New OTT releases this week: या आठवड्यात रिलीज होत आहेत या शानदार सीरीज व चित्रपट

जर तुम्ही त्या प्रेक्षकांपैकी असाल ज्यांना घर बसल्या चित्रपट आणि वेब सीरीज बघायला आवडतात, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातही दर्जेदार चित्रपट आणि वेब सीरिज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून रिलीज (New OTT releases this week) होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घर बसल्या मोबाइल फोन, टीव्ही व लॅपटॉपवर बघता येतील. या आठवड्यात Class पासून Jehanabad of Love & War आणि Black Panther 2 सारखे चित्रपट व सीरीज ऑनलाइन स्ट्रीम होण्यासाठी तयार आहेत. चला जाणून घेऊया आगामी चित्रपट आणि वेब सीरीज कधी आणि कुठे रिलीज होणार.

New OTT releases this week

  • Class
  • Jehanabad – Of Love & War
  • Pamela, a love story
  • Black Panther: Wakanda Forever
  • Viking Wolf

Class

क्लास एक आगामी क्राइम थ्रिलर ड्रामा सीरीज आहे, जी लोकप्रिय स्पॅनिश सीरीज एलीटचं अधिकृत अ‍ॅडाप्टेशन आहे. यात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील धीरज, बल्ली आणि सबा या तीन मुलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्यांना दिल्लीतील एका हाय-प्रोफाईल स्कुलमध्ये स्कॉलरशिप मिळते. ही सीरीज 3 फेब्रुवारीपासून Netflix वर पाहता येईल. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

Jehanabad – Of Love & War

सुधीर मिश्रा दिग्दर्शित जहानाबाद – ऑफ लव अँड वॉर एक जबरदस्त क्राइम ड्रामा सीरीज आहे. ही सीरीज वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. ही क्राइम ड्रामा थ्रिलर सीरीज निरागस प्रेम आणि वास्तवातील गोंधळ यांच्यातील संघर्षाची गोष्ट दाखवते. सीरीज को 3 फेब्रुवारीला Sony LIV वर रिलीज केली जात आहे.

Pamela, a love story

पामेला, अ लव्ह स्टोरी ही सीरीज पॉप कल्चर आयकॉन पामेला अँडरसनच्या आयुष्यवर आधारित आहे. पामेला या सीरीजच्या माध्यमातून आपल्या खऱ्या भावना आणि आपलं सत्य सांगत आहे. हा शो 31 जानेवारीला Netflix वर रिलीज केला गेला आहे.

Black Panther: Wakanda Forever

1 फेब्रुवारीपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर Black Panther: Wakanda Forever स्ट्रीम करता येईल. चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की कशाप्रकारे वकंडाचा राजा टी’छल्लाच्या मृत्युनंतर राज्याचा कारभार चालतो. हा चित्रपट 2018 च्या ब्लॅक पँथर चित्रपटाचा पुढील भाग आहे. हे देखील वाचा: रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह येतील Vivo V27 आणि Vivo V27 Pro; लाँच पूर्वीच मोठा खुलासा

Viking Wolf

वायकिंग वुल्फ नॉर्वेची पहिला वेयरवोल्फ चित्रपट (वायकिंगुलवेन) आहे, ज्यात एक खतरनाक थ्रिलर गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 3 फेब्रुवारीपासून Netflix वर स्ट्रीम करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here