शाओमी चे हे 17 स्मार्टफोन होतील लॉन्च, कंपनीचा महत्वाचा डाक्यूमेंट झाला लीक

शाओमी ने मागच्या आठवड्यात चीनी बाजाराच्या माध्यामातून अंर्तराष्ट्रीय मंचावर आपला नवीन स्मार्टफोन रेडमी एस2 लॉन्च केला आहे. रेडमी एस2 लॉन्च होताच भारतीय यूजर्स पण या स्मार्टफोन च्या लॉन्च ची वाट बघत आहेत. पण शाओमी फक्त एकाच स्मार्टफोन वर थांबू इच्छित नाही. वेबसाइट ​किलरफीचर्स च्या हाती एक असा डाक्यूमेंट लागला आहे ज्यात शाओमी कडून लॉन्च केल्या जाणार्‍या 15 चे स्मार्टफोन्स ची नावे लिहिण्यात आली आहेत.

किलरफीचर्स ला यूरेशियन इकोनॉमिक कमीशन वेबसाइट वर शाओमी चे काही दस्तावेज मिळाले आहेत. या कागदांवर शाओमी च्या त्या स्मार्टफोन्स ची नावे नोंदवण्यात आली आहेत जे येणार्‍या काळात कंपनी कडून लॉन्च केले जातील. या लिस्ट मध्ये ऐकून 17 स्मार्टफोन आहेत ज्यातील रेडमी एस2 आणि मी मिक्स 2एस आधीच समोर आले आहेत.

शाओमी च्या या लिस्ट मध्ये मी 7 लाइट, मी एस1, मी एस3, रेडमी एस1, रेडमी एस3, मी मिक्स 3एस, रेडमी नोट 6, रेडमी नोट 6ए, रेडमी नोट 6ए प्राइम, रेडमी नोट 6 प्राइम, रेडमी 6 प्लस, रेडमी ए1, रेडमी ए2 स्मार्टफोन्स ची नावे लिहिण्यात आली आहेत. ही लिस्ट पाहून वाटते की शाओमी या स्मार्टफोन्स वर काम करण्याची योजना बनवत आहे आणि येणाऱ्या काळात हे स्मार्टफोन्स अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च केले जाऊ शकतात.

विशेष म्हणजे या डाक्यूमेंट ची वैधता 31 डिसेंबर 2023 पर्यंत असल्याचे बोलले जात आहे. म्हणजे म्हणजे वर सांगितलेले स्मार्टफोन या वेळेत लॉन्च केले जातील. त्यामुळे जर नावे वाचून तुम्हाला एखादा स्मार्टफोन हवा असेल तर कदाचित त्यासाठी तुम्हाला 5 वर्ष वाट बघावी लागू शकते. पण अंदाज लावला जात आहे की या लिस्ट मधील जवळपास 5 स्मार्टफोन तरी यावर्षी बाजारात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here