पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे Electric Scooters ची मागणी वाढत आहे. वाढती मागणी पाहून नवीन व जुन्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी तयारी सुरु केली आहे. बजाज ऑटोपासून ओलापर्यंत अनेक टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आल्या आहेत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये अनेक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होण्यासाठी तयार आहेत. जर तुम्ही देखील एक नवीन बॅटरी असेलेली स्कूटर विकत घेण्याची योजना बनवत असाल तर पुढे आम्ही लवकरच लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची एक लिस्ट तयार केली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर येत आहेत भारतीयांच्या भेटीला.
Upcoming Electric Scooters in india
- HERO Vida Electric Scooter
- Honda Benly-e
- Activa Electric Scooter
- Yamaha Neo Electric Scooter
- Vespa e-scooter
- LML e-scooter
- Dispatch Electric Scooter
- Bajaj Blade
- Hindustan Motors Electric Scooter
- Suzuki Burgman Electric
- TVS Creon
1. HERO Vida Electric Scooter
Hero मोटरकॉर्प लवकरच अपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यासाठी तयार आहे, कंपनीनं मात्र या इलेक्ट्रिक स्कूटरची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु कंपनीनं अलीकडेच नवीन आणि आगामी इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड Vida (विडा) चा लोगो जगासमोर ठेवला आहे. Vida या महिन्यात किंवा पुढील महिन्याच्या अखेरीस आपली पहिली इलेक्ट्रिक टू-व्हीलर भारतात सादर करेल. तुम्हाला माहित असेल की काही महिन्यांपूर्वीच हीरो मोटोकॉर्पचे चेयरमन आणि सीईओ डॉ. पवन मुंजाल कंपनीच्या पहिल्या प्री-प्रोडक्शन इलेक्ट्रिक स्कूटर प्रोटोटाइपसह दिसले होते. सध्यातरी हीरो मोटोकॉर्पच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमत, लुक आणि फीचर्ससाठी थोडी वाट बघावी लागेल.
2. Honda Benly-e
Honda BENLY e electric scooter (बॅटरी असलेली स्कूटी) च्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे. कंपनीनं याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. परंतु, लीक्सनुसार लवकरच ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच होऊ शकतो. तसेच, आता Honda BENLY e बेंगळुरूमध्ये टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. आहे. BENLY e स्कूटर ट्विन बॅटरी पॅकसह येईल, प्रत्येक बॅटरी 0.99kWh क्षमतेसह सादर करण्यात येईल. या दोन्ही बॅटरी स्विच करता येतील त्यामुळे रायडर एका मिनिटात पूर्णपणे चार्ज झालेली स्कूटर वापरू शकेल.
3. Activa Electric Scooter
Honda आपली सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर अॅक्टिव्हा (Activa Electric Scooter) इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्याची तयारी करत आहे. काही ऑटो न्यूज साईट्सनुसार होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, अत्सुशी ओगाटा यांनी देशात एचएमएसआय ईव्हीची निर्मिती सुरु झाल्याची माहिती दिली आहे. काही रिपोर्ट्सच्या मते Honda Activa इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतात लाँच होऊ शकते.
4. Yamaha Neo Electric Scooter
यामाहानं युरोपीय बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर निओ (Neo) काही महिन्यांपूर्वी लाँच केली होती. आता Yamaha Motor India लवकरच ही Neo Electric Scooter भारतात सादर करणार आहे, जी भारतीय डीलर्स समोर अलीकडेच शोकेस करण्यात आली आहे. या बॅटरी असलेल्या स्कूटीमध्ये हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात येईल. यात शहरातील कामांसाठी टॉप स्पीड मिळेल तसेच स्वॅपेबल लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील मिळतो.
5. Vespa e-scooter
काही दिवसांपूर्वी Piaggio नं अधिकृतपणे सांगितलं आहे की कंपनी ईव्ही स्पेसमध्ये काम करत आहे. सध्या Piaggio भारतात तीन चाकी वाहने बनवते. तसेच Vespa आणि Aprilia ब्रँड देशात टू-व्हीलर व्हेइकल्स देखील बनवते. कंपनीनं एका मीडिया वेबसाईटला सांगितलं होतं की Vespa ब्रँड अंतगर्त भारतात एक इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याची इच्छा आहे. सध्या Vespa युरोपियन मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. लीक रिपोर्ट्सनुसार कंपनी 2023 संपण्याआधी Vespa ब्रँडची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात सादर करेल.
6. LML e-scooter

एलएमएल कंपनीनं आपल्या नवीन युनिट LML Electric ची सुरुवात केली आहे आणि आता इंडियन EV Market मध्ये जोरदार एंट्री घेणार आहे. आपल्या ईव्ही बिजनेससाठी कंपनीनं दुचाकी वाहन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Saera Electric Auto सह भागेदारी केली आहे. या भागेदारी अंतगर्त हरियाणामधील प्लांटमध्ये एलएमएलच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती केली जाईल. तसेच आगामी काळात पूर्णपणे मेड इन इंडिया LML Electric Scooter देखील बाजारात येऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे सिएरा इलेक्ट्रिक ऑटोनं जगप्रसिद्ध Harley Davidson साठी देखील बाईक्स बनवल्या आहेत. एलएमएल कंपनी आपल्या नवीन प्रोडक्ट लाँचची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी बनवत आहे.
7. Dispatch Electric Scooter
EV स्टार्टअप कंपनी डिस्पॅच व्हेईकल्स (Dispatch Vehicles) नं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते भारतात आपली पहिली मॉड्यूलर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर पुढील आर्थिकर वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत लाँच करेल. डिस्पॅच इलेक्ट्रिक स्कूटर भारतात मॉड्युलर, टफ आणि एर्गोनोमिक बॉडी फ्रेमसह येण्याची शक्यता आहे.
8. Bajaj Blade
बजाज अपने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरनंतर लवकरच एक नवीन बॅटरी असेलली स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, बजाज ऑटो भारतात ऐथर 450 एक्सला टक्कर देण्यासाठी आगामी काळात बजाज ब्लेड (Bajaj Blade) नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करू शकते. काही दिवसांपूर्वीच बजाज ऑटोनं अनेक नावे ट्रेडमार्क केली आहेत, जी आयसीई आणि ईव्ही सेगमेंटमध्ये आहेत. त्यामुळे असे वाटत आहे की स्वदेशी कंपनी यावर्षी बजाज ब्लेड नावाने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करू शकते. बोलले जात आहे की आगामी बजाज ब्लेड ईव्हीमध्ये अनेक फीचर्स मिळू शकतात.
9. Hindustan Motors Electric Scooter
हिंदुस्थान मोटर्स (HM) ची प्रसिद्ध कार अँबॅसडर (Ambassador) आता बंद झाली आहे. परंतु आता पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली आहे. रिपोर्ट्सनुसार HM अँबॅसेडर इलेक्ट्रिक बनवण्यावर काम करत आहे. विशेष म्हणजे कंपनी फक्त इलेक्ट्रिक कार नव्हे तर इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सवर देखील काम करत आहे. त्यामुळे लवकरच हिंदुस्थान मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर दिसू शकते.
10. Suzuki Burgman Electric
सुजुकी इंडियानं काही वर्षांपूर्वी बर्गमॅन स्कूटर लाँच केली होती आणि आता तोच मॉडेल देशात इलेक्ट्रिक अवतारात उपलब्ध होण्यासाठी तयार आहे. बर्गमॅन इलेक्ट्रिक बद्दल बोलले जात आहे की कंपनीनं या ईव्हीसाठी रोड टेस्ट सुरु केली आहे ज्यात 5kW मोटरसह 3 किंवा 4kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. बर्गमॅन इलेक्ट्रिक बजाज चेतक आणि एथर 450X ला टक्कर देईल, जिची किंमत जवळपास 1.2 लाख रुपये आहे.
11. TVS Creon
टीव्हीएसकडे आधीपासून देशातील निवडक भागांमध्ये आय-क्यूब इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनी TVS Creon लाँच करण्याची तयारी करत असल्याची बातमी आली आहे. क्रेओन ऑटो एक्सपो 2018 मध्ये टीव्हीएस स्टॉलवर दिसली होती. तसेच क्रेओन लाँच बाबतच्या बातमीचा खुलासा कंपनीच्या प्रमुखांनी केली होती.
Note: वरील कोणत्याही इलेक्ट्रिक स्कूटरच्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 91मोबाईल्सच्या टीमनं ही यादी लीक रिपोर्ट्सच्या आधारावर बनवली आहे.
























