25 जूनला लॉन्च होतील शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4, जाणून घ्या काय असेल खासीयत यांची

शाओमी ने टेक बाजारात आपली स्थिती मजबूत केली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमी सर्वात मोठा ब्रांड बनली आहे आणि आता शाओमी जागतिक मंचावर वेगाने पुढे जाऊ पाहत आहे. कदाचीत याच कारणामुळे लागोपाठ शाओमी नव नवीन डिवाईस लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी मी 8 स्मार्टफोन मॉडेल्स आणि रेडमी 6 व रेडमी 6ए फोन लॉन्च झाले होते आता कंपनी रेडमी 6प्रो स्मार्टफोन आणि मी पॅड 4 लॉन्च करणार आहे. शाओमी या 25 जूनला आपले हे दोन्ही डिवाईस टेक जगासमोर आणणार आहे.

चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वेईबो वर शाओमी चा लॉन्च इन्वाईट शेयर करण्यात आला आहे. वेबसाइट वरून माहिती मिळाली आहे की शाओमी येणार्‍या 25 जूनला चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी रेडमी 6प्रो स्मार्टफोन आणि मी पॅड 4 लॉन्च करेल. शाओमी च्या या मीडिया इन्वाईट मध्ये फुटबॉल ग्राउंड दाखविण्यात आला आहे ज्यावरून शाओमी चे हे डिवाईस फीफा वर्ल्ड कप 2018 संबधी असू शकतात.

शाओमी रेडमी 6प्रो चा लॉन्च पोस्टर पाहता यात फुटबॉल ग्राउंड वर खेळाडूंची प्लेसमेंट दाखवण्यात आली आहे. या पोस्टर मध्ये खेळाडूंच्या जर्सी वर काही नंबर ​लिहिण्यात आले आहेत जे फोन चे स्पेसिफिकेशन्स पण जाहिर करतात. या पोस्टर वरून समजले आहे की रेडमी 6प्रो 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिजाईन वर सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये आर्टिफिशियल ​टेक्निक असू शकते आणि फोन चा कॅमेरा पण एआई फीचर सह काम करेल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट ​दिला जाईल आणि हा फोन 4,000एमएएच च्या मोठया बॅटरी वर चालेल.

शाओमी मी पॅड 4 च्या पोस्टर मध्ये पण फुटबॉल ग्राउंड दाखवण्यात आला आहे. यात मी पॅड 4 चा बॅक पॅनल पण दाखवण्यात आला आहे. या डिवाईस मध्ये वरच्या बाजूला एंटिना बँड डिजाईन दिसत आहे तसेच बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोटो मध्ये रियर कॅमेरा सोबत फ्लॅश लाईट दाखविण्यात आली नाही. पोस्टर मध्ये मी पॅड 4 मध्ये 8 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

शाओमी रेडमी 6प्रो आणि शाओमी मी पॅड 4 आगामी 25 जूनला चीनी बाजारात येतील. या दोन्ही डिवाईस च्या किंमती काय असतील तसेच चीनी च्या बाहेर भारता सह अन्य बाजारांमध्ये हा डिवाईस कधी येईल याबद्दल अजून तरी काहीच बोलता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here