Home बातम्या 15 सप्टेंबरला लाँच होईल Tecno Camon 19 Pro Mondrian Edition; अ‍ॅमेझॉनवरून होणार विक्री

15 सप्टेंबरला लाँच होईल Tecno Camon 19 Pro Mondrian Edition; अ‍ॅमेझॉनवरून होणार विक्री

टेक्नो (Tecno) भारतात आपला नवीन स्मार्टफोन 15 सप्टेंबरला लाँच करणार आहे. कंपनीनं याचा खुलासा आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून केला आहे. कंपनीद्वारे लाँच होणाऱ्या नवीन फोनचं नाव Tecno Camon 19 Pro Mondrian Edition आहे, ज्याबाबत कंपनीनं दावा केला आहे की हा भारतातील मल्टी कलर बदलणारा Smartphone असेल. तर दुसरीकडे लाँचच्या आधी ई-कॉमर्स साइट Amazon India वर या आगामी फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे. या साइटमध्ये फोनच्या काही खास फीचर्सची माहिती देखील देण्यात आली आहे.

15 सप्टेंबरला होईल लाँच

भारतात 15 सप्टेंबरला लाँच झाल्यानंतर हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. किंमत आणि सर्व फीचर्ससाठी आपल्याला लाँचची वाट पाहावी लागेल. पुढे आम्ही तुम्हाला Tecno Camon 19 Pro Mondrian Edition च्या फीचर्सची माहिती दिली आहे. हे देखील वाचा: 6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये

रंग बदलणारा बॅक पॅनल

फोनची सर्वात मोठी खासियत याचा बॅक पॅनल आहे. याच्या शानदार डिजाइनिंग मध्ये कंपनीनं polychromatic photoisomer technology चा वापर केला आहे. ही टेक्नॉलॉजी फोनच्या बॅक पॅनलवरील प्रत्येक ब्लॉकचा रंग अनेक वेगवेगळ्या रंगात बदलत राहते. कंपनीनं या टेक्नॉलॉजीला सनलाइट ड्रॉइंग असं नाव दिलं आहे. अशीच काहीशी टेक्नॉलॉजी विवोच्या स्मार्टफोन्समध्ये देखील पाहायला मिळाली आहे, परंतु ते स्मार्टफोन्स महागड्या किंमतीत आले आहेत.

Tecno Camon 19 Pro Mondrian Edition चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये कंपनीनं 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.8 इंचाचा फुल एचडी+ IPS डिस्प्ले दिला जाईल. तसेच, स्मार्टफोनचा डिस्प्ले 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. इतकेच नव्हे तर फोनमध्ये 8जीबी रॅम आणि 128जीबी इनबिल्ट स्टोरेज दिली जाऊ शकते. कंपनी या फोनमध्ये 5जीबी व्हर्च्युअल रॅम फिचर देखील देऊ शकते, त्यामुळे फोनमध्ये 13GB RAM मिळेल. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो G96 चिपसेट मिळू शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित HiOS वर चालेल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री

अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे आहे की फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागे क्वॉड एलईडी फ्लॅशसह एक 64 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल जो ओआयएसला सपोर्ट करेल आणि एक 50 मेगापिक्सलचाची टेलिफोटो लेन्स आली जाऊ शकते. तसेच फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा एक डेप्थ लेन्स आणि एक लेजर ऑटोफोकस यूनिट असेल. सेल्फीसाठी यात कंपनी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देईल. सिक्योरिटीसाठी या टेक्नो फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळेल.