विवोने गेल्यावर्षी सादर केलेल्या एस 18 सीरिजचे अपग्रेड एस 19 वर काम केले जात आहे. यानुसार Vivo S19 आणि Vivo S19 Pro स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये लाँच होऊ शकतो. सांगण्यात आले आहे की मोबाईलला पुढील महिन्यात जूनमध्ये एंट्री मिळू शकते. तसेच, लीकमध्ये फोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन टिपस्टरने शेअर केले आहेत. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.
Vivo S19 सीरिजचे स्पेसिफिकेशन (लीक)
- मायक्रो ब्लॉग्गिंग साईट वीबोवर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Vivo S19 आणि Vivo S19 Pro स्मार्टफोनची माहिती शेअर केली आहे. यात चिपसेट, स्टोरेज ऑप्शन आणि चार्जिंग फिचर्सची माहिती मिळाली आहे.
- लीकनुसार Vivo S19 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 चिपसेट लावली जाऊ शकते.
- विवो एस 19 साठी 12GB रॅम +256GB स्टोरेज, 12GB रॅम +512GB स्टोरेज, 16GB रॅम +256GB स्टोरेज आणि 16GB रॅम+ 512GB स्टोरेज सारखे चार पर्याय मिळतात.
- Vivo S19 Pro पाहता यात परफॉरमेंससाठी MediaTek Dimensity 9200+ चिपसेट दिली जाऊ शकते. या स्टोरेजच्या बाबतीत विवो एस 19 स्मार्टफोनच्या समान ठेवले जाऊ शकतात.
- लीकनुसार Vivo S19 आणि Vivo S19 Pro स्मार्टफोन 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतात.
Vivo S18 Pro चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: पर्व मॉडेल Vivo S18 Pro स्मार्टफोन 6.78 इंचाच्या कर्व अॅमोलेड डिस्प्लेसह येतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 2800 निट्स पीक ब्राईटनेसची सुविधा आहे.
- प्रोसेसर: विवो एस 18 प्रो फोनमध्ये ब्रँडने मीडियाटेक डायमेंसिटी 9200 प्लस चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Mali-G715 Immortalis MP11 जीपीयू आहे.
- कॅमेरा: हा डिव्हाईस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सादर झाला होता. यात ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशन (OIS) टेक्नॉलॉजी असलेला 50MP चा Sony IMX920 प्रायमरी, 50MP Samsung JN1 अल्ट्रावाईड आणि 12MP Sony IMX663 टेलीफोटो लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सल फ्रंट देण्यात आला आहे.
- बॅटरी: Vivo S18 Pro दमदार बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरीसह आहे. फोनमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.















