जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा डॉक्टर कडे जातो आपण. अशाप्रसंगी डॉक्टर असा माणूस असतो ज्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. आता जरा टेक व गॅजेट्स बद्दल बोलायचे झाले तर जेव्हा तुमचा मोबाईल व स्मार्टफोन बिघडतो तेव्हा ब्रँडच्या सर्विस सेंटर मध्ये नेला जातो. डॉक्टर प्रमाणे आपण सर्विस सेंटर मधील कारागिरांवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या स्मार्टफोनला सर्विस सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर सोडून येतो. ते जरी स्मार्टफोन पूर्णपणे दुरुस्त करत असले तरी आपला सर्वात मोठा ‘राजदार’ म्हणजे आपला फोन असा सर्विस सेंटर वरघेऊन जाण्याआधी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते.
सर्वात आधी तुम्हाला एक ताजे उदाहरण देतो जे गेल्या 4 नोव्हेंबरचे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील एका तरुणीला अशीच एक चूक महागात पडली, जेव्हा फोन सर्विस सेंटर वर दिल्यामुळे तिचे ‘खासगी फोटो’ शेयर झाले. हे सर्विस सेंटर सर्वात प्रतिष्ठित मोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple चे होते. ग्लोरिया नावाच्या एका मुलीच्या iPhone मध्ये काही बिघाड होता, म्हणून ती तो Apple च्या सर्विस सेंटर वर घेऊन गेली होती. तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आहे कि त्याने ग्लोरियाचा फोन ठीक करताना त्यातील ग्लोरियाचा एक ‘अत्यंत खासगी’ फोटो आपल्या नंबर वर फॉरवर्ड केला. अमेरिकेत हे प्रकरण खूप चर्चेत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून त्यांना अश्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ लागू नये.
या गोष्टींची काळजी घ्या :
1. बँकिंग डिटेल्स करा डिलीट
जेव्हा पासून स्मार्टफोन लोकांच्या आयुष्यात आला आहे, प्रत्येकजण डिजीटल बँकिंगचा वापर करत आहे. बँकेचे ऍप असो वा ऑनलाईन बँकिंग, फोन वरूनच पैशांची देवाणघेवाण केली जाते. बँकेचे खाजगी दस्तावेज जसे कि डेबिट व क्रेडिट कार्ड डिटेल, ई-बँकिंग आईडी तसेच एटीएम व इंटरनेट ट्रांजेक्शनचे पासवर्ड इत्यादि लोक आपल्या फोन मधेच सेवा करतात. त्यामुळे जमल्यास सर्विस सेंटर वर फोन देण्याआधी आपल्या फोन मधून सर्व बँकिंग डिटेल डिलीट केलेलं बरे.
2. वॉलेट ऍप करा अनलोड
बँकिंग सोबतच पेटीएम, गूगल पे, फोन पे व भीम ऍप सारखे डिजीटल वॉलेटचा पण वापर प्रत्येकजण करतो. छोट्या छोट्या गोष्टी विकत घेण्यासाठी तसेच मोबाईल रिचार्ज इत्यादीसाठी लोक हे ऍप्स वापरतात. जर सर्विस सेंसर वर फोन देणार असाल तर हे ऍप्स आपल्या फोन मधून डिलीट करा. फोन चांगला झाल्यावर हे ऍप्स पुन्हा डाउनलोड करता येतात.
3. कॉन्टेक्ट व मेसेज लपवणे पण आवश्यक
एकेकाळी आपण डायरी मध्ये आपल्या नातेवाईकांचे फोन नंबर लिहिती होतो. अनेकांना आपल्या जिवलगांचे नंबर तोंडपाठ होते. पण जेव्हा पासून स्मार्टफोन आला आहे तेव्हापासून लोक नंबर लक्षात ठेवणे व डायरी मध्ये लिहिण्याऐवजी फोनच्या कॉन्टेक्ट लिस्ट मधेच सेव करतात. सर्विस सेंटर वर फोन देण्याआधी आपली कॉन्टेक्ट लिस्ट लपवणे आवश्यक आहे. कारण कॉन्टेक्ट लिस्ट कोणाच्या हाती लागल्यास फोन बुक मध्ये सेव असलेल्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात, त्यांना त्रास दिला जाऊ शकतो.
4. फोटो गॅलरी
असे म्हटले जाते कि फोनची फोटो गॅलरी त्या यूजरच्या स्वभावाचा आणि व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. आपल्या फोन गॅलरी मध्ये आपण आपल्या आयुष्यातील प्रसंग जपून ठेवतो, ज्यात स्वतःपेक्षा जास्त फोटो आपल्या मित्रांचे, नातेवाईकांचे आणि जिवलगांचे असतात. सर्विस सेंटर वर फोन देण्याआधी फोनची गॅलरी लॅपटॉप किंवा दुसऱ्या डिवाईस मध्ये कॉपी करा आणि मग फोन मधून डिलीट करा. फोन ठीक झाल्यावर संपूर्ण गॅलरी पुन्हा फोन मध्ये टाकता येईल.
5. ईमेल व पासवर्ड
जास्तीत जास्त महत्वाचे डाक्यूमेंट्स तसेच मेल ईमेल आईडी वर सेव असतात. तसेच अनेक यूजर आपले वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे यूजर नेम आणि पासवर्ड पण गूगल अकाउंट किंवा ऍप्पल आईडी वर सेव करतात. त्यामुळे सर्विस सेंटर वर फोन देण्याआधी हे सर्व डिटेल फोन मधून डिलीट करणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे सर्विस सेंटर वर फोन देण्याआधी संपूर्ण फोनचा बॅकअप घेतला तर चांगलेच. जमल्यास आपला फोन फॉर्मेट करा. असे केल्यास फक्त फोनचा डेटा सुरक्षित राहील असे नाही तर फोन रिपेयर झाल्यानंतर अगदी नवीन डिवाईस प्रमाणे चालेल. जर फोनचा डिस्प्ले ऑन नसेल होत तर कम्यूटर किंवा लॅपटॉपची फोन कनेक्ट करून तो रिसेट करता येतो.
