सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री

iqoo z6 lite 5g specs

iQOO Z6 Lite 5G India Launched: मोबाइल निर्माता iQOO नं भारतात एक नवीन 5G डिवाइस सादर केला आहे. कंपनीनं हा डिवाइस iQOO Z6 Lite 5G नावानं बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. म्हणजे की कमी किंमतीत 5G डिवाइस घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑप्शन ठरू शकतो. विशेष म्हणजे हा जगातील पहिला असा फोन बनला आहे ज्यात Qualcomm Snapdragon 4 Gen 1 Processor चा वापर करण्यात आला आहे. या दमदार प्रोसेसरसह फोनमध्ये अनेक आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये मोठा डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा सेटअपसह अनेक शानदार वैशिष्ट्ये आहेत. पुढे आम्ही तुम्हाला iQOO Z6 Lite 5G ची किंमत, फीचर्स आणि सेल संबंधित माहिती दिली आहे.

iQOO Z6 Lite 5G Price

कंपनीनं हा फोन आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात ठेवून बाजारात आणला आहे. जो 14 सप्टेंबरपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि iQOO ई-स्टोरच्या माध्यमातून विकला जाईल. स्टोरेज ऑप्शन पाहता कंपनीनं iQOO Z6 लाइट 5G 4GB रॅम +64GB इंटरनल स्टोरेज आणि 6GB रॅम +128GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला आहे. ज्यात बेस व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे, परंतु ऑफर्सनंतर हा 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 15,499 रुपयांचा टॉप व्हेरिएंट देखील 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ग्राहकांना फोनसाठी स्टेलर ग्रीन आणि मिस्टिक नाइट कलर ऑप्शन मिळतील. तसेच कंपनीनं फोनला दोन वर्ष Android अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. हे देखील वाचा: पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू

iQOO Z6 Lite Price and Offers

iQOO Z6 Lite 5G specification

iQOO Z6 Lite मध्ये 6.58-Fv FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात वॉटरड्रॉप नॉच डिजाइन दिसते. हा 2408×1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसर पाहता फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. जो 6nm प्रोसेसवर बनवण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. तसेच हा फोन एक्सटेंडेड रॅम 2.0 टेक्नॉलॉजीसह येतो.

हा फोन दमदार गेमिंग परफॉर्मन्स देईल असा दावा कंपनीनं केला आहे. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. फोन रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये बेहतर परफॉरमेंस आणि हीटिंगपासून वाचण्यासाठी 4-कंपोनेंट असलेली कूलिंग टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.

कसा आहे कॅमेरा

iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीला मोटोरोलाचा दणका! स्वस्त आणि मस्त Moto E22 ची माहिती लीक; असा दिसेल हँडसेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here