शाओमी बद्दल कालच आम्ही बातमी दिली होती की कंपनी येणार्या 25 जूनला आपल्या रेडमी सीरीज चा नवीन स्मार्टफोन रेडमी 6प्रो लॉन्च करणार आहे. रेडमी 6प्रो सोबत कंपनी आपली टॅबलेट सीरीज पुढे नेत मी पॅड 4 पण सादर करेल. शाओमी च्या या दोन्ही डिवाईस चा लॉन्च इन्वाईट चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर करण्यात आला होता. तसेच आज रेडमी 6प्रो ची रियल ईमेज पण इंटरनेट वर लीक झाल्या आहेत. या फोटो वरून शाओमी च्या आगामी फोन च्या डिजाईन व फीचर्स ची माहिती मिळाली आहे.
वेईबो वर शाओमी रेडमी 6प्रो ची रियर ईमेज शेयर करण्यात आल्या आहेत. वेबसाइट वर फोनचे 6 फोटो शेयर करण्यात आले आहेत ज्यात फोन फ्रंट व बॅक पॅनल सह साईड एंगल वरून पण दाखवण्यात आला आहे. फोटो समोर आल्यामुळे समजले आहे की शाओमी रेडमी 6प्रो नॉच डिस्प्ले असलेला बेजल लेस स्मार्टफोन असेल. फोनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा व सेंसर सह नॉच आहे तर फोन च्या चारी बाजूला बारीक बेजल पण देण्यात आली आहे.

रेडमी 6प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की या फोन मध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल जो 2280 × 1080 पिक्सेल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. फोटो मध्ये फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅश आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत. फोन च्या रियर पॅनल वर वरच्या आणि खालच्या बाजूला एंटिना बँड डिजाईन आहे.
शाओमी रेडमी 6प्रो च्या समोर आलेल्या लीक नुसार या स्मार्टफोन मध्ये 4जीबी रॅम असेल तसेच हा क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल. फोनचा डुअल रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल चा असेल तर यात 5 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी रेडमी 6प्रो मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी सांगण्यात आली आहे.















