Vivo Ganesh Chaturthi Offer: गणरायचं आगमन महाराष्ट्रातील घराघरात झालं आहे. त्याचबरोबर टेक प्रेमींसाठी एक खुशखबर देखील आली आहे. नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत आलेल्या ग्राहकांसाठी Vivo नं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शानदार ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत विवोच्या लेटेस्ट V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर धमाकेदार डिस्काउंट दिला जाणार आहे. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या गणेश चतुर्थी ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.
Vivo Ganesh Chaturthi Offer
विवोच्या स्पेशल गणेश चतुर्थी ऑफर अंतगर्त V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर बँक डिस्काउंटची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं ICICI बँक, Kotak Mahindra बँक आणि SBI शी भागेदारी केली आहे, या बँकांच्या क्रेडिट कार्डवर ही ऑफर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे विवोच्या या ऑफरचा फायदा कंपनीच्या सर्व पार्टनर रिटेल स्टोर्सवरून देखील घेता येईल. Vivo Ganesh Chaturthi ऑफर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत वैध असेल.
Vivo Ganesh Chaturthi Offer अंतर्गत कंपनीच्या फ्लॅगशिप Vivo X80 सीरीजच्या स्मार्टफोनवर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तर मिडरेंजमधील Vivo V25 Pro स्मार्टफोनवर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 3,500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. तर 1500 रुपयांची सूट कंपनीच्या लेटेस्ट स्मार्टफोन Vivo Y75 वर दिली जात आहे. हे देखील वाचा: 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री
Vivo V25 Pro
Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (OIS)ला सपोर्ट करतो. विवोचा हा फोन कलर चेंजिंग फ्लोराइट AG ग्लास, 120Hz 3D कर्व डिस्प्लेसह बाजारात आला आहे. तसेच फोनमध्ये 32MP ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा मिळतो. यात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरची ताकद आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, आणि USB Type-C पोर्टचे ऑप्शन देण्यात आले आहेत. Vivo V25 Pro मधील 4,830mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo Y75
Vivo Y75 4G स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो आणि Android 11 वर आधारित Funtouch OS 12 वर चालतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, ड्युअल सिम आणि Type-C पोर्टचा ऑप्शन आहे. यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 44MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग
Vivo X80 सीरीज
Vivo X80 सीरीजच्या प्रीमियम स्मार्टफोन देखील गणेश चतुर्थी ऑफरमुळे स्वस्तात विकत घेता येतील. विवो X80 सीरीजचे स्मार्टफोन फ्लॅगशिप आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात आले आहेत. तसेच या फोनमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला ZEISS गिंबल सपोर्ट असलेला पोर्टेट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर आहे. यातील प्रायमरी कॅमेरा सेन्सर 50 MP अल्ट्रा सेंसिंग IMX866 सेन्सर आहे. फोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी वेगळी प्रो-इमेजिंग V1+ चिप देण्यात आली आहे.
