेक्षित किंमत 10,000 रुपये आहे.

The post शाओमी रेडमी 6 प्लस ची माहिती लीक, स्वस्तात मिळेल आयफोन 10 सारखा नॉच डिसप्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-listed-on-teena-specification-and-features-in-marathi/feed/ 0