8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री

आपल्या सेल्फी कॅमेऱ्यांसाठी लोकप्रिय असलेल्या चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका शानदार स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन Vivo Y35 लाँच केला आहे. विवो वाय35 भारतात 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे आणि यात 8GB RAM मिळतो, इतका रॅम असलेल्या स्मार्टफोन्स पैकी हा कंपनीचा स्वस्त फोन आहे. या नव्या विवो फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camara, 44W flash charging आणि 5,000mAh Battery मिळते.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y35 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 2408 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन फ्लॅट फ्रेम तसेच 2.5डी कर्व्ड ग्लासला सपोर्ट करते तसेच फोन वापरताना बोटांचे डाग पडू नये म्हणून कंपनीनं anti-glare (AG) सर्फेसचा वापर केला आहे.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. Vivo Y35 मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो वाय35 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 सह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. विवो मोबाइलमध्ये 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज देण्यात मिळते तसेच हा फोन Extended RAM 3.0 फीचरला सपोर्ट करतो, त्यामुळे गरज पडल्यास अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येते.

Vivo Y35 ड्युअल सिम व 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo Y35 प्राइस व सेल

विवो वाय35 स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या हँडसेटची किंमत 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Agate Black आणि Dawn Gold कलरमध्ये विकत घेता येईल. ICICI, SBI, Kotak आणि OneCard युजर्सना या फोनची खरेदीवर थेट 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल तसेच विवो मोबाइलवरील ही ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत वैध असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here