ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म

91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिवली भारतात Vivo S1 च्या लॉन्चिंगची माहिती दिली होती. तसेच फोनच्या लॉन्च डेट आणि किंमतीबद्दल पण आम्ही आमच्या वाचकांना एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आता कंपनीने ऑफिशियली Vivo S सीरीजची लॉन्च डेट सांगितली आहे.

कंपनीने मीडिया इनवाइट पाठवून याची घोषणा केली आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात 7 ऑगस्टला आपली S सीरीज सादर करेल. या मीडिया इनवाइट मध्ये असलेल्या पोस्टर मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

पण, एस सीरीज लिहिलेले असल्यामुळे आशा केली जात आहे कि कंपनी S सीरीज मध्ये S1 आणि S1 Pro सादर करू शकते. विशेष म्हणजे कंपनीने इंडोनेशिया मध्ये Vivo S1 लॉन्च केला आहे जो चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo S1 पेक्षा खूप वेगळा आहे. हा डिवाइस मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर वर आधारित पहिला फोन आहे. तसेच डिवाइस अफोर्डेबल कॅटगरी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले सेंसर सह येतो.

या ऑफिशियल लॉन्च डेटच्या आधी कंपनीने आपल्या वीवो इंडिया ट्विटर हँडल वर एक वीडियो टीजर जारी केला होता, ज्यात एस सीरीजच्या येण्याची पक्की माहिती समोर आली होती. आम्हाला अजूनतरी S1 बद्दलच माहिती मिळाली आहे. पण कदाचित कंपनी S1 सोबत S1 Pro पण सादर करेल.

Vivo S1 ची भारतीय किंमत

आमच्या सोर्सनुसार Vivo S1 भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. यात कंपनी 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी+ 128जीबी स्टोरेज वेरिएंट लॉन्च करेल. याच्या बेस मॉडेलची किंमत 17,990 रुपये असेल. तर दुसऱ्या मॉडेलच्या किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही. पण आशा आहे कि फोनचा दुसरा वेरिएंट 20,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. त्याचबरोबर आम्हाला माहिती मिळाली आहे कि फोन ऑगस्टच्या सुरवातीला प्री-ऑर्डर साठी येईल आणि 15 ऑगस्टला सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here