13-एमपी कॅमेरा, 3,050एमएएच बॅटरी आणि फेस अनलॉक फीचर सह टेक्नो ने लॉन्च केले दोन स्वस्त बेजल लेस फोन

टेक्नो ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपली कॅमोन स्मार्टफोन सीरीज पुढे नेत कॅमोन आई ट्विन लॉन्च केला होता. कंपनी देशात एका पाठोपाठ एक स्मार्टफोन लॉन्च करत आहे आणि पुन्हा एकदा टेक्नो ने एक साथ दोन नवीन स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणले आहेत. टेक्नो ने कॅमोन आई सीरीज मध्ये कॅमोन आई एस आणि कैमोन आई स्काई2 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. टेक्नो कॅमोन आई एस 6,799 रुपयांमध्ये आजपासून विकत घेता येईल तर कॅमोन आई स्काई2 7,499 रुपयांमध्ये 20 ऑगस्ट पासून सेल साठी उपलब्ध होईल.

टेक्नो कॅमोन आई एस
हा फोन टेक्नो ने 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.5-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे सोबतच हा 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि एमटी6739डब्ल्यूडब्ल्यू चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 2जीबी रॅम तसेच 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कॅमोन आई एस च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सपोर्ट सोबत 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक टेक्नो डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी कॅमोन आई एस फेस अनलॉक फीचर ला सपोर्ट करतो तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

टेक्नो कॅमोन आई स्काई2
हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्यात 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.5-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे सोबतच 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर आणि एमटी6739डब्ल्यूडब्ल्यू चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये 2जीबी रॅम तसेच 16जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कॅमोन आई एस च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि सेकेंडरी वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सपोर्ट सोबत 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक टेक्नो डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी कॅमोन आई एस फेस अनलॉक फीचर सोबत रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,050एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here