4,000 एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला शाओमी रेडमी 6 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही

जसे—जसे शाओमी चे मार्केट भारतात वाढत आहे तसे—तसे कंपनी देशात जास्त फोन मॉडेल लॉन्च करत आहे. आधी वर्षातून दोन तीन मॉडेलच येत होते तर आता एकाच वेळी तीन मॉडेल सादर केले जात आहेत. आज पण असेच काहीसे झाले आहे. भारतातील नंबर एक स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी ने भारतीय बाजारात रेडमी 6 सीरीज मध्ये एक साथ तीन मॉडेल सादर केले आहेत. कंपनी ने शाओमी रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो आणले आहेत. यात सर्वात दमदार रेडमी 6 प्रो आहे आणि प्रत्येकजण त्यासाठी उत्सुक आहे. रेडमी 6ए बद्दलच्या संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा आणि रेडमी 6 बद्दल वाचायचे असेल तर इथे क्लिक करा.

शाओमी रेडमी 6 प्रो च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सेल रेज्ल्यूशन वाला 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या बजेट मध्ये नेमकेच फोन या स्पेसिफिकेशन सह येतात. तसेच खास बाब म्हणजे कमी रेंज मध्ये येऊन सुद्धा कंपनी ने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे ज्यात नॉच आहे. पण कंपनी ने स्क्रीन प्रोटेक्शन ची माहिती दिली नाही.

शाओमी रेडमी 6 प्रो मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओ​रियो वर आधारित आहे. फोन मध्ये होम पॅनल वरच तुम्हाला मेन्यू मिळेल. त्याचबरोबर मी थीम्स आणि वॉलपेपर मिळतील. तसेच एआई अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस वर आधारित काही सेवा पण वापरता येतील.

प्रोसेसिंग पाहता हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 2.0गीगाहट्र्जचा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. जरी हा प्रोसेसर थोडा जुना असला तरी परफॉर्मेंस च्या बाबतीत चांगला आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी 6 प्रो मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा वर्टिकल शेप मध्ये सादर केला आहे आणि कॅमेरा सोबतच एलईडी फ्लॅश आहे. फोन मध्ये एक सेंसर 12-मेगापिक्सल चा आहे तर दुसरा 5-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर नॉच च्या वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो 3जीबी आणि 4जीबी रॅम मेमरी सह उपलब्ध आहे. या सोबत मेमरी वेरियंट पण थोडे वेगळे आहेत. तुम्हाला हा फोन 32जीबी आणि 64जीबी च्या स्टोरेज वेरियंट मध्ये मिळतील. फोन मध्ये एक्सपेंडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी चे कार्ड वापरु शकता.

डाटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे आणि खास बाब म्हणजे माक्रोएसडी कार्ड साठी वेगळा स्लॉट आहे. ज्यामुळे तुम्ही दोन सिम सोबत कार्ड पण वापरू शकता. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ आहे. कंपनी ने हा माइक्रो यूएसबी कनेक्टिविटी सह सादर केला आहे.

चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत फोन मध्ये मोठी बॅटरी पण देण्यात आली आहे. हा फोन 4,000एमएएच च्या बॅटरी सह येतो. तसेच सिक्योरिटी साठी फोन च्या मागच्या पॅनल वर फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल आणि हा फेस अनलॉक ला पण सपोर्ट करतो.

शाओमी ने रेडमी 6 प्रो च्या 3जीबी रॅम + 32जीबी मेमरी वेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वाला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. हा फोन 12 सप्टेंबर पासून आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया आणि मी इंडिया स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here