Xiaomi redmi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/#respond Thu, 25 Apr 2019 11:37:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4160 फोनच्या नावाच्या जागी Redmi 855 लिहिण्यात आले आहे.

The post शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल अनेक दिवसांपासून बातमी येत आहे कि कंपनी एका नवीन हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस वर काम करत आहे जो क्वालकॉमच्या सर्वात नवीन आणि सर्वात ​पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाईल. अनेक लीक्स मध्ये या स्मार्टफोनचे नाव Redmi Pro 2 सांगण्यात आले आहे पण अजूनतरी स्पष्ट झाले नाही कि कि Redmi Pro 2 शाओमी स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर करेल किंवा हा या चिपसेट वर आधारित फोन एखाद्या दुसऱ्या नावाने टेक मंचावर येईल. शाओमीने अजूनपर्यंत या फोनचे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत तसेच एका ताजा लीक मध्ये या फोन स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

शाओमी के स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर शेयर केले गेले आहेत. या वेबसाइट वर टिपस्टर द्वारा एक फोटो फाईल अपलोड करण्यात आला आहे ज्यात शाओमीच्या आगामी स्मार्टफोनच्या मुख्य स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. तसेच हीच फोटो फाईल स्लॅशलीक वेबसाइट वर पण शेयर करण्यात आली आहे जिथे फोनच्या नावाच्या जागी Redmi 855 लिहिण्यात आले आहे.

Redmi 855 स्पेसिफिकेशन्स
शाओमीच्या या फोनची सर्वात मोठी खासियत फोन मधील क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असेल. विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 855 क्वालकॉम द्वारा लॉन्च केला गेलेला आतापर्यंतचा सर्वात पावरफुल चिपसेट आहे. हा चिपसेट फक्त फास्ट प्रोसेसिंग देत नाही तर सोबत हा चिपसेट असलेले स्मार्टफोन 5जी नेटवर्कला पण सपोर्ट करतात. हा चिपसेट सध्या फक्त हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस साठी आणण्यात आला आहे.

हे देखील वाचा: ट्रेन मध्ये हरवला ऑनरचा फोन, शोधून देणाऱ्याला मिळेल 3,90,000 रुपयांचे बक्षीस

इतर स्पेसिफिकेशन्स पाहता ताजा लीक नुसार या फोन मध्ये 2340 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.39-इंचाचा डिस्प्ले​ दिला जाईल. बोलले जात आहे कि शाओमीचा हा फोन एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल आणि ज्यामुळे फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळू शकतो. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्वतः रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबिंग यांनी म्हटले होते कि कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन हाई स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला जाईल.

लीक नुसार रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन 8जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफी सेग्मेंट पाहता लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये दुसरा कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा असेल तसेच तिसरा कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सलचा दिला जाईल.

कथित Redmi 855 मध्ये सेल्फी साठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची बातमी पण या लीक मध्ये सावर आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शाओमीचा एका फोनचा फोटो पण समोर आला होता ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा दाखवण्यात आला होता. बोलले जात आहे कि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट असलेल्या शाओमीच्या फोन मध्ये पण हा पॉप-अप सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. लीक नुसार शाओमीच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये एनएफसी कनेक्टिविटी मिळेल.

हे देखील वाचा: BSNL ने या तीन प्लान मध्ये केले बदल, मिळेल 25 पट जास्त डेटा

शाओमीने अजूनतरी या फोनचे नाव आणि याची लॉन्च स्थिति बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपनी एखादी आफिशियल घोषणा करत नाही तोपर्यंत या फोन संबंधीत स्पेसिफिकेशन्स पण निश्चित म्हणता येणार नाहीत.

weibo

The post शाओमीची तयारी! 8जीबी रॅम, 48-एमपी ट्रिपल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर लॉन्च होईल हा दमदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-snapdragon-855-phone-specs-leaked-8gb-ram-48mp-triple-camera/feed/ 0
चीन पेक्षा पण जास्त भारतात विकले जातात शाओमीचे फोन! https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-smartphone-sale-higher-in-india-than-china-q4-2018-counterpoint-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-smartphone-sale-higher-in-india-than-china-q4-2018-counterpoint-in-marathi/#respond Fri, 15 Feb 2019 13:16:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3639 या रिपोर्ट मध्ये असे पण समोर आले होते कि या 1423 लाख स्मार्टफोन्स मध्ये सर्वात जास्त मोबाईल शाओमीचे होते.

The post चीन पेक्षा पण जास्त भारतात विकले जातात शाओमीचे फोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन बाजारासंबंधित एक धक्कादायक रिपोर्ट अलीकडेच समोर आला होता. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये भारतात 143 मिलियन पेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकत घेतले गेले आहेत. हे आकडे 14,23,00,000 फोन्स पेक्षा पण जास्त आहेत. या रिपोर्ट मध्ये असे पण समोर आले होते कि या 1423 लाख स्मार्टफोन्स मध्ये सर्वात जास्त मोबाईल शाओमीचे होते. आता शाओमी संबंधित अजून एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि शाओमी स्मार्टफोन्स जगात सर्वात जास्त भारतात विकत घेतले जातात. म्हणजे शाओमी आपल्या होम मार्केट चीन पेक्षा पण जास्त भारतात विकली जाते.

भारत आहे शाओमीचा सर्वात मोठा बाजार
शाओमी संबंधित हा रिपोर्ट काउंटरप्वाइंट ने शेयर केला आहे. या रिपोर्टनुसार शाओमी द्वारा संपूर्ण जगात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्सचा 36 टक्के हिस्सा फक्त भारतातच विकला गेला आहे. पहिल्यांदाच एखादा चीनी ब्रँड आपल्या देशापेक्षा जास्त दुसऱ्या देशात खरेदी केला गेला आहे. शाओमीच्या एकूण जागतिक बाजाराचा 36 टक्के हिस्सा भारतात विकला जातो तर चीन मध्ये हि कंपनी आपल्या स्मार्टफोन बाजाराचा 35 टक्के हिस्सा विकते. हे आकडे साल 2018 च्या अंतिम तिमाहीचे आहे.

पडल्यावर पण येणार नाही स्क्रॅच, सॅमसंग ने लॉन्च केला 8-इंच डिस्प्ले आणि 4,450एमएएच बॅटरी असलेला गॅलेक्सी टॅब एक्टिव2

किती शाओमी फोन विकते भारतात
काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि साल 2018 मध्ये इंडियन स्मार्टफोन बाजाराचा 28.9 टक्के हिस्सा शाओमी ब्रँडच्या नावे होता. साल 2018 मध्ये शाओमीचे 41.1 मिलियन पेक्षा जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. या यादीत सॅमसंग दुसऱ्या नंबर वर आली आहे जिला 22.4 टक्के मार्केट शेयर मिळाला आहे. अशाप्रकारे 10 टक्के मार्केट शेयर सह वीवो तिसऱ्या तसेच 7.2 टक्के मार्केट शेयर सह ओपो चौथ्या नंबर वर आहे. साल 2018 मध्ये शाओमीचे 41.1 मिलियन पेक्षा जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत.

टेक्नो ने लॉन्च केले दोन नवीन फोन, 3जीबी रॅम सोबत डुअल कॅमेरा, किंमत 6699 रुपयांपासून सुरू

कोणत्या देशात कशी आहे शाओमीची परिस्थिती
शाओमी ने चीनला पण मागे टाकत सर्वात जास्त स्मार्टफोन भारतात विकले आहेत. तसेच या दोन देशांव्यतिरिक्त इत्तर आशियायी देशांत शाओमीचा शेयर 16 टक्के आहे. तसेच यूरोप मध्ये शाअेामी ने 8 टक्के स्मार्टफोन विकले आहेत. या लिस्टनुसार शाओमी ने मीडल ईस्ट आणि आशियात 3 टक्के तसेच सेंट्रल आणि लॅटिन अमेरिकेत 2 टक्के स्मार्टफोन विकले आहेत.

The post चीन पेक्षा पण जास्त भारतात विकले जातात शाओमीचे फोन! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-smartphone-sale-higher-in-india-than-china-q4-2018-counterpoint-in-marathi/feed/ 0
शाओमी चे हे 17 स्मार्टफोन होतील लॉन्च, कंपनीचा महत्वाचा डाक्यूमेंट झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-upcoming-mi-series-redmi-series-smartphone-list-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-upcoming-mi-series-redmi-series-smartphone-list-leak-in-marathi/#respond Tue, 15 May 2018 06:20:09 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=443 शाओमी ने मागच्या आठवड्यात चीनी बाजाराच्या माध्यामातून अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन स्मार्टफोन रेडमी एस2 लॉन्च केला आहे. रेडमी एस2 लॉन्च होताच भारतीय यूजर्स पण या स्मार्टफोन च्या लॉन्च ची वाट बघत आहेत. पण शाओमी फक्त एकाच स्मार्टफोन वर थांबू इच्छित नाही. वेबसाइट ​किलरफीचर्स च्या हाती एक असा डाक्यूमेंट लागला आहे ज्यात शाओमी कडून लॉन्च केल्या […]

The post शाओमी चे हे 17 स्मार्टफोन होतील लॉन्च, कंपनीचा महत्वाचा डाक्यूमेंट झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने मागच्या आठवड्यात चीनी बाजाराच्या माध्यामातून अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन स्मार्टफोन रेडमी एस2 लॉन्च केला आहे. रेडमी एस2 लॉन्च होताच भारतीय यूजर्स पण या स्मार्टफोन च्या लॉन्च ची वाट बघत आहेत. पण शाओमी फक्त एकाच स्मार्टफोन वर थांबू इच्छित नाही. वेबसाइट ​किलरफीचर्स च्या हाती एक असा डाक्यूमेंट लागला आहे ज्यात शाओमी कडून लॉन्च केल्या जाणार्‍या 15 चे स्मार्टफोन्स ची नावे लिहिण्यात आली आहेत.

किलरफीचर्स ला यूरेशियन इकोनॉमिक कमीशन वेबसाइट वर शाओमी चे काही दस्तावेज मिळाले आहेत. या कागदांवर शाओमी च्या त्या स्मार्टफोन्स ची नावे नोंदवण्यात आली आहेत जे येणार्‍या काळात कंपनी कडून लॉन्च केले जातील. या लिस्ट मध्ये ऐकून 17 स्मार्टफोन आहेत ज्यातील रेडमी एस2 आणि मी मिक्स 2एस आधीच समोर आले आहेत.

शाओमी च्या या लिस्ट मध्ये मी 7 लाइट, मी एस1, मी एस3, रेडमी एस1, रेडमी एस3, मी मिक्स 3एस, रेडमी नोट 6, रेडमी नोट 6ए, रेडमी नोट 6ए प्राइम, रेडमी नोट 6 प्राइम, रेडमी 6 प्लस, रेडमी ए1, रेडमी ए2 स्मार्टफोन्स ची नावे लिहिण्यात आली आहेत. ही लिस्ट पाहून वाटते की शाओमी या स्मार्टफोन्स वर काम करण्याची योजना बनवत आहे आणि येणाऱ्या काळात हे स्मार्टफोन्स अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केले जाऊ शकतात.

विशेष म्हणजे या डाक्यूमेंट ची वैधता 31 डिसेंबर 2023 पर्यंत असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे म्हणजे वर सांगितलेले स्मार्टफोन या वेळेत लॉन्च केले जातील. त्यामुळे जर नावे वाचून तुम्हाला एखादा स्मार्टफोन हवा असेल तर कदाचित त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष वाट बघावी लागू शकते. पण अंदाज लावला जात आहे की या लिस्ट मधील जवळपास 5 स्मार्टफोन तरी यावर्षी बाजारात येतील.

The post शाओमी चे हे 17 स्मार्टफोन होतील लॉन्च, कंपनीचा महत्वाचा डाक्यूमेंट झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-upcoming-mi-series-redmi-series-smartphone-list-leak-in-marathi/feed/ 0
मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 13:45:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=422 शाओमी हे स्मार्टफोन्स आपल्या मर्जी ने नाही तर कोर्टाच्या आदेशा मुळे बंद करेल आणि कोर्टाच्या या आदेशाचे कारण असेल शाओमी वर लागलेला पेटेंट चोरीचा आरोप.

The post मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी शाओमी ने भारतीय टेक बाजारात कमी वेळेत जे स्थान मिळवले आहे ते क्वचितच इतर कोणती कंपनी मिळवू शकते. नेमक्याच स्मार्टफोन्स मुळे शाओमी इंडिया मध्ये नंबर वन मोबाईल ब्रांड बनली आहे. पण शाओमी ची ही चमक आता फिकी पडू शकते. कधीही अशी बातमी येऊ शकते की शाओमी कंपनी ने 8 स्मार्टफोन्स ची निर्मिती बंद केली आहे आणि हे स्मार्टफोन आता बाजारात विकले जाणार नाहीत.

ही बातमी जेवढी धक्कादायक आहे तेवढीच गोंधळात पडणारी आहे. शाओमी हे स्मार्टफोन्स आपल्या मर्जी ने नाही तर कोर्टाच्या आदेशा मुळे बंद करेल आणि कोर्टाच्या या आदेशाचे कारण असेल शाओमी वर लागलेला पेटेंट चोरीचा आरोप. या बाबतीत शाओमी चे जे 8 स्मार्टफोन धोक्यात आहेत ते म्हणजे — शाओमी मी मिक्स, रेडमी नोट 4एक्स, मी 6, मी मॅक्स 2, मी नोट 3, रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्लस (भारतात रेडमी नोट 5 प्रो ) आणि मी 5एक्स. हे सर्व 8 स्मार्टफोन्स पेटेंट चोरी वाले प्रोडक्ट आहेत असे सांगण्यात येत आहे.

हे सर्व सुरू झाले 3 महिन्यांपूर्वी जेव्हा शाओमी वर पेटेंट चे उल्लंघन केल्यामुळे एक केस दाखल करण्यात आली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही केस टाकणारी कंपनी आहे कूलपॅड. कूलपॅड ने शाओमी वर त्यांचे पेटेंट अधिकार चोरून ते वापरल्याचा आरोप केला आहे. कूलपॅड सीईओ झिआंग चँग चे म्हणेन आहे, ‘आधी आम्हाला वाटले की कोर्टाबाहेर हे प्रकरण सुटेल, पण शाओमी च्या ढसाळ कारभारामुळे कूलपॅड ला कोर्टात जावे लागले.’

कूलपॅड ने शाओमी च्या विरोधात ही केस आपली कंपनी यूलॉंग कम्प्यूटर टेक्नोलॉजी च्या माध्यमातुन दाखल केला आहे. कूलपॅड चा आरोप आहे की शाओमी आपल्या स्मार्टफोन्स मध्ये त्या टेक्निक आणि फीचर्स चा वापर करत आहे ज्यांचे पेटेंट अधिकार कूलपॅड जवळ आहेत. या पेटेंट मध्ये अॅप आॅयकन मॅनेजमेंट, नोटिफिकेशन्स आणि सिस्टम यूआई सारखे फीचर्स आहेत.

शाओमी च्या वर सांगितलेल्या 8 स्मार्टफोंन चे प्रोडक्शन आणि त्यांचा सेल ताबडतोब बंद करण्याची मागणी कूलपॅड ने केली आहे. त्याचबरोबर कूलपॅड चे म्हणणे आहे की शाओमी मुळे कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई पण शाओमी ला करावी लागेल. या भरपाई मध्ये रोख रक्कम पण असू शकते. पण शाओमी वरील आरोप सिद्ध होतील आणि कंपनी आपले 8 सुपरहिट स्मार्टफोंस बंद करेल, हे सर्व कोर्टाच्या आदेशावर अवलंबून आहे.

The post मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/feed/ 0