भारतात आपला प्रोडक्ट पॉर्टफोलियो वाढवत सॅमसंग इंडिया ने काल एक नवीन डिवाईस भारतीय बाजारात आणला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी टॅब एक्टिव2 भारतात लॉन्च केला आहे. हा टॅबलेट डिवाईस फक्त दमदार स्पेसिफिकेशन्स सह येत नाही तर कंपनी ने हा मिलिट्री ग्रेड अल्टा-ड्यूरेबलिटीने भरपूर मजबूत पण केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब एक्टिव2 देशात 50,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एक्टिव2 ची डिजाईन
सॅमसंगचा हा टॅबलेट एमआईएल-एसटीडी-810जी सर्टिफाइड आहे. सध्या शब्दात सांगायचे तर हि सर्टिफिकेट स्मार्टफोन किंवा टॅबलेटची मजबूती दाखवतो. सॅमसंगचा हा टॅबलेट पण खूप पावरफुल बिल्ड क्वॉलिटी वर बनला आहे. लादीवर पडल्यावर किंवा एखाद्या टफ वास्तूशी आदळल्यावर या टॅबलेट वर कोणताही स्क्रॅच येणार नाही. तसेच धूळ व उन्हासोबतच पाण्यात पण हा टॅबलेट सुरक्षित राहील. कंपनीच्या दाव्यानुसार हा टॅबलेट अर्धा तास 1.5मीटर पाण्याच्या आत राहू शकतो. तसेच वजा 20 डिग्री पासून 71 डिग्रीच्या उष्णतेचा सामना हा टॅबलेट सहज करू शकतो.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एक्टिव2 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगचा हा टॅबलेट 8-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा डिवाईस 3जीबी रॅम सह लॉन्च केला आहे जो 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. गॅलेक्सी टॅब एक्टिव3 एंडरॉयड च्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह येतो जो कंपनीच्या एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालतो.
फोटोग्राफी साठी गॅलेक्सी टॅब एक्टिव2 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी हा टॅबलेट 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 4जी सपोर्ट व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी या टॅबलेट मध्ये 4,450एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या डिवाईसच्या फ्रंट पॅनल वर होम तसेच नेविगेशन बटण पण देण्यात आले आहेत.