ZEE5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/ https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/#respond Wed, 15 Feb 2023 10:46:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17839 13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे. Vaalvi On Zee5 वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी […]

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डार्क कॉमेडी असलेला मराठी चित्रपट ‘वाळवी’ येतोय ओटीटीवर
  • झी5 वर घर बसल्या पाहता येणार ‘वाळवी’
  • स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे प्रमुख भूमिकेत

13 जानेवारी 2023 ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर मराठी चित्रपट (Marathi movie) ‘वाळवी’ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ऑनलाइन रिलीज केला जात आहे. येत्या 24 फेब्रुवारीला वाळवी ZEE5 वर उपलब्ध होईल. यात स्वप्नील जोशी, अनिता दाते-केळकर, शिवानी सुर्वे आणि सुबोध भावे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Vaalvi On Zee5

वाळवी आयएमडीबीवरील हाय रेटेड मराठी चित्रपटांपैकी एक आहे, ज्यात 8.8 रेटिंग मिळाली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाच्या गोष्टीचं, धक्कातंत्राचं आणि यातील अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. येत्या 24 फेब्रुवारी 2023 ला मराठी चित्रपट वाळवी झी5 रिलीज केला जाईल, जो 190 पेक्षा जास्त देशांमधून पाहता येईल. झी5 वर पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 सारखे मराठी चित्रपट देखील आहेत. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! फोनवर तीन वर्षांची वॉरंटी; Nokia X30 5G च्या भारतीय लाँचची तारीख ठरली

वाळवीची गोष्ट

वाळवी चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अवनी (अनिता दाते-केळकर) आणि अनिकेत (स्वप्नील जोशी) चित्रपटाच्या सुरुवातीलाच एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. कर्जबाजारीपणावर आत्महत्या हा एकमेव पर्याय आहे असे त्यांना वाटत असते. परंतु हा आत्महत्येचा प्रत्यन नसून अनिकेत आणि त्याची गर्लफ्रेंड देविका (शिवानी सुर्वे) यांनी मिळून अवनीच्या हत्येचा रचलेला कट असतो.

घटस्फोट न देणाऱ्या अवनीपासून सुटका करवून घेण्यासाठी दोघांनी हा घाट घातलेला असतो. यात ते यशस्वी देखील होतात परंतु अवनीचा मृतदेह गायब होतो आणि अनिकेतच्या फोनवर तिचा कॉल येतो. तेव्हा चित्रपटातील गमतीदार भागाला सुरुवात होते. सुबोध भावेने यात एका सायकॅट्रिस्टची भूमिका बजावली आहे. हे देखील वाचा: New OTT releases this week: शाहिद करणार ओटीटीवर पदार्पण; या आठवड्यात येत आहेत जबरदस्त चित्रपट आणि सीरिज

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की ते प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून गेले आहेत. लोकांनी एका वेगळ्या प्रयोगाचा आनंद घेतला आणि कौतुकही केलं आहे. वाळवी एक हटके डार्क थ्रिलर कॉमेडी चित्रपट आहे, या पद्धतीचे चित्रपट मराठीत खूप कमी बनतात. झी5 वरील चित्रपटाच्या प्रीमियरमुळे वाळवीच्या डिजिटल प्रवासाची उत्सुकता त्यांनाही आहे. जर अजूनही कोणी हा चित्रपट पहिला नसेल तर नक्कीच हा चित्रपट तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल अशी खात्री त्यांना वाटते.

The post Vaalvi OTT release date: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ‘वाळवी’ येणार ओटीटीवर; तारीख ठरली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vaalvi-ott-release-date-revealed-when-and-where-to-watch-swwapnil-joshi-and-anita-date-kelkars-dark-comedy-thriller-online/feed/ 0
यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/ https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/#respond Mon, 06 Feb 2023 07:43:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17517 ‘Lost’ OTT Release: यामी गौतम पुन्हा एकदा एक जबरदस्त नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज न करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. यामी गौतम स्टारर ‘Lost’ चित्रपट पुढील आठवड्यात Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर समोर आला होता, तर आता आता याचा […]

The post यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 16 फेब्रुवारी 2023 ला ऑनलाइन येईल यामी गौतमचा चित्रपट.
  • या चित्रपटात यामी साकारणार पत्रकाराची भूमिका.
  • यामी गौतमचा ‘Lost’ चित्रपट ZEE5 वर स्ट्रीम केला जाईल

‘Lost’ OTT Release: यामी गौतम पुन्हा एकदा एक जबरदस्त नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज न करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाईल. यामी गौतम स्टारर ‘Lost’ चित्रपट पुढील आठवड्यात Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर समोर आला होता, तर आता आता याचा ट्रेलर व रिलीज डेट देखील समोर आली आहे.

Zee5 ओटीटी प्लॅटफॉर्मनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून ‘Lost’ चित्रपटाचा ट्रेलर शेयर केला आहे. या ट्रेलरसह चित्रपटाची स्ट्रीमिंग डेट देखील सांगण्यात आली आहे. यामी गौतमचा Lost चित्रपट 16 फेब्रुवारी 2023 ला Zee5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल. लॉस्ट हा सिनेमा गोव्यात आयोजित 53 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला होता. या सिनेमाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. हे देखील वाचा: New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट

‘Lost’ ची गोष्ट

2 मिनिटं 19 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात होते ती बेपत्ता लोकांच्या विषयापासून. होय, भारतात दररोज दर 2 मिनिटाला 885 लोक हरवतात, बेपत्ता होतात. यामी गौतम या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘Lost’ या चित्रपटात यामी गौतम एका ईशान नावाच्या मुलाच्या बातमीवर काम करत आहे, जो हरवला आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की ईशानच्या बातमीवर काम करत असताना यामीला अनेक संकटांचा सामाना करावा लागत आहे, ज्यात अनेक प्रसंग जीवावर बेतणारे दाखवले आहेत. यामी राजकीय आणि ऑफिशियल दबावाखाली काम करत आहे.

हा एक सस्पेंस-थ्रिलर चित्रपट आहे, जो अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केला आहे. अनिरुद्ध यांनी पिंक सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. यामी गौतम व्यतिरिक्त या चित्रपटात पंकज कपूर प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तसेच राहुल खन्ना, नील आणि तुषार पांडे यासारखे अनेक स्टार्स चित्रपटात आहेत.

गेल्यावर्षी यामीची दोन चित्रपट आले होते. यातील अ थर्सडे डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम करता येईल. तर अभिषेक बच्चन सोबत असलेला यामीचा ‘दसवी’ चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा: सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

The post यामी गौतमचा जबरदस्त चित्रपट येतोय ऑनलाइन; ZEE5 वर ‘या’ तारखेला स्ट्रीम होणार ‘Lost’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/yami-gautam-movie-lost-to-release-on-zee5-ott-february-16/feed/ 0
फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा https://www.91mobiles.com/marathi/zee5-premium-annual-subscription-50-percent-less-discount/ https://www.91mobiles.com/marathi/zee5-premium-annual-subscription-50-percent-less-discount/#respond Wed, 17 Feb 2021 12:52:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10064 जी5 प्रीमियमच्या वार्षिक सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे तर याची किंमत 999 रुपये आहे. कंपनी वार्षिक प्लान 50 टक्के डिस्कॉउंटसह 499 रुपयांमध्ये देत आहे.

The post फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन ओवर-द-टॉप (OTT) मार्केट मध्ये वेगाने आपले स्थान मजबूत करणाऱ्या देशी OTT कंपनी Zee5 ने एक शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनी अर्ध्या किंमतीत जी5 प्रीमियमचे वार्षिक सब्सक्रिप्शन देत आहे. या ऑफरची घोषणा ओटीटी प्लॅटफॉर्मला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले आहे कि ग्राहक Zee5 प्रीमियमचे वार्षिक सब्सक्रिप्शन फक्त 50 टक्के किंमत देऊन खरेदी करू शकतात.

डिस्काउंट नंतर किंमत

जी5 प्रीमियमच्या वार्षिक सब्सक्रिप्शनबद्दल बोलायचे तर याची किंमत 999 रुपये आहे. कंपनी वार्षिक प्लान 50 टक्के डिस्कॉउंटसह 499 रुपयांमध्ये देत आहे. लक्षात असू दे कि हि ऑफर फक्त 28 फेब्रुवारी पर्यंत वैध आहे.

हे देखील वाचा : Motorola चा मोठा डाव, लॉन्च केले लो बजेट वाले Moto G10 आणि G30 स्मार्टफोन

कंपनी वार्षिक सब्सक्रिप्शन व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लानवर डिस्काउंट देत नाही. याचा अर्थ असा कि हा प्लान्स आधीप्रमाणे असले पण जर तुम्ही वार्षिक प्लान घेतला तर याची किंमत अर्धी झाली आहे.

एकूण तीन प्लान

वार्षिक प्लान व्यतिरिक्त Zee5 Premium कडे अजून दोन प्लान आहेत, ज्यात मासिक प्लानची किंमत 99 रुपये आणि त्रैमासिक प्लानची किंमत 299 रुपये आहे.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लॉन्च केला 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅम असलेला स्वस्त Galaxy A12

परदेशी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना आव्हान

जी5 वर काही दिवसांपासून असा कंटेंट सादर केला जात आहे ज्यामुळे थेट परदेशी ओटीटी ओरीजनल चित्रपटांना टक्कर मिळत आहे. 2020 मध्ये जी5 वर ‘चिंटू का बर्थडे’, ‘चुड़ैल्स’, ‘तैश’, ‘स्टेट ऑफ सीज: 26/11’ सारखा कंटेंट सादर करण्यात आला होता.

नवीन चित्रपटांव्यतिरिक्त जी5 प्रीमियम मेंबर्स ALT Balaji चे सर्व शोज, जिंदगी टीव्ही शो, लाइव टीव्ही, किड्स आणि टीव्ही शो टेलीकास्टच्या आधी ऍक्सेस करू शकतात. Zee5 प्रीमियम मेंबर्स एकावेळी पाच डिवाइसवर कंटेंट बघू शकतात. म्हणजे एक सब्सक्रिप्शन घेतल्यावर 5 लोक हा ऍक्सेस करू शकतात.

The post फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/zee5-premium-annual-subscription-50-percent-less-discount/feed/ 0