Twitter ला टक्कर देण्यासाठी आलं मेटाचं Threads, जाणून घ्या कसं करायचं डाउनलोड

Highlights

  • मेटा थ्रेड्स Google Play आणि Apple App Store वर उपलब्ध.
  • लॉगइन करण्यासाठी इन्स्टाग्राम आयडीचा वापर करता येईल.
  • थ्रेड्स टेक्स्ट-आधारित कंवर्सेशन अ‍ॅप आहे.

मेटा (Meta) नं अधिकृतपणे थ्रेड्स (Threads) लाँच केलं आहे, जो थेट ट्विटर (Twitter) ला टक्कर देईल. हे अ‍ॅप भारतासह 100 देशांमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. हे मोफत अँड्रॉइडसाठी Google Play आणि iPhones साठी Apple स्टोरवरून डाउनलोड करता येईल. मेटा Threads App इन्स्टाग्राम एक्सटेंशन म्हणून सादर करण्यात आलं आहे. परंतु हा देखील स्टॅन्डअलोन प्लॅटफॉर्म आहे, ज्यात थेट ट्विटरवरून कॉपी करण्यात आलेले फीचर्स आहेत. कंपनी इन्स्टाग्राम युजर्सना आकर्षित करण्यासाठी इन्स्टाग्रामवर वेरिफाइड युजर्सना साइन-अप केल्यावर ऑटोमॅटिक थ्रेड्सवर ब्लू टिकची सुविधा देत आहे. हे अ‍ॅप लाँच होताच 2 तासांत 20 लाखांपेक्षा जास्त लोकांनी वापरलं आहे.

Threads अ‍ॅप कसं डाउनलोड करायचं

मेटा थ्रेड्स डाउनलोड आणि साइन-अप करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. युजर्स Google Play किंवा Apple App Store वरून हे अ‍ॅप डाउनलोड करता येईल आणि पुन्हा लॉगइन करण्यासाठी इन्स्टाग्राम आयडीचा का वापर करता येईल. जर तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट असेल तर थ्रेड्स फक्त परवानगी मागेल. ज्याचा अर्थ असा की तुम्हाला नवीन लॉगइन डिटेलची गरज नाही.

थ्रेड्सचे फीचर्स?

  • इंस्टग्राम मेटाचा फोटो शेयरिंग किंवा मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म आहे, तर थ्रेड्स टेक्स्ट-आधारित कंवर्सेशन अ‍ॅप आहे. थ्रेड्स ट्विटर सारखं आहे असं म्हणता येईल.
  • Threads मध्ये प्रत्येक पोस्ट 500 कॅरेक्टर पर्यंत मोठी असू शकते, ज्यात लिंक, फोटो (प्रति पोस्ट दहा) आणि 5 मिनिटांच्या व्हिडीओचा समावेश आहे.
  • थ्रेड्समध्ये युजर्सना थ्रेड्स पोस्टला उत्तर देणारे लोक नियंत्रित करता येतात.
  • युजर थ्री-डॉट मेनूवर टॅप करून कोणत्याही थ्रेड्सवर प्रोफाईल अनफॉलो, ब्लॉक, रिस्ट्रिक्ट किंवा रिपोर्ट करू शकतात. इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलेलं कोणतंही अकाऊंट ओपाप थ्रेड्सवर ब्लॉक होतील.
  • ह्यात युजर्सना काही फीचर्स अजूनही नाहीत म्हणजे युजर्स GIFS टाकू शकत नाहीत आणि close friend ची सुविधा देखील नाही.
  • थ्रेड्स मध्ये सध्या डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेजची सुविधा नाही. युजर्स स्टोरी देखील पोस्ट करू शकत नाहीत.
  • थ्रेड्सची एक डेडिकेटेड वेबसाइट आहे, जी लाइव्ह झाली नाही.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here