आता खेळता येणार नाही PUBG, पण हे 5 दमदार मोबाईल गेम्स देतील तीच मजा

लोकप्रिय मोबाईल गेम बुधवारी भारतात आईटी मंत्रालयाने प्रतिबंधित केलेल्या 118 चीनी ऍप्स पैकी एक होता. देशातील मोबाईल गेमर्स लोकप्रिय रॉयल बॅटल गेम वर बंदी घातल्यामुळे सरकारच्या निर्णयावर निराश आहेत. जर तुम्हाला पण PUBG खेळणे आवडत असेल तर जास्त निराश होण्याची गरज नाही कारण प्ले स्टोर वर अनेक असे बॅटल रॉयल गेम्स उपलब्ध आहेत जे पबजी सारखी मजा देतात. यात अगदी पबजीची मजा मिळेल कि नाही हे तुम्हाला स्वतःला खेळून ठरवावे लागेल. पण आम्ही अनेक बॅटल गेम्स पैकी टॉप 5 अश्या गेम्सची लिस्ट घेऊन आलो आहोत जे तुम्ही खेळू शकता.

1. Call of Duty Mobile

जर पबजीची जागा कोणी घेऊ शकत असेल तर तो आहे प्रसिद्ध PC गेम कॉल ऑफ ड्यूटी. हा गेम काही दिवसांपूर्वी मोबाईल यूजर्ससाठी लाइव झाला आहे. Call Of Duty चा 5 VS 5 डेथ मोड खूप शानदार आहे. PUBG मध्ये हा फीचर नव्हता आणि या मोडमुळे अनेकांना Call Of Duty आवडतो. याव्यतिरिक्त अडवांस मोड पण Call Of Duty ला पबजी पेक्षा पुढे नेतो. यात पबजी प्रमाणेच कंट्रोल आहेत आणि तुम्ही ऑनलाइन खेळू शकता.

2. Fortnite

Fortnite गेम पण कोणत्याही बाबतीत कमी नाही. यात पण 100 प्लेयर्स एक साथ एका बेटावर उतरतात जिथे तुम्हाला युद्धासाठी आवश्यक समान तयार करावे लागते आणि त्यानंतर हत्यार घेऊन लढावे लागते. गेम आता अँड्रॉइड वर एपिके स्वरूपात डाउनलोड करता येईल पण आयओएस वर हा गेम उपलब्ध नाही.

3. Garena Free Fire

टॉप 5 रॉयल बॅटल गेम मध्ये तिसऱ्या स्थानावर वर आहे गरेना फ्री फायर गेम. हा गेम आधीपासून लोकप्रिय आहे आणि या यादीतील आधीच्या दोन गेम प्रमाणेच याची पण एक ओळख करून देण्याची गरज नाही. 2019 मध्ये गरेना फ्री फायर सर्वात जास्त डाउनलोड केल्या जाणाऱ्या मोबाईल गेम मध्ये होता आणि PUBG प्रमाणेच खेळाला जातो. तुम्ही या गेम मध्ये वाहने चालवता येतील नवनवीन कपडे घालता येतील. यात तुम्ही 49 इतर खेळाडूंसह लढाई लढता.

4. Battlelands Royale

बॅटललँड्स रॉयल, नावावरून समजले असेल कि हा एक बॅटल रॉयल गेम आहे जो आर्केड सारख्या ग्राफिक्स सह येतो. इतर गेम्स पेक्षा हा किती चांगला आहे हे तुम्हाला खेळून बघावे लागेल. पण पबजीला पर्याय म्हणून हा गेम खेळता येईल.

5. Hopeless Land: Fight for survival

या गेम मध्ये 121 प्लेयर्स एकत्र खेळू शकतात. तसेच कार सह हेलिकॉप्टर चालवण्याचा पर्याय पण मिळतो. हा सर्वात सोप्पा बॅटल रॉयल गेम आहे आणि हा खेळण्यासाठी कोणत्याही हाई-एन्ड गेमिंग फोनची पण गरज नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here